Dictionaries | References

   { सात, सप्त }
Script: Devanagari

७     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सात, सात

७     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सात, सात

७     

Sanket Kosh | Marathi  Marathi
सप्तर्षि   
(अ) प्रत्येक मन्वन्तरांतील सात ब्रह्मर्षि. चालू वैवस्वत मन्वन्तरांतील सप्तर्षिः १ कश्यप. २ अत्रि. ३ भरद्वाज, ४ विश्चामित्र, ५ गौतम, ६ जमदग्नि आणि ७ वसिष्ठ.
(आ) प्राचीन ऋषींपैकीं जे महर्षि विशेष प्रसिद्धीस आले त्यांचीं नांवें चिरस्मरणीय व्हावींत म्हणून उत्तरेकडील धरुवनक्षत्राभोंवतीं प्रदक्षिणा घालणार्‍या तारकासमूहांतील सात तेजस्वी तार्‍यांस दिलीं तीं अशीं - १ मरीचि, २ अत्रि, ३ अंगिरस, ४ पुलस्त्य, ५ पुलह, ६ क्रतु व ७ वसिष्ठ. यांत वसिष्ठांजवळच्या लहान तार्‍यास अरुंधती असें नांव दिलें आहे. हे चित्रशिखंडी नांवाचे सप्तर्षि होत. यांनी आपल्या सातमुखांनीं लोकधर्म सांगितला ([म. भा. शांति. अ. ३३५]). या तारका समूहासच वृहद्‌‍दक्ष किंवव खाटलें बाजलें म्हणताच. यांतच वसिष्ठाच्या तार्‍याजवळ एक लहान तेजस्वी दिसतो, तारा दिसतो, त्यास अरुंधती म्हणतात. वैदिक विवाहपद्धतींत अरुंधतीदर्शन म्हणून सप्तपदीनंतरचा एकविधि, यावेळी वधूला अरुंधती नक्षत्र दाखवून तूं अरुंधतीसारखी पतिनिष्ठ हो असें सांगावयाचें असतें.
कश्यपोऽत्रिर्मरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ॥ ([भाग - १३-८-५])
(इ) दोन डोळे, दोन कान, दोन नासिका - छिद्रें व एक मुख - वाणीचें इंद्रिय.
हे मस्तकावर असलेले सात ऋषि होत. ज्ञान घेणें व ज्ञान देणें हें कार्य अखंड चालू असतें. (वैदिक तत्त्वज्ञान)
(इ) (शरीरांतील) १ नाक, २ जिव्हा, ३ डोळे, ४ त्वचा, ५ कान, ६ वाणी आणि ७ मन.
(उ) १ आत्मा, २ बुद्धि, ३ अहंकार, ४ मन, ५ प्राण, ६ ज्ञानेद्रियें व ७ कर्मेंद्रियें. प्रत्येक शरीरांत हे सप्तऋषि आहेत आणि ते शरीररूपी घराचें रक्षण करितात.
"सप्तऋषः प्रतिहिताः शरीरे"(वा. यजु. ३४-५५)
सप्त अवस्था   
१ अज्ञान, २ आवरण, ३ विक्षेप, ४ परोक्षज्ञान, २ अपरोक्षज्ञान, ६ शोकमंग आणि ७ निरंकुशा तृप्ति ([म. वा. को.])
सप्त अधिकारी (पंचागांत)   
१ राजा, २ मंत्री, ३ न्यायाधिपति, ४ मेघेश, ५ रसाधिपति, ६ अग्रधान्येश आणि ७ पश्चाद्धान्येश.
सप्त अप्सरा   
१ रंमा, २ घृताची, ३ मेनका, ४ तिलोत्तमा, ५ मंजुघोषा, ६ ऊर्वशी आणि ७ सुकेशी.
घृताची मेनका रंमा ऊर्वशी च तिलोत्तमा।
सुकेशी मंजुघोषाद्याः कथ्यन्तेऽप्सरसो बुधैः ॥ (सु.।
सप्त अनल   
१ कालानल, २ क्रव्यानल - दिशाहुत अग्नि,, ३ वडवानल - समुद्रांतील, ४ सह्स्त्रानल - सूर्यांतील अग्नि, ५ विशानल - शेषमुखांतील, ६ भुवानल - पृथ्वीगर्मांतील आणि ७ हारानल - शिवाचे तृतीय नेत्रांतील अग्नि. असे सात प्रकारचे अग्नि आहेत. ([दु. श. को.])
सप्त अरण्यें   
१ दंडकारण्य, २ खंडारण्य़, ३ चंपकारण्य, ४ वेदारण्य ५ नैमिषारण्य, ६ ब्रह्मारण्य आणि ७ धर्मारण्य.
([भा. रा. किष्किंधा. १४-२२]).
सप्त आशय   
१ वाताशय, २ पित्ताशय, ३ श्लोष्माशय, ४ रक्ताशय, ५ आमाशय, ६ पक्काशय व ७ मूत्राशय.
मानवी शरीरांत सात आशय आहेत. पण स्त्रियांनाच असणारा गर्माशय हा एक अधिक आशय आहे. ([सुश्रुत शारीर. ५-८])
सप्त उपचार   
१ पाचन, २ रेचन, ३ स्वेदन, ४ शमन, ५ मोहन, ६ स्तंभन आणि ७ मर्दन ([म. वा. को.])
सप्त उपधातु (रसायनशास्त्र)   
१ सुवर्णमाक्षिक, २ मोरचूद, ३ अभ्रक, ४ सुर्मा, ५ मनशीळ, ६ हरताळ आणि ७ कलखापरी. (रसायनसंग्रह)
सप्त उपधातु (शरीरांतील)   
१ स्तन्य, २ आर्तव, ३ वसा, ४ घाम, ५ दांत, ६ केस आणि ७ ओज. हे शरिरांतील सप्तधातूंचे सात उपधातु होत. ([भावप्रकाश])
सप्त उपरत्नें   
१ वैक्रांत, २ सूर्यकांत, ३ चंद्रकांत, ४ राजावर्त, ५ लाल, ६ पेरोज आणि ७ स्फटिक.
सप्तोपरत्नगणिता मणयो लोकविश्रुताः ॥ (शा. नि.)
सप्त उपविषें   
१ रुईचा चीक, २ त्रिधारी निवडुंगाचा चीक, ३ कळलावी, ४ कण्हेर ५ गुंज, ६ अफू व ७ धोतरा. हीं उपविषें होत.
सप्त ऋषींची सात प्रकारची रोगचिकित्सा   
१ पापराहित्य - गौतम, ४ मानसचिकित्सा - अत्रि, ५ प्रार्थनाचिकित्सा - विश्वाभित्र, ६ जल - चिकित्सा - जमदग्नि आणि ७ स्पर्शचिकित्सा - वसिष्ठ,
अशी सप्तऋषींची सात प्रकारची रोगचिकित्सा प्राचीन काळीं केली जात असे. ([ऋग्वेद ८४ वा अनुवाक])
सप्त कला (शरीरांतील)   
१ मांसधरा, २ रक्तधरा, २ मेदोधरा, ४ कफधरा, ५ पुरिषधरा, ६ पित्तधरा व ७ रेतोधरा. शरिरावर त्वचेचीं आवरणें सात असतात. तशा कलहि सात आहेत. ([सुश्रुत शारीर. अ. ४])
सप्त कांडें (रामायनाचीं)   
१ बालकांड, २ अयोध्याकांड, ३ अरण्यकांड, ४ किष्किंधाकांड, ५ सुंदरकांड, ६ युद्धकांड व ७ उत्तरकांड. अशीं रामायणाचीं सात कांडें आहेत.
सप्त कीर्तिलक्षणें   
१ दान, २ पुण्य, ३ विद्या, ४ वक्तृत्व, ५ काव्य, ६ आर्जव व ४ शौर्य.
सप्त कुलाचल   
(अ) १ हिमवान, २ गंधमादन, ३ नैषध, ४ विंध्य, ५ माल्यवान्, ६ पारियात्रिक व ७ हेमकूट ;
(आ) १ महेन्द्र, २ मलय, ३ सह्म, ४ शुक्तिमान, ५ ऋक्ष पर्वत, ६ विंध्य व ७ पारियात्र.
महेंद्रो मलयः सह्मः शुक्तिमानृक्षवानपि।
विंध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ॥ ([म. भा. भीष्म ९-११])
सप्त कृतिका   
सात तार्‍यांचा एक मोठा नक्षत्र पुंज त्यांचीं नांवें :- १ अंबा, २ दुला, ३ नितत्नी, ४ अभ्रयंती, ५ मेघयंती, ६ वर्षयंती आणि ७ चुपुणिका. ([ज्योतिष])
सप्त गीता   
१ श्रीमद्भगवद्नीता, २ रामगीता, ३ गणेशगीता, ४ शिवगीता, ५ देवीगीता, ६ कपिलगीता आणि ७ अष्टावक्रगीता. अनेक गीतांतील या सात मुख्य गीता मानिल्या आहेत.
सप्त गोदावरी   
गोदावरी नदी सात मुखांनीं समुद्रास मिळते. त्या सात प्रवाहांचीं नांवें :- १ गोदावरी - वसिष्ठ कोटिलिंगस्थान
(राजमहेंद्रीजवळ) २ कौशिका, ३ गौतमी, ४ वृद्धगौतमी, ५ भारद्वाज, ६ आत्रेया आणि ७ तूर्या. यांना सप्त गोदावरी अशी संज्ञा आहे.
सप्त गंगा   
(अ) १ गंगा, २ यमुना, ३ सरस्वती, ४ रथस्था, ५ सरयू, ६ गोमती व ७ गंडकी ([म. भा. आदि - १७०-२०]);
(आ) १ जाह्लवी, २ वृद्धगंगा, ३ कालिंदी, ४ सरस्वती, ५ कावेरी, ६ नर्मदा आणि ७ वेण्णा.
जाह्लवी वृद्धगंगा च कालिन्दी च स्ररस्वती।
कावेरी नर्मदा वेणी सप्त गङ्‌‍ग प्रकीर्तिताः ॥ ([स्कंद - वैष्णव. ४-१५])
(इ) राजा भगीरथानें तप केल्यामुळें गंगा मूळ सप्त प्रवाहांनीं पृथ्वीवर प्रकट झाली त्यांचीं नांवें :- १ ल्हादिनी, २ पावनी आणि ३ नलिनी हे तीन ओघ पूर्व दिशेकडे गेले आणि ४ सुचक्षु, ५ सीता व ६ महानदी सिंधू हे तीन पश्चिमेकडे व सातवा गंगा हा प्रवाह राजा भगीरथानें दाखविलेल्या मार्गानें पृथ्वीवर अवतीर्ण झाला. ([वा. रा. अ बालसर्ग ४३])
सप्त गंडकी   
१ बारीगर, २ शालिग्रामी अथवा नारायणी, ३ श्चेतगंडकी, ४ गंदी, ५ त्रिशूळगंगा, ५ दरंडी व ७ मर्षिअंडी. या सात नद्या मिळून झालेल्या प्रवाहास सप्तगंडकी असें म्हणता. (Bengal R. A. Journal VOL. 18)
सप्त चिरंजीव (पौराणिक)   
१ अश्वत्थामा, २ बलि, ३ व्यास, ४ हनुमंत, ५ बिभीषण, ६ कृप आणि ७ परशुराम.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनूमांश्व बिभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ॥ ([पद्म - सृष्टि.])
याखेरीज मार्कंडेय हे आठवे होत.
सप्तैतान् संस्मरेन् नित्यं मार्कंडेयमथाष्टमम ॥ ([सु.])
सप्त चिरंजीव (आधुनिक)   
१ भगतसिंग, २ राजगुरु, ३ सुखदेव (पंजाब), ४ शिंदे, ५ सारडा, ६ कुरवान हुसेन व ७ मल्लया धनशेटी (सोलापूर).
हे सात प्रस्थापित सरकारविरुद्ध राज्यक्रांतिकारका म्हणून ब्रिटिश राजवटींत बळी दिले गेले.
भगत्सिंगो राजगुरुः सखदेवश्च सारडाः।
शिन्देहुसेनौ मल्लपा सप्तैते चिरजीवनः ॥ (केसरी २८ मार्म १९३१)
सप्त चक्रें (देहांत) त्यांचीं स्थानें, लोक व देवता   
१ मूलाधार चक्र - गुद - देवलोक - गणेश,
२ स्वाधिष्ठानचक्र - पेड्रस्थान - ब्रह्मलोक - ब्रह्मा,
३ मणिपूरचक्र - नामि - वैकुंठ - विष्णु,
४ अनाहतचक्र - ह्रदय - कैलास - शिव,
५ विशुद्धचक्र - कंठ - सत्यलोक - सरस्वती,
६ अग्निचक्र - भृकुटीस्थान - स्वर्गलोक - महाविष्णु आणि
७ सहस्त्रकमलदलचक्र - ब्रह्मांड - मस्तकस्थान - निराधार लोक - परमात्मा देवता ([पंचग्रंथी])
सप्त चैतन्यें   
१ ब्रह्मचैतन्य, २ ईशचैतन्य, ३ जीवचैतन्य, ४ प्रमाणचैतन्य, ५ प्रमातृचैतन्य, ६ प्रमेयचैतन्य व ७ फलचैतन्य, पहिलें शाश्चत ब्रह्मचैतन्य बाकीचीं सहा मायिक चैतन्यें मानिलीं आहेत.
सप्त जिव्हा (अग्निच्या)   
(अ) १ कराली, २ धूमाली, ३ श्वेता, ४ लोहिता, ५ कनकप्रभा, ६ अतिरक्ता आणि ७ पद्मरागा,
अशीं अग्नीच्या सात ज्वालांचीं नांवें आहेत. यावरून अग्नीला सप्तजिह्ल म्हणतात. (भ. मध्यमपर्व १-२०)
(आ) १ काली, २ कराली, ३ मनोजवा, ४ सुलोहिता, ५ सुधूम्रवव्रर्णा, ६ स्फुलिंगिनी व ७ दिव्य वररुचि, ([मुंडकोप - निषद १-२-४])
सप्त तत्त्वें (जैन धर्माचीं)   
१ जीव, २ अजीव, ३ आसव, ४ बंध, ५ संवर, ६ निर्जरा आणि ७ मोक्ष.
अशीं सात तत्त्वें जैन धर्मांत मानिलीं आहेत. कोणी कोणी यांच्या जोडीला ८ पुण्य व ९ पाप हीं धरून नऊ मानतात.
सप्त तीर्थें   
१ सत्य, २ क्षमा, ३ इंद्रियनिग्रह, ४ सर्वभूतदया, ५ सत्यवादिता, ज६ ज्ञान व ७ तप. हे सात प्रकारचे दैवी गुण सप्त तीर्थें म्हणून मानले आहेत.
सत्यतीर्थं क्षमातीर्थं पीर्थमिन्द्रियनिग्रहः।
सर्वभूतदयातीर्थं तीर्थानां सत्यवादिता ॥
ज्ञानतीर्थं तपस्तीर्थं कथितं तीर्थसप्तकम् ([स्कंद अ. म. १०-४५])
सप्त त्वचा   
१ अवभासिता, २ लोहिता, ३ श्वेता, ४ ताम्रा, ५ वेदिनी, ६ रोहिणी आणि ७ मांसधरा.
अशा सात तर्‍हेच्या कमी अधिक जाडीच्या पापुद्रयांची त्वचा ब नलेली आहे. त्वचा हे एक शरिराचें सुंदर आवरण आहे. (शारंगधर)
सप्त द्वारें परमार्थ साधनाचीं   
१ श्रवण, २ साधन, ३ नित्या - नित्य वस्तु विवेक, ४ मनन, ५ निदिध्यासन, ६ वैराग्य व ७ साक्षात्कार. ([भा. रा. ५-४५])
सप्त द्वारें स्वर्गाचीं   
१ तप, २ दान, ३ शम, ४ दम, ५ ही, ६ आर्जव व ७ सर्वभूतानुकंपा. ([म. वा. को.])
सप्तर्षि महाप्रलयांतून बचावलेले   
१ ब्रह्मा, २ वसिष्ठ, ३ भृगु. ४ अत्रि, ५ दक्ष, ६ काश्यप व ७ आंगिरस. ([The Wisdom of India])
सप्त द्वीप   
१ जबुद्वीप, २ प्लक्षद्वीप, ३ शाल्मलीद्वीप, ४ कुशद्वीप, ५ क्रौंचद्वीप, ६ शाकद्वीप आणि ७ पुष्कद्वीप.
असे, पृथ्वीचे प्राचीन काळचे सात मोठाले विभाग.
जंबुप्लक्षामिधानौ च शाल्मलश्च कुशस्तथा।
कौंचशाकौ पुष्करश्च ते सर्वे देवभूमयः ॥ (वृ. ना. पूर्वखंड)
सप्त देह   
१ स्थूलदेह, २ सूक्ष्मदेह, ३ प्राणदेह, ४ वासनादेह, ५ मानसदेह, ६ बुद्धिदेह आणि ७ आत्मदेह.
अस्तिस्वाच्या या सातश्रेणी आहेत. त्यांना सात पडदे किंवा चैतन्याचीं वसनें म्हणतात. (धवलगिरि)
सप्त धातु (खनिज)   
१ सोनें, २ रुपें, ३ तांबें, ४ शिसें, ५ जस्त, ६ कथिल व ७ लोखंड.
सप्त धातु (शरिरांतील सात रस)   
(अ) १ रस. २ रक्त, ३ मांस, ४ मेद, ५ अस्थि, ६ मज्जा आणि ७ शुक्र, ([सुश्रुत]);
(आ) १ वसा, २ रुधिर, ३ मांस, ४ मेद, ५ मज्जा, ६ अस्थि आणि ७ स्नायु. हे सात धातू असून हे देहाचें धारण करतात
रसो रुधिरं मांसश्च मेदो मज्जास्थिरेतसः।
सप्तधातच इमे प्रोक्ताः सर्वदेहसमाश्रिताःअ। (कर्णहंस)
सप्त धान्यें   
(अ) १ सातु, २ गहूं, ३ साळ, ४ तीळ, ५ राळे, ६ सांवे आणि ७ हरमरे ;
(आ) १ साळी, २ यव, ३ तीळ, ४ उडीद, ५ राळे. ६ गहूं आणि ७ हरमरे.
सप्त नद   
१ शोणनद, २ सिंधुनद, ३ हिरण्याक्ष, ४ कोक, ५ घर्घर (घगर), ६ लोहित आणि ७ शतलज्ज (सतलज) हे सात नद होत."शतलज्जो नदाः सप्त यावना ब्रह्मसूनवः ॥"(अ. म. ३०-१७)
सप्त पदार्थ (न्यायशास्त्र)   
१ द्र्व्य, २ गुण, ३ कर्म, ४ सामान्य, ५ विशेष, ६ समवाय आणि ७ अभाव. अशीं विश्वाचीं सात मूलद्रव्यें वैशेषिक दर्शनानें मानिलीं आहेत. सृष्टि ही अशी सप्तपदार्थात्मकच आहे.
सप्त पदार्थ विद्या   
१ शिल्पविद्या, २ जलविद्या, ३ वातविद्या, ४ दर्शनविद्या, ५ नादविद्या, ६ विद्यल्लताविद्या आणि ७ चुंबकविद्या. ([म. वा. को.])
सप्तपदी   
(अ) विवाहविधींतील प्रमुख अंग - लाजाहोमानंतर वरानें वधूचा हात धरून अग्नि व द्विज यासमक्ष एकेका अशा सात अक्षतपुंजांवर चरण ठेवून सात पावलांनीं आपल्याजवळ आणणें. याला सप्तमदी म्हणतात. सप्तपदीविना विवाह पूर्ण होत नाहीं.
विवाहहोम झाला संपूर्ण, सप्तपदी पाणीग्रहन ([रुक्मि. स्वयं. १६-२६])
(आ) वधू आपल्या पतीबरोबर सात पावलें चालून आपल्या सात मागण्या मान्य करून घेत. पहिल्यांत अन्न, दुसर्‍यांत बल, तिसर्‍यांत धनवस्त्रादि, चौथ्यांत सुख, पाचव्यांत गाय, सहाव्यांत सर्व ऋतंत सुख आणि सातव्यांत सख्य, सज्जनांची मैत्री सात पावलें बरोबर चालण्यानें होते.
सप्त पाताळ   
(अ) १ अतल, २ वितल, ३ सुतल, ४ रसातल, ५ महातल, ६ तलातल आणि ७ पाताल ; असे सात पाताळ (अधोलोक) आहेत ([बृहन्नारदीय पूर्वखंड]);
(आ) १ अहितळ, २ महितळ, ३ सुतळ, ४ कर्मतळ, ५ वितळ, ६ शंकातळ आणि ७ रसातळ. (मूळस्तंभ कथासार)
(इ) १ अतळ - सुमात्रा, २ वितळ - बोर्निओ, ३ सुतळ - जावा, ४ रसातळ - सेलिबिस, ५ महातळ - ऑस्ट्रेलिया, ६ तळातळ - न्यू गिनी व ७ पाताळ - न्यूझीलंड (भारतभक्तिस्तोत्र)
सप्तप्राण आणि त्यांचीं सात स्वरूपें   
(मनुष्य शरीरांत सातप्राण आहेत. त्यांचीं नांवें व स्वरूपें अनुक्रमें)- १ ऊर्ध्व - अग्नि, २ प्रौढ - आदित्य, ३ अभ्यूढ - चंद्रमा, ४ विभू - पवमान, ५ योनि - आप, ६ प्रिय - पशु आणि ७ अपरिमित - प्रजा. ([अथर्व १५-१-९])
सप्त पाश   
(अ) १ काळपाश - आयुष्यघात, २ कर्मपाश - अनैश्वर्यवंत, ३ धर्मपाश - आश्रमगत, ४ ब्रह्मपाश - वैदविहितार्थ, ५ मोहपाश - देहममता, ६ आशापाश - मुख्यमाया आणि ७ जन्मपाश - कनककांता (भा. सुंदर, १९-११)
(आ) १ अहं, २ बायको, ३ पुत्र, ४ गृह, ५ स्वजन, ६ धन आणि ७ आशा. असे सात पाश माणसाला बांधून ठेवतात. ([भा. रा. सुंदर, २२-४४])"आशा पाश सप्तमहा"([हरिवरदा अ. ८०]).
सप्त प्रकृति   
१ जति, २ देश, ३ कुल, ४ काल, ५ वय, ६ बल आणि ७ प्रतिव्यक्ति (व्याक्तिवैशिष्टय). या सातांनीं सात प्रकारच्या प्रकृती (मनुष्य शरीराच्या) बनतात, असें आयुर्वेदांत मानलें आहे. ([वाग्मट, शा. ८-२२])
सप्त प्रयाग   
(अ) १ रुद्रप्रयाग - मंदाकिनी व अलकनंदा संगम, २ नंदप्रयान, ३ कर्णप्रयाग, ४ देवप्रयाग, ५ पार्वतीप्रयाग, ६ विष्णुप्रयाग - विष्णुगंगा व अलकनंदा संगम आणि ७ प्रयागराज - गंगा व यमुना संगम. हे सात प्रयाग (महानद्यांचे संगम) आहेत ;
(आ) १ प्रयाग, २ देवप्रयाग, ३ कर्णप्रयाग, ४ नदंप्रयाग, ५ श्यामप्रयाग - श्यामगंगा व भागीरथी संगम, ६ गुप्तप्रयाग आणि ७ हरिप्रयाग.
सप्त भयें   
१ इहलोकमय, २ परलोकमय, ३ वेदनाभय, ४ मृत्युभय, ५ अगुप्तिभय, ६ अश्लोकमय, व ७ अकत्मात्‌‍भय.
([रत्नकरंडक श्रावकाचार अ. १])
सप्त भूमिका वासनाक्षयाच्या (वेदांतशास्त्र)   
१ योगभूमिका, २ विचारभूमिका, ३ असंसर्गा, ४ स्वप्रभूमिका, ५ सुषुप्तिभूमिका, ६ मनोलय आणि ७ कैवल्य. (चंद्रकांत, भाग २ रा)
सप्त भूमिका ज्ञानाच्या   
१ शुभेच्छा, २ विचारणा - अध्यात्मशास्त्र आणि संतसमागम, ३ तनुमानसा - मनःक्षयकारिणी, ४ सत्त्वापत्ति - चित्तनिर्मळ होणें, ५ असंसक्ति - अनासक्ति, ६ पदार्थाभावना - आत्मवस्तूची भावना आणि ७ तुर्यगा - अवस्थात्रयाच्या पलीकडे जाणें, सातव्या अवस्थेंत मनुष्य जीवन्मुक्त होतो. ([रा. गी. ७-३४]) (यो. वा.)
सप्त मधु अथवा सात मधु पदार्थ   
१ ब्राह्मण ([ज्ञान]), २ राजशासन (प्रजारंजनरूपमधु), ३ धेनु, ४ वैल, ५ तांदूळ, ६ जव आणि ७ मध. व्रीहिश्च यवश्च मधुसप्तमम् ॥ ([अथर्व - अनु - मराठी. भाग २ रा])
सप्त महारथी   
१ द्रोण, २ कर्ण, ३ कृपाचार्य, ४ कृतवर्मा, ५ अश्चत्थामा, ६ शल्य आणि ७ जयद्रथ, हे कौरव पक्षीय सात महारथी.
या सातांनीं मिळून भारतीय युद्धांत एकाकी वीर अभिमन्यूचा वध केला.
सप्त महानद्या   
१ गंगा, २ यमुना, ३ गोदावरी, ४ सरस्वती, ५ नर्मदा, ६ सिंधु, ७ कावेरी. यांचें स्नानसप्रयीं स्मरण करावें.
सप्त मातृका   
(अ) १ श्री, २ लक्ष्मी, ३ धृति, ४ मेधा, ५ श्रद्धा, ६ विद्या आणि ७ सरस्वती ;
(आ) १ ब्राह्मी, २ माहेश्वरी, ३ कौमारी, ४ वैष्णवी, ५ वाराही, ६ इंद्राणी आणि ७ चामुंडा या सप्त मातृका देवता होत.
खेरीत ऐन्द्री ही आठवी भातृका म्हणजे देवीच्या आठ विभूति सांगितल्या आहेत. (डामरतंत्र)
ब्राह्मी माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा ॥
वाराही च तथेंद्राणी चामुंडा सप्तमारतः ॥ ([देवी भा. स्कंध १२])
सप्त माया   
१ गायत्री, २ सत्यवती, ३ ज्ञानविद्या, ४ लक्ष्मी, ५ उमा, ६ वर्णिका व ७ धर्मद्रवा.
ब्रह्मदेवानें सृष्टि निर्मितांना मायेचें साह्म घेतलें व तें तिनें या सप्तरूपांनीं दिलें. अशी कथा आहे. ([प्रा. च. को.])
सप्त माया   
१ महामाया, २ वैष्णवीमाया, ३ दैत्त्येयीमाया, ४ गौह्मकी माया, ५ पैशाची माया, ६ आसुरी माया व ७ राक्षसा माया.
"सप्त माया व्यतिक्रम्य मायां सयुयुजोष्टमीम् "
सत्तात्मिका अथवा सात्विकी माया या आठव्या मायेचा प्रयोग करून प्रद्युम्नानें शंबरासुराचा वध केला. ([विष्णु. ५-७-१८])
तितृकिया सात्विकी माया योगें।
शंवर सवेगें पाडिला ॥ ([हरिवरदा ५५-२०४])
सप्त मुक्तिप्रद क्षेत्रें   
(अ) १ अयोध्या, २ मथुरा, ३ माया, (हरिद्वार) ४ काशी, ५ कांची, ६ अवंतिका - उजयिनी आणि ७ द्वारका,
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका।
पुरी द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिकाः ॥ ([गुरुड. १६-११४])
(आ) (परशुराम निर्मित) १ रजतपीठ - उडपी, २ कुमार पर्वत - सुब्रह्मण्यक्षेत्र, ३ कुंभकाशी - कुंभकोणम्, ४ ध्वजेश्वर महादेव, ५ क्रोड ऋषीच्या आश्रमी शंकर नारायण क्षेत्र, ६ गोकर्ण आणि ७ मूकांबा देवी.
रोप्यपीठं कुमाराद्रिः कुंभकाशी ध्वजेश्वरः।
क्रोडगोकर्णमूकांबाः सप्तैते मोक्षदायकाः ॥ (यात्राकल्पलता)
सप्त मृत्तिका   
१ अश्वाच्या जागेंतील, २ गजाच्या जागेंतील, ३ चव्हाटयावरची, ४ वारूळ, ५ संगमावरची, ६ डोड आणि ७ गायीच्या गोठयांतील.
या सात ठिकाणांहून आणलेली मृत्तिका वस्तुशांति इत्यादि कर्मांत लागतात. (धर्मशास्त्र)
सप्त मौक्तिक स्थानें   
१ शिंपा, २ डुकारचें मस्तक, ३ सर्पमस्तक, ४ शंख, ५ मत्स्य, ६ बेडूक (किंवा वेळू) आणि ७ हत्ती, (निघंट प्रकाश)
सप्त रक्त   
१ तळहात, २ पायाचे तळवे, ३ नेत्रांचे कोपरे, ४ जीभ, ५ ओठ, ६ पडजीभ आणि ७ नखे, या सात ठिकाणांच्या रक्ताला सप्तरक्त ही संज्ञा आहे.
सप्त रंग   
लाल, २ नारिंगी, ३ पिवळा, ४ हिरवा, ५ निळा. ६ पारवा आणि ७ जांभळा. हे सूर्यकिरणांच्या पृथक्करणानें होणारे अथवा इंद्रधनुष्यांत दिसणारे सात रंग.
सप्त रशिम (किरणें) सूर्याची   
१ सुषुम्ना, २ हरिकेश, ३ विश्वकर्मा, ४ विश्वश्रवा, ५ संयद्वसु, ६ अर्वावसु व ७ स्वरकु वा स्वरत. ([कूर्म. ४३-३])
सप्त रशिममय सृष्टि   
१ सूर्याचीं किरणेंज सात, २ पृथ्वीच्या धातु व उपधातुहि सात, ३ रत्नाचे रंग सात, ४ मनुष्याच्या शरिरांतील धातु व उपधातुहि सात, ५ त्वचा सात, ६ अग्नीच्या कला सात आणि ७ त्यांचीं राहण्याचीं ठिकाणेंहि सात.
अशी सर्व सृष्टि सप्त रश्मिमय आहे. (आरोग्य मंदिर ऑगस्ट १९५४)
सप्तरस   
१ पृथ्वी, २ जल. ३ वनस्पति, ४ मनुष्य, ५ वाचा, ६ ऋचा व ७ साम
असे सात रस अध्यात्म (वेदांत) शास्त्रांत मानले आहेत. सामाचे सार उद्नीथ म्हणजे ओंकार हा आठवा रस होय.
"स एष रसानां रसतमः परमः परार्ध्योऽयं उद्नीथः"([सु.])
सप्त लोक   
(अ) १ भूलोक - पृथ्वी, भुवर्लोक - पृथ्वी आणि सूर्य यामधील, ३ स्वर्लोक - सूर्य आणि ध्रुव यांमधील, ४ महर्लोक - सूर्य व नक्षत्रें यांचा, ५ जनलोक - ब्रह्मदेवाच्या मानस्पुत्रांचा. ५ तपोलोक - तपस्वी लोकांचा आणि ७ सत्यलोक - ब्रह्मदेवाचा. असे सात ऊर्ध्व लोक पुराणांत वर्णिले आहेत. ([वायु. पूर्वार्ध. ५०-७९])
(आ) जीव, जगत् आणि ईश्वर ही एक वस्तु आहे आणि स्वतःच्या आनंदासाठीं ती सात प्रकारची झाली आहे. त्याला वेदांतांत सप्तलोक असें म्हटलें आहे. तें असें :- १ सत् - सत्यलोक, चित् - तपोलोक, ३ आनंद - जनलोक, ४ विज्ञान - महर्लोक, ५ मन - स्वर्लोक, ६ प्राण - भुवर्लोक व ७ शरीर - भूलोक. (पूर्णयोगी श्रीअरविंद)
सप्तविध व्यसनें   
(अ) १ द्यूत, २ मांस, ३ स्रुरा, ४ वेश्या, ५ दिवानिद्रा, ६ परानिंदा व ७ मृगया ;
(आ) १ हिंसा, २ चोरी, ३ व्यमिचार, ४ मद्यपान, ५ असत्य भाषण, ६ जुगार व ७ दुष्टसंगति ;
(इ) १ जारण, २ मारण, ३ विध्वंसन, ४ स्तंभन, ५ मोहन, ६ वशीकरण आणि ७ उच्चाटन ;
(ई) १ द्यूत, २ मृगया, ३ मद्यपान, ४ कठीण दंड, ५ अयोग्य दान, ६ कामिनी आणि ७ कठोर भाषण.
सप्त व्याह्रति   
व्याह्रति म्हणजे आविष्कार. या सात आहेत. १ भूः, २ भूवः, ३ स्वः, ४ महः, ६ तपः, व ७ सत् ([ऋग्वेद १०-६७]) आणि यांचा भाव १ अस्तित्व, २ ज्ञान, ३ प्रकाश, ४ महत्त्व, ५ प्रजनन, ६ सहनशक्ति आणि ७ सत्यनिष्ठा. या सात शब्दांत आहे.
या सात व्याह्रति म्हणजे वेदांतील सांकेतिक शब्द होत. (पुरुषार्थ)
सप्तविध स्वप्रें   
१ द्दष्ट - पाहिलेल्या गोष्टी स्वप्रांत दिसणें, २ श्रुत - ऐकलेल्या दिसणें, ३ अनुभूत - मनानें अनुभविलेल्या, ४ प्रार्थित - इच्छिलेल्या, ५ संकल्पित, ६ भाविक - पुढील गोष्टी सुचविणारीं आणि ७ दोषज - वात, पित्त, कफ इत्यादि दोषांमुळें पडणारीं.
द्दष्टं श्रुतानुभूतं च प्रार्थितं कल्पितं तथा।
भाविकं दोषजं चैव स्वप्नं सप्तविधं विदुः ॥ ([अष्टांगसंग्रह])
सप्तशती   
(अ) सातशें श्लोकांचा ग्रंथ - भगवद्नीता. ती गीता हे सप्तशती। मंत्र प्रतिपाद्या भगवती। ([ज्ञा. १८-१६-६६])
(आ) मार्कंडेय पुराणांतर्गत देवीस्तुति. यांत सातशें मंत्र आहेत. आश्चिनमासांतील देवीनवरात्रांत याचें पठण केलें जातें ;
(इ) राजा हाल यानें रचिलेला ग्रंथ, यांत सातशें गाथा आहेत, म्हणून त्यास गाथासप्तशती म्हणतात. त्यावरून मध्ययुगीन भारतांतील सामाजिक स्थितीचें सम्यक् ज्ञान होंतें.
सप्त संपत्ति   
१ जनसंपत्ति, २ धनसंपत्ति, ३ पुत्रसंपत्ति, ४ कलत्र्ससंपत्ति, ५ विद्यासंपत्ति, ६ इष्टफलसंपत्ति आणि ७ शरीरसंपत्ति.
सप्त सम्राट्   
१ भरत, २ श्रोणिक, २ चन्द्रगुप्त, ४ बिंदुसार, ५ अशोक, ६ खारवेल, आणि ७ कुमारपाल. हे सात जैनधमींय सम्राट् भारतांत होऊन गेले. (सप्त सम्राट्)
सप्त सरस्वती   
१ सुप्रभा - पुष्कर, २ कांचनाक्षी - नेमिश, ३ विशालागया, ४ मनोरमा - उत्तर कोसल, ५ ओघवती - कुरुक्षेत्र, ६ सुरेणु - हरिद्वार ७ विमलोदका - हिमालया.
यज्ञ प्रसंगीं ऋषींनीं आमंत्रण केल्यावरून. सरस्वती या सांत रूपांनीं अवतीर्ण झाली, त्या या सात नद्या होत.
([म. भा. शल्य. अ. ३८])
सप्त सागर   
१ लवणाब्धि, २ इक्षुसागर, ३ सुरार्णव, ४ आज्यसगार, ५ दधिसमुद्र, ६ क्षीरसागर आणि ७ स्वादुजल (शुद्धोदक).
असे सात सागर प्राचीनांनीं सांगितले आहेत. आजहि तांबडा समुद्र, काळा समुद्रा अशीं आश्चयोंत्पादक नांवें रूढ आहेतच.
' सप्तमः स्यात्स्वादु जलं इत्येते सप्तसागरः ॥ (विश्वब्रह्मपुराण १०-२२)'
क्षीरसमुद्र क्षारसमुद्र। दधि मधु घृत समुद्र।
सहावा तो इक्षुसमुद्र। सुरासमुद्र सातवा ॥ ' ([भा. रा. किष्किंधा १०-९])
सप्त सिंधु   
१ स्वात, २ गोमती, ३ वितस्ता, ४ चंद्रभागा, ५ इरावती, ६ सरस्वती व ७ सिंधु. या सात नद्यांना सप्तसिंधु अशी संज्ञा आहे.
सप्त सोमयज्ञसंस्था   
१ अग्निष्टोम, २ अत्यग्निष्टोम, ५ उक्थ्य, ४ षोडशी, ५ वाजपेय, ६ अतिरात्र आणि ७ आप्तोर्याम.
सप्त स्मर्तृगामी   
१ दत्तत्रेय, २ नारद, ३ व्यास, ४ शुक्र, ५ मारुति, ६ कार्तवीर्य आणि ७ गोरक्ष. हे सात स्म्रर्तृगामी म्हणजे स्मरण करणाराकडे जाणारे म्हणून प्रसिद्ध आहेत.
सप्त स्नानें   
१ मांत्र - मंत्रानें जलप्रोक्षण, २ भौम्र - मृत्तिका स्नान, ३ आग्नेय - भस्मधारण करण्यानें, ४ वायव्य - गोधूलीचा स्पर्श, ४ दिव्यवृष्टिजलानें (पाऊस पडत असतां उन्हडि पडतें अशा वृष्टिजलांत), ६ वारुणपाण्यांत बुडून आणि ७ मानस - परमेश्वरस्वरूपाचें ध्यान हें मानस स्नान होय.
मांत्रंज भौमं तथाग्नेयं बायव्यं दिव्यमेव च।
वारुणं मानसं चैव सप्तस्नानं प्रकीर्तितम् ॥ ([योगसंहिता])
सप्त स्वर   
१ षड्‌‍ज, २ ऋषम, ३ गांधार, ४ मध्यम, ५ पंचम, ६ धैवत व ७ निषाद. हे गायनशास्त्रांतील सात स्वर.
यांचेच संक्षिप्त पर्याय - सा - रे - ग - म - प - ध - नी हे होत. अहोबल नांवाचा गीतशास्त्रज्ञ होऊन गेल. त्यानेंच श्रुति व स्वर निश्चित केले असें म्हणतात.
सप्त हविर्यज्ञसंस्था   
१ अग्न्याधान, २ अग्निहोत्र, ३ दर्शपूर्णमास, ५ चेतकी, ६ अभया आणि ७ जीवंती, अशा हिरडयाच्या सात जाती आहेत
'यस्य नास्ति गृहे माता तस्य माता हरीतकी।' इतकें हिरडयाचें महत्त्व मानलें आहे. इंद्रानें अमृत प्राशन केलें. तेव्हां त्या अमृताचा एक थेंब जमिनीवर पडला. त्यापासून सात प्रकारचे हिरडे उत्पन्न झाले अशी पौराणिक कथा आहे. ([भावप्रकाश])
सप्त क्षार   
१ तिल, २ अपामार्ग, ३ करंज, ४ पालाश. ५ अर्क, ६ यव आणि ७ चिंचा.
सप्ताक्षरी मंत्र   
(अ)"श्रीगणेशाय नमः"हा मंगलबाचक आहे. कोणत्याहि कार्यारंमीं गणेश देवतेस नमन करण्याची रूढी आहे.
(आ)"ॐ नमो नारायण"(प्रकाश सांप्रदाय),
(इ)"सर्व खल्विंद ब्रह्म"हा उपनिषत् प्रणीत महामंत्र ([छां, ३-१४-१])
(ई) ॐ श्री विष्ण्वे नमः,
(उ)"ॐ श्री सूर्याय नमः
(ऊ)"श्रीगुरुदेवदत्त",
(ए)"त्र्यंबकं यजामहे"हा एक महामृत्युंजय मंत्र आहे. ([ऋग्वेद. ७-५ ९-१२])
सप्त क्षेत्रें   
१ कुरुक्षेत्र, २ हरिहरक्षेत्र (सोनपूर), ३ प्रभासक्षेत्र (वेरावळ), ४ रेणूकाक्षेत्र - मथुरेजवळ, ५ भृगुक्षेत्र - भडोच, ६ पुरुषोत्तमक्षेत्र व ७ सूकरक्षेत्र - सोरों. ([कल्याण तीर्थांक])
सात अंगें (चिकित्सेचीं)   
१ रोगी, २ दूत, ३ विद्य, ४ दीर्घायुष्य, ५ द्रव्य, ७ चांगला नोकर आणि ७ उत्तम औषध.
रोगी दूतो भिषग् दीर्घमायुर्द्रव्यं सुसेवकः।
सदौष्रधं चिकित्साया इत्यङ्‌गानि बुधा जगुः ॥ (नि. र.)
सात अंगें राज्याचीं   
१ राजा (राष्ट्रपती), २ मंत्री, ३ प्रजा, ४ किल्ले (दुर्गमस्थानें,) ५ कोश, ६ सैन्य व ७ मित्र - मित्रराष्ट्रें.
हीं प्राचीन सात अंगें आजहि थोडयाशा फरकानें आहेत.
सप्तप्रकृतयो हयेताः सप्तङ्‌‍गं राज्यमुच्यते। ([मनु. ९-२९४]) खेरीज राज्यांत दूतांचा सचार हें एक आवश्यक अंग आहे असें अथर्व - वेदांत सांगितलें आहे.
"अजिरः दूरः संचरातैःअ ॥ (सर्थव, मंडल ३)
सात अर्थ ज्ञानाचे (गीतोक्त)   
१ तत्त्वज्ञान, २ सांख्यज्ञान, ३ परोक्षज्ञान, ४ साधनज्ञान, ५ विवेकज्ञान, ६ लौकिकज्ञान आणि ७ शास्त्रज्ञान. ([तत्त्वचितामणि])
सात अनुष्ठानें (देवीचीं)   
१ नवरात्र विधान, २ नित्यचंडी विधान, ३ नवदुर्गानुष्ठान, ४ कालरात्रि, ५ नवचंडी, ६ शतचंडी आणि ७ सहस्त्रचंडी ([देवीमाहात्म्य अ. १५])
सात अरण्यवासी प्राणी   
१ सिंह, २ वाघ, ३ डुक्कर, ४ रेडे, ५ ह्त्ती, ६ रीस आणि ७ वानर. ([म. भा. भीष्म. ४-१७])
सात अवतार दुर्गा देवतेचे (भविष्यकालीन)   
१ विंध्याचल - वासिनी, २ रक्तदंतिका, ३ शताक्षी, ४ शाकबरी, ५ दुर्गा, ६ भीमा आणि ७ भ्रामरी. ([कल्याण शक्ति अंक])
सात अवयव विश्चाचे   
१ शिर - द्युलोक, २ नेत्र - सूर्य, ३ प्राण - वायु, ४ मध्यस्त्थान - आकाश, ५ मूत्रस्थान - अन्न व पाणी, ६ व ७ दोन - चरण - पृथ्वी.
आत्मा शरीर धारण करतो त्याप्रमाणें ईश्वर हें विश्व धारण करतो. अशी कल्पना करून ऋषींनीं हे विश्वाचे सात अवयव सांगितले आहेत. (मांडूक्य)
सात अवस्था चिदाभासाच्या (विदांतशात्र)   
१ अज्ञान, २ आवरण, ३ विक्षेप, ४ परोक्षज्ञान, ५ अपरोक्षज्ञान, ६ शोकनाश व ७ आनंदावाप्ति (विचार. सा. रह्स्य)
सात अस्तित्व तत्त्वें अथवा प्राचीन ऋषींनीं ऐकलेले महान् शब्द   
१ सत्, २ चित्, ३ आनंद, ४ विज्ञान, ५ मन, ६ प्राण आणि ७ अन्न (जडद्रव्य).
या सात वस्तु एकाच सत्य वस्तूचीं विविध रूपें आहेत. ([दिव्यजीवन खंड. २ रा])
सात अक्षौहिणी सैन्याचे सात सेनापति (पांडव पक्षीय)   
१ द्रुपद, २ विराट, ३ धृष्टद्युम्न, ४ शिखण्डी, ५ सात्यकि, ६ चेकितान व ७ भीमसेन.
सात्यकिश्चेकितानश्च भीमसेनक्ष वीर्यवान् ‌।
एते सेनाप्रणेतारो वीराः सर्वे तनुत्यजः ॥ ([म. भा. उद्योग. १५ १-५])
श्रीकृष्णाच्या मताप्रमाणें पांडवाकडील सरसेनापति पद धृष्टद्युम्नास देण्यांत आलें होतें.
सात आखाडे बैराग्यांचे   
१ वस्त्रधारी, २ निरंजनी, ३ निर्वाणी, ४ निमोंदी, ५ दिगंबरी, ६ ताटंबरी आणि ७ खाकी ([ऐ. गोष्टी. भाग. ३ रा])
सात आचार तांत्रिकांचे   
१ वेदाचार, २ वैष्णवाचार, ३ शैवाचार, ४ दक्षिणाचार, ५ वामाचार, ६ सिद्धान्ताचार व ७ कौलाचार. असे तंत्रशास्त्रांत सात प्रकारचे आचार मानले आहेत. (नाथसंप्रदाय)
सात आश्चर्यें   
(प्राचीन जगांतील)
(अ) १ इजिप्तमधील मनोरे, २ एफिसस येथील डियाना देवतेचें मंदिर, ३ बाबिलोन मधील भिंती (उंची ३३५ फूट, जाडी ८५ फूट) व इष्टिका लेख, ४ ऑलिंपिया येथील ज्युपिटरचा पुतळा (ग्रीस), ६ हॅलिकानेंस येथील कबर (आशिया मायनर), र्‍होडस येथील सूर्यदेवतेचा पुतळा आणि ७ अलेक्झांड्रिया बंदराच्या प्रवेशद्वारावरील दीपगृहः
(मध्ययुगीन)
(आ) १ रोम येथील अँफी थिएटर, २ रोम येथील शववापिका, ३ चीनमधील मोठी मिंत (लांबी २५०० मैल), ४ इंग्लंडमधील पाषाणवलय, ५ पिसा येथील झुकता मनोरा, ६ ईजिप्तमधील पिरामिड अगर राजांचीं थडगीं आणि ७ कॉन्स्टँटिनोपल येथील सेंट सोफियाचें मंदिर हीं जगांतील सात आश्चर्यें होत ;
(अर्वाचीन)
(इ) १ बिनतारी संदेश यंत्र, २ दूरध्वनि यंत्र (रेडिओ), ३ टेलिव्हिजन व बोलपट, ४ विमान, ५ रेडियमचा शोध, ६ विच्छिन्न किरणद्वारा पृथक्करण आणि ७ 'क्ष' किरण आणि अतिनील किरण यांचा शोध ;
(ई) १ एम्पायर स्टेट बिल्डंग (न्यूयॉर्क), २ पनामा कालवा, ३ लंडनमधील तळघरें, ४ गोल्डन गेट ब्रिज (सॅन्‌‍फॉन्सिस्को), ५ अस्वान धरण (ईजिप्त), ६ वॉशिंग्टनचें स्मारक ७ सिंधु नदीवरील लॉइड बराज.
सात आश्चर्यें (भारतांतील)   
(अ) १ आग‍र्‍याचा ताजमहाल, २ वेरूळचीं लेणीं, ३ विजापुरचा गोलघुमुट, ४ कुतुबमिनार - दिल्ली ५ मीनाक्षी मंदिर - मदुरा, ६ श्रवणबेळगोळ (म्हैसूर राज्य) येथील गोमटेश्वारचा प्रचंड पुतळा उंची ७० फूट (या पुतळ्यावर असलेल्या आद्य ज्ञाअ मराठी लेखांतील 'श्री' ची उंची सुमारें दीड फूट आहे) आणि ७ चितोडा येथील जयस्तंभ (१२२ फूट उंची व ९ मजल्याचा). इतका भव्य स्तंभ जगांत कोठेंहि नाहीं. (वैदिक संस्कृतीचा विकास). ब्राह्मणांनीं वेदग्रंथ मुखोद्नत करून वेदांचें रक्षण केलें हें आठवें आश्चर्य आहे ;
(आ) १ अम्रृतसरचें सुवर्णमंदिर, २ म्हैसूरचें बृंदावन उद्यान, ३ काश्मीरमधील शालीमार बगीचा, ४ गिरसप्पा धबधबा (म्हैसूर राज्य), ५ अजिंठा लोणीं, ६ बावनगजा येथील ऋषभ - देवमूर्ति (अखंड शिळेंत कोरलेली. उंची ८४ फूट, बडवानीहून ५ मैल - म्ध्यभारत) व ७ भाकरानानगल धरण. (पूर्व पंजाब).
सात आसरा (अप्सरा) अथवा जलदेवता   
१ मच्छी, २ कूर्मी, ३ कर्कटी, ५ दर्दुरी, ५ जतुपी, ६ सोमपा व ७ मकरी, (प्रसाद)
सात आचार्य - बारा अळवारीच्या   
नंतरच्या कालांत (दहावें शतक) दक्षिण भारतांत सात आचार्य होऊन गेले तेः - १ शठकोपमुनि (नम्माळवार), २ नाथमुनि ३ पुंडरीकाक्षु, ४ राममिश्र, ५ यामुनाचार्य, ६ महापूर्ण व ७ रामानुजाचार्य. (रहस्यत्रयसार)
सात उपाय   
१ साम, २ दाम, ३ भेद, ४ दंड, ५ मंत्र, ६ औषधि व ७ इंद्रजाल. (मंत्रविद्या)- हे सात उपाय राजनीतिशास्त्रांत सांगितले आहेत. ([म. भा. सभा. ५-२२]).
सात कसोटया (ग्रंथतात्पर्यनिर्णयाच्या)   
१ आरंभ, २ शेवट, ३ अभ्यास म्हणजे पुनरुक्ति किंवा वारंवार काय सांगितलें आहे हें पाहणें, ४ अपूर्वता, ५ फल (ग्रंथाच्या अभ्यासाचा वाचकांवर घडलेला परिणाम), ६ अर्थवाद (पोकळ स्तुति) आणि ७ उपपत्ति (तर्कशुद्ध विचारसरणी).
उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वता फलम् ।
अर्थवादोपपत्ती च लिंगं तात्पर्यनिर्णये ॥ ([गी. र. २१]).
सात कारणें (पापाचीं)   
१ प्रगतीचा रूढ मार्ग बंद होणें, २ मद्य - पान, ३ क्रोधी स्वभाव, ४ जुगार, ५ कामाकडे लक्ष लागेनासें होणें, ६ हीन माणूस थोर हुद्यावर येणें आणि ७ आळस वाढणें,
हीं पापाकडे प्रवृत्ति होण्याचीं सात कारणें आहेत. ([ऋग्वेद ७-८६-६])
सात काल विभाग   
१ अयन, २ ऋतु, ३ मास, ४ पक्ष, ५ दिन ६ रात्र आणि ७ मुहूर्त.
सात कार्य मर्यादा यज्ञाच्या   
१ स्थूल शरीर, २ वासनाशरीर, ३ बहिर्मानस शरीर, ४ अन्तर्मानस शरीर, ५ बुद्धि, ६ परशुद्धि आणि ७ जीव. यज्ञकार्य या सा मर्यादांदध्यें होतें. मनुष्याच्या कार्याच्या याच मर्यादा आहेत. (पुरुषपूक्त स्पष्टीकरण)
सात कुलीन लक्षणें   
१ तप, २ इंद्रियदमन, ३ अध्ययन, ४ अध्यापनादि कर्में, ५ पवित्र विवाह, ६ सतत अन्नदान आणि ७ सदाचरण.
सात कोंकणें (महाराष्ट्राचीं)   
१ लाट, २ डांग, ३ शूर्पारक, ४ अष्टागर, ५ तळकोंकण, ६ गोमांतक आणि ७ वनवासी.
साअ कोंकणें (सह्याद्रीचीं)   
(अ) १ कूपक, २ केरळ, ३ मूषक, ४ आळूक, ५ पशु, ६ कोंकण आणि ७ परकोंकण. (प्रपंच ह्रदय)
(आ) १ केरळ, २ तुलंग, ३ सौराष्ट्र, ४ कोंकण, ५ करहाट, ६ कर - नाटक व ७ बर्बर.
"इत्येते सप्तदेशा वै कोंकणाः परिकिर्तिताः"(सह्याद्रि खंड)
सात गुण ऋषींचें   
१ दीर्घजीवन, २ मंत्रसाक्षात्कार, ३ शापानुग्रह - शक्तित, ४ दिव्यद्दष्टि, ५ प्रबुद्धता, ६ धर्म प्रत्यक्ष दिसणें आणि ७ गोत्रप्रवर्तन.
सात गुण दूतास आवश्यक   
१ कुलीनत्व, २ कुटुंबवत्सलता, ३ भाषणचातुर्य, ४ दक्षता, ५ प्रियभाषित्व, ६ स्मरणशक्ति व ७ सांगितलें असेल तेंच बोलणें.
कुलीनः कुलसंपन्नो वाग्मी द्क्षः प्रियं वचः।
यथोक्तवादी स्मृतिमान्दूतः स्यात्सप्तभिर्गुणैः ॥ ([म. भा. शांति. ८५-२९])
(आ) १ गुणी, २ शुद्ध ३ चातुर्यनिपुण, ४ अवगुणरहित, ५ क्षमाशील, ६ बुद्धिमान् व ७ शत्रूचें मर्म जाणणारा. (तुलसी. रामायण - टीप)
सात गुण वक्ता व श्रोता या उभयतांसहि आवश्यक   
१ सिंहाव - लोकन, २ वश्यमाण, ३ उपमा, ४ रूपक, ५ विशेषण, ६ उपक्रम व ७ उपसंहरण, 'हे सप्तगुण उभयांसी ॥' ([हरिवरदा १-७७५])
सात गुण (वधूचे)   
१ कुल, २ शील, ३ शरीर, ४ वय, ५ विद्या, ६ वित्त आणि ७ सनाथता.
सात गुण (वराचे)   
१ कुल, २ शील, ३ पालक, ४ विद्या, ५ द्रव्य, ६ शरीर आणि ७ वय.
कुलं च शीलं च वयश्च रूपं विद्यां च वित्तं च सनाथतां च।
एतान् गुणान् सप्त परीक्ष्य देया कन्या बुधैः शेषमचिंतनीयम् ॥ ([सु.])
सात गुण (सन्मित्राचे)   
१ प्रामाणिकपणा, २ औदार्य, २ शौर्य, ४ सुखदूःखांत समरसता, ५ प्रेम, ६ दक्षता व ७ खरेपणा.
शुचित्वं त्यागिता शौर्यं सामान्यं सुखदुःखयोः।
दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृद्‌गुणाः। ([हितो.])
सात गुण (क्षत्रियाचे)   
१ शौर्य, २ तेजस्विता, ३ मनोधैर्य, ४ कर्तव्यजागरुकता, ५ युद्धपराङ्‌‍मुख न होणें, ६ दातृत्व आणि ७ शासन - प्रभुत्व. ([भ. गी. १८-४३])
सात गुरु   
१ मातापिता, २ सुईण, (लेकरू असतांना न्हाऊंमाखूं घालते), ३ विद्यागुरु, ४ उपाध्याय, ५ ज्योतिषी, ६ मंत्र देणारा आणि ७ मोक्षदाता सद‌‍गुरु. ([सि. बो. ५०-१८])
सात गोष्टींत अतिरेकानें विनाश   
१ व्यायाम, २ जागरण, ३ प्रवास, ४ स्त्रीसमागम, ५ अतिहास्य, ६ अतिबडबड व ७ कोणतेहि अतिरिक्त साहस.
व्यायामजागराध्वस्त्रीहास्यभाष्यातिसाहसम् ।
गजं सिंह इवाकर्षन भजन्नपि विनश्यति ॥ ([वाग्भट अ. २२-३])
सात गोष्टींत अनृत भाषण निंद्य होत नाहीं   
१ स्त्रीला वश करतांना, २ विनोदप्रसंगीं, ३ विवाह, ४ उपजीविकेचें साधन मिळवते वेळीं, ५ प्राणसंकट साल्यावेळीं, ६ गोब्राह्मणहितार्थ व ७ एखाद्याची हिंसा टाळण्यासाठीं.
स्त्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राणसंकटे।
गोब्राह्मणहितार्थे हिंसायां नानृतं स्याज्जुगुप्सितम् ॥ (भा. ८-१९-४३)
सात गोष्टींत श्रीमद्भागवताचें सार   
१ श्रीकृष्णजन्मकथन, २ श्रीकृष्णाचें बालपण, ३ पूतनावध, ४ गोवर्धन पर्वत उचलुन धरिला, ५ कंसवध, ६ कौरबांचा निःपात आणि ७ पांडवांचा प्रतिपाळ. ([भागवत])
सात गोष्टी प्रकट करूं नयेत   
१ सिद्धमंत्र, २ औषध, ३ दानधर्म, ४ गृहच्छिद्र, ५ मैथुन, ६ पाकदोष व ७ निंद्यगोष्ट.
सिद्धमन्नौषधं धर्मं गृहच्छिद्रं च मैथुनं।
कुभूक्तं कुश्रुतं चैव मतिमान् न प्रकाशयेत् ॥ (बुधभूषणा)
सात गोष्टी विद्यासंपादनांत विध्न आणणार्‍या   
१ आळस, २ उद्धटपणा, ३ दुश्चित्तपणा, ४ गप्पेबाजी, ५ घुम्मेपणा, ६ स्वतःला सगळें येतें असा अभिमान आणि ७ दुराग्रह, ([म. भा. उद्योग. ४०-५])
सात गोष्टी श्रद्धेय व भावनेप्रमाणें फल देणार्‍या होत   
१ मंत्र, २ तीर्थ, ३ ब्राह्मण, ४ देव, ५ ज्योतिषी, ६ औषधी व ७ गुरु.
मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ।
याद्दशी भावना यस्य सिद्धिर्मवति ताद्दशी ॥ ([पंचतंत्र])
सात गोष्टी सेवेला आवशयक   
१ विश्वास, २ पतिव्रता, ३ गौरव, ४ संयम, ५ शुश्रूषा, ६ प्रेम आणि ७ मधुर भाषण,
सात ग्रामवासी प्राणी   
१ गाय, २ शेळी, ३ मेंढी, ४ मनुष्य, ५ घोडा, ६ खेचर आणि ७ गाढव.
गौरजानि मनुष्यश्च अश्चाश्वतरगर्दमः।
एते ग्राम्याः समाख्याताः पशवः सप्त साधुभिः ॥ ([म. भा. भीषम.])
साती ग्रंथ   
१ शिशुपापवध, २ एकादशस्कंद, ३ नरेंद्र - रुविमणी स्वयंवर, ४ वत्सहरण, ५ रिद्धपूरवर्णन, ६ सह्माद्रिवर्णन व ७ ज्ञानप्रबध.
महानुभाव सांप्रदायाच्या या सात ग्रंथांना म्हणतात. (महानुभावीय मराठी वाङमय)
सात तत्त्वें जगाचा आधार असलेलीं   
१ पृथ्वी, २ आप, ३ तेज, ४ वायु, ५ आकाश, ६ तन्मात्रा आणि ७ महत्तत्त्व. हें जग या सात तत्त्वांच्या आधारें चाललेलें आहे. ([अथर्व - अनु - मराठी])
सात ताप (क्लेश) विद्वानांना होणारे   
१ आधिभौतिक, २ आधिदैविक आणि ३ आध्यात्मिक हे तीन सर्व साधारणांसहि होणारे पण (अपमानाचें मय) ६ विस्मय (चूकभूल होण्याची चिंता) आणि ७ गर्व - विद्वत्तेचा अभिमान ([कल्याण नंवबर १९६२])
सात तारा वीणेच्या   
१ मध्यम (मध्यसप्तक), २-३ षड्‌‍ज जोड (मध्यसप्तक), ४ खर्ज, ५ मध्यम (तारसप्तक), ६ पंचम (तारसप्तक),
व ७ षड्‌ज् (तारसप्तक).
सात ताल (संगीत शास्त्र)   
गायनांत तालाला महत्त्व आहे. असे सात ताल आहेत ते - १ ध्रुवताल - आडाचौताल, २ मठय - सुरफाक, ३ रूपक - दादर, ४ झंपा - झपताल, ५ त्रिपुट - तेवरा, ६ अठताल - दीपचंदी व ७ एकताल - धुमाळी - केरवा.
अठतालैकतालौ च सप्त तालाः प्रकीर्तिताः ॥ (संगीत प्रवेश)
सात तामसी विद्या   
१ जारण, २ मारण, ४ मोहन, ४ उच्चाटन, ५ आकर्षण, ६ वशीकरण व ७ स्तंमन (तत्त्व - निज - विवेक)
सात देवता सिद्धि देणार्‍या   
१ नृसिंह, २ राम, ३ विष्णु, ४ शंकर, ५ अंबिका, ६ गजानन आणि ७ गुरु.
नृसिंहरामौ विष्णुश्च शंकर श्वांबिका तथा।
गजाननो गुरुश्चैव सप्तैते सिद्धमंत्रदाः ॥ ([सु.])
सात दोष (वधूचे बाबतींत)   
१ भुरे केस असलेली, २ अधिक अवयवांची, ३ असाध्य रोगग्रस्त, ४ मुळींच केस नसलेली, ५ अति केस असलेलि, ६ वाचाळ आणि ७ मांजरासारखे डोळे असलेली.
नोद्वहेत् कपिलां कन्यां नाधिकाङ्रीं न रोगिणीम् ।
नालोमिकां नातिलोमां न वाचालां न पङ्रींलाम् ॥ ([मनु. ३-८])
सात दोष (स्त्रियांच्या बाबतींत)   
१ अनृत, २ साहस, ३ माया. ४ मूर्खत्व, ५ अति लोभ, ६ अशुचिता व निदर्यत्व.
अनृतं साहंस माया मूर्खत्वमतिलोभता।
अशौचं निर्दयत्वं च स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ॥ ([देवी भाग.])
सात द्वारें (उच्चार न करितां खोटें सांगण्याचीं)   
१ दोन डोळे, २ दोन कान, ३ दोन नाकपुडया व एक मुख.
या सात द्वारांनीं मनांतील उद्देश खरा किंवा खोटा सांगता येतो. डोळे मिचकावणे, कानांवर हात ठेवणें, नाक वांकडें करणें, वगैरे प्रकारांनीं खोटें सांगतां अगर कळवितां येतें. ([राम. गी. १५-५७])
सात निसर्गाचीं औधधें   
१ अन्न, २ पाणी, ३ हवा, ४ सूर्य किरणें, ५ विश्चांति, ६ स्वच्छता व ७ व्यायाम (अकं शास्त्र)
सात पद्धति (द्रव्य मिळविण्याच्या)   
१ दाय - वडिलर्जित धन, २ लाभ - निधि प्राप्त होणें, ३ क्रय - व्यापार, ४ जय (विजय), ५ प्रयोग - व्याजबट्टा, ६ प्रत्यवरोहण आणि ७ अष्टकाहोम.
सात पाकयज्ञसंस्था   
१ स्थालीपाक (पार्वण), २ अष्टका - ३ अमाश्राद्ध (मासिक श्राद्ध) ४ औपासन होम, ५ श्रावणी, ६ आग्रहायणी व ७ चैत्री (शूलगव). या सातपाकयज्ञसंस्था होत. आर्यांचे संस्कार (पूर्वार्ध)
सात पिण्डफल वृक्ष   
१ खजूर, २ ताड, ३ शिंदी, ४ ताल, ५ खजूरी, ६ पोफळ व ७ माड. हे सात पिंडासारखीं फळें असलेले वृक्ष होत.
खर्जूरस्तालहिंतालौ ताली खर्जूरिकास्तथा।
गुवाका नारिकेलश्च सप्त पिण्डफलद्रुमाः ॥ ([सु.])
सात पूजेचीं अधिष्ठानें   
१ प्रतिभा, २ स्थंडिल, ३ अग्नि, ४ सूर्य, ५ उदक, ६ हृदय व ७ ब्राह्मण, (ब्रह्मज्ञानी) ([भाग ११-२७-९])
सात प्रकारचे ऋषि   
१ देवर्षि, २ ब्रह्मर्षि, ३ रजर्षि, ४ महर्षि, ५ परमर्षि, ६ श्रुतर्षि आणि ७ कांडर्षि.
सात प्रकार ऋषिगणांचे   
१ ब्रह्मर्षि - भृगु, अंगिरा इ., २ देवर्षि - नारद, पर्वत इ., ३ महर्षि - व्यास, वसिष्ठ इ., ४ परमर्षि - पराशर, भेल इ., ५ तै. सं. च्या पांच कांडाचे द्र्ष्टे ते कांडर्षि, ६ श्रुतर्षि - सुश्रुत, चरक इ. व ७ राजर्षि - ऋतुपर्ण. ([संस्कृति कोश])
सात प्रकार जाणिवेचे   
१ क्रोध, २ लोंभ, ३ मोह ४ मद, ५ मत्सर, ६ आनंद आणि ७ दुःख ([ज्ञानेश्वरी अ. १२])
सात प्रकारचे गुरु   
१ गुरु, २ माता, ३ पिता, ४ सूर्य ५ चंद्र, ६ अग्नि आणि ७ मंत्रदाता. हे सात प्रकारचे गुरु होत.
'मन्त्रदाता गुरुः ख्यातः सप्तमः परिकीर्तितः ॥'
सात प्रकारचे जल   
१ आसिजल, २ मासीजल, ३ महीजल, ४ अहीजल, ५ पाण्याजल, ६ वंजालजल आणि ७ ?
सृष्टीच्या उत्पत्तिकालीं जल उत्पन्न झालें तेव्हां असें सात प्रकारचें जल होतें अशी गोंडी लोककथा आहे. (प्रतिष्ठान. १९५४)
सात प्रकार तांडव नृत्याचे   
१ आनंद तांडव, २ प्रदोष तांडव, ३ कालिका तांडव, ४ त्रिपुर तांडव, ५ गौरी तांडव, ६ ऊर्ध्व तांडव व ७ संहार तांडव (शैवागम)
सात प्रकारचे दर्भ   
१ दर्भ, २ काश (एक प्रकारचें गवत), ३ दुर्वा, ४ सातूचीं पानें, ५ व्रीहि, ६ मोळ व ७ पांढरसाळ.
कुशाः काशास्तथा दूर्वा यवपत्राणि व्रीहयःअ।
बल्वजाः पुण्डरीकाश्च कुशाः सप्त प्रकीर्तिताः ॥ ([पद्म. सृष्टि, ४९-३६])
सात प्रकारचीं दानें   
१ अन्नदान, २ संपत्तिदान, ३ भूदान, ४ बुद्धिदान, ५ श्रचदान, ६ रक्तदान व ७ जीवदान.
सात प्रकार दीक्षेचे   
१ क्रियावती, २ कलावती, ३ वर्णमयी, ४ वेधमयी, ५ मंत्री, ६ आणवी व ७ शांमवी. (प्रसाद)
सात प्रकारचे दुष्टजन   
१ सदोदित दुष्कृत्याकडे धांवणारा, २ धर्माकडे मुळींच लक्ष न देणारा, ३ झोपाळू, ४ व्यसनासक्त, ५ मद्यपि, ६ अगम्य स्त्रीशीं गमन करणार आणि ७ सदोदित दुष्टांशीं संभाषण करणारा.
अकार्ये भ्रमते नित्यं धर्मार्थे न व्यवस्थितः।
निद्रलुर्व्यसनासक्तो मद्यपः स्त्रीनिषेवकः।
दुष्टैःसह सदालापः स दुष्टः सप्तधा स्मृतः ॥ ([भविष्य - मघ्यम ५-५४])
सात प्रकारचे देशविशेष   
१ जंगली प्रदेश, २ गांव वसलेला प्रदेश, ३ डोंगराळ, ४ पाणथळीचा, ५ वाळवंटाचा, ६ पठार व ७ उंचसखल.
असें युद्धशास्त्राच्या द्दष्टीनें सात प्रकारचे देशविशेष होत. ([कौटिल्य. अधिकरण ९-१])
सात प्रकार प्राणायामाचे   
१ रेचक, २ पूरक, ३ कुंभक, ४ उत्कर्ष, ५ अपकर्ष, ६ शून्य व ७ उत्क्रांति. (परमानुभवबोध)
सात प्रकारांनीं मिळालेलें धन धर्मसंमत   
१ परंपरागत म्हणजे वारसाहक्कानें मिळालेलें, २ निधिलाभ, ३ क्रयविक्रय, ४ विजय, ५ न्याय्य वृद्धि, ६ कृषि - वाणिज्य आणि ७ शास्त्र्संमत दान. ([मुन. १०-११५])
सात प्रकारचे यज्ञ   
१ ब्रह्मयज्ञ, २ द्रव्ययज्ञ, ३ शरीरयज्ञ, ४ वाग्यज्ञ, ५ प्राणयज्ञ, ६ बुद्धियज्ञ, २ द्र्व्ययज्ञ, ३ शरीयज्ञ, ४ वाग्यज्ञ, ५ प्राणयज्ञ, ६ बुद्धियज्ञ, ७ कर्मयज्ञ.
सात प्रकारचें युद्ध   
१ धनु, २ चक्र, ३ कुंत (भाला), ४ खड्‌ग, ५ क्षुरिका, ६ गदा आणि ७ बाहुयुद्ध.
असे युद्धाचे सात प्रकार प्राचीन काळीं असत. ([जामदग्न्य धनुर्वेद अ. १])
सात प्रकारच्या लज्जा   
१ जनोलज्जा, २ मनोलज्जा, ३ वयोलज्जा, ४ धर्मलजा, ५ कर्मलज्जा, ६ जातिलज्जा आणि ७ कुललज्जा.
सात प्रकारच्या लज्जा   
१ जनोलज्जा, २ मनोलज्जा, ३ वयोलज्जा, ४ धर्मलज्जा, ५ कर्मलज्जा, ६ जातिलज्जा आणि ७ कुललज्जा.
सात प्रकारचें वायु अंतरिक्षांतलें   
१ आवह - भूगीपासून मेघ - मंडलापर्यत,
२ प्रवह - मेघमंडलापासून सूर्यमंडला पर्यंत,
३ उद्वह - तिसर्‍या मंडलांतील,
४ संवह - चंद्रमंडलापासून नक्षत्रमंडलापर्यंत,
५ विवह - नक्षत्र - मंडलापर्यंत,
६ षष्टापरा अथवा परिवह शनिमंडलापासून सप्तर्षिपर्यंत, आणि
७ परावह - सप्तर्षिपासून ध्रुवापर्यंत.
असे अंतरिक्षांत संचारणारे वायुमंडलाचे सात मार्ग वा सात भाग आहेत. यांसच सप्तस्कंध असेंहि म्हणतात.
परावहो नाम वरो वायुः स दुरतिक्रमः।
एवमेते दितेः पुत्रा मरूतः परमाद्‌भुताःअ ॥ ([बृहन्नारदीय पूर्व ६०-३२])
सात विपर्यास (दोष) चित्र संबंधीं   
१ युगविपर्यास, २ ऋतु - विपर्यास ३ कालविपर्यास, ४ वस्तुविपर्यास, ५ चालीरीतींचा विपर्यास, ६ स्थानविपर्यास, व ७ जातिविपर्यास.
असे सात दोष चित्रसंबंधीं मानले आहेत. ते चित्रकारानें टाळावेत. ([म. ज्ञा. को. वि. १३])
सात शिष्यवर श्रीकृष्णाचे   
१ ब्रह्मा, २ मन, ३ वेदव्यास, ४ दैवव्यास, ५ अर्जुन, ६ उद्धव आणि ७ भीष्म.
अर्जुन आणि उद्धव। गंगासुत भीष्मदेव।
हे सप्त शिष्य जाणव। श्रीकृष्णाचे ॥ ([दर्शनप्रकाश])
सात प्रकारचे विडे   
१ कातरविडा, २ कापूरविडा, ३ कुलपीविडा, ४ गोविंदविडा, ५ गोंदविडा, ६ मोडविडा आणि ७ मोदकविडा.
यांखेरीज बोंडीविडा, गोपाळविडा असे आणखी कांहीं प्रकार आहेत.
सात प्रकारच्या व्याघि   
१ आदिबलप्रवृत्त - आनुवंशिक, २ जन्मबलप्रवृत्त, ३ दोषबलप्रवृत, ४ संघातबलप्रवृत्त - अपघात वगैरेमुळें होणारे, ५ कालबलप्रवृत्त - स्वामाविक ऋतुमानामुळेंज उत्पन्न होणारे, ६ दैवबलप्रवृत्त आणि ७ स्वमाबबलप्रवृत्त म्हणजे तहान, भूक, निद्रा इत्यादि शरीरधर्मामुळें स्वामाविकपणें होणारे व्याधींचे सात प्रकार. ([सुश्रुत - शारीर])
सात प्रकार शैवांचे   
१ अनादिशैव ([शिव]) ३ आदिशैव - कौशि - कादिऋषि, ३ महाशैव - द्विजवुलसमस्त, ४ क्षेत्री (क्षत्रिय) अनुमवशैव, ५ शूद्र - अवतारशैव, ६ प्रवरशैव - विशेष जाति समस्त आणि ७ अंतरशैव - अंबष्ठादिसमस्त. ([विवेक चिंतामणि])
सात प्रकारचे संतान   
(अ) १ विहीर बांधणें, २ तलाव बांधणें, ३ उद्यान तयार करणें, ४ समागृह बांधणें, ५ पाणपोई, ६ सत्पात्रीं धर्म व ७ पुत्रोत्पत्ति, असें सात प्रकारचें संतान म्हणून सांगितलें आहे.
कूपस्तडागमुद्यानं मंडपं च प्रपा तथा।
सद्धर्मकरणं पुत्रः संतानं सप्तधोच्यते ॥ (वै. म. ३-३४)
(आ) १ मुलीचा मुलगा, २ पाळलेला मुलगा, ३ शिष्य, ४ उद्यान, ५ विहीर वा जलाशय निर्माण करणें, ६ अभिजात ग्रंथ निर्मिति व ७ प्रत्यक्ष पुत्र असे सात प्रकार होत.
दौहित्रः पोषितः शिष्य आरामश्च जलाशयः।
सद्‌ग्रंथकरणं पुत्रः सप्तपुत्राः प्रकीर्तिताः ॥ ([आनंद रामायण])
सात प्रकारच्या संवेदना (मानसशास्त्र)   
१ जीवनन्यापी संवेदना, २ त्वचिक संवेदना, ३ चलन - संवेदना, ४ रस - संवेदना, ५ गंध - संवेदना, ६ ध्वनि - संवेदना आणि ७ द्दष्टि - संवेदना.
सात प्रकारचे साधकांचे अधिकार   
१ दीक्षा, २ महादीक्षा, ३ पुरश्चरण, ४ महापुरश्चरण, ५ अभिषेक, ६ महाभिषेक व ७ तद्भाव.
सात प्रकार साक्षात्कारी पुरुषांचे   
१ रूपदर्शी, २ तेजोदर्शी, ३ वर्णदर्शी, ४ नादश्रवा, ५ रसास्वादी, ६ स्पर्शानुमवी आणि ७ गंधानुमवी (रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान)
सात प्रकारचे स्वर काढणारे सात प्राणी   
१ षड्‌‍ज - मजूर, २ रिषम - वृषम, ३ गंधार - अज, ४ मध्यम - कौंच, ५ पंचम - कोकिळा, ६ धैवत - हय आणि ७ निषाद - गज. सा, री, ग, म, प, ध, नी - या सप्त स्वरांची पुरातन शास्त्रीय उपपत्ति अशी मानिली आहे. (गायनाचार्य माला)
सात प्रकार स्वप्नांचे   
१ भविष्यसूचक, २ प्रतीकात्मक, ३ परप्रेरीत, ४ भूतकालदर्शक, ५ दुसर्‍यासंबंधीं, ६ मिश्च व ७ चमत्कारिक स्वप्नें, (मॅडम ब्लॅव्हटस्की)
सत प्रकारच्या हुंडया   
१ दर्शनी हुंडी, २ मुदतहुंडी, ३ शाहजोग - हुंडी, ४ नामजोग हुंडी ५ धनीजोग हुंडी, ६ जोखमी हुंडी आणि ७ जबाबी (बँका आणि त्यांचे व्यवहार)
सात प्रकृति - विकृति तत्त्वें   
१ महत् - बुद्धि, २ अहंकार आणि ५ पंच तन्मात्रा (मिसळ न होतां प्रत्येक गुणाची अतिसूक्ष्म मूल स्वरूपें) ([सांख्य कारिका ३, गी. र. १७८])
सात प्रकार औषधी (आयुर्वेदीय) तयार करण्याचे   
१ पुटपाक, २ गर्तपाक, ३ वेणुपाक, ४ दोलपाक, ५ खर्परपाक, ६ बैजयूरपाक व ७ कालपाक (गंधसार)
सात प्रकार कीर्तीचे   
१ दानकीर्ति, २ पुण्यकीर्ति, ३ काव्यकीर्ति, ४ वक्तृत्वकीर्ति, ५ वर्त्नकीर्ति, ६ शौर्यकीर्ति व ७ विद्वज्जनकीर्ति. ([वस्तुरत्न कोश])
सात प्रमुख धर्म (जगांतील)   
१ वैदिक धर्म (सनातन), २ क्न्फ्यूशियस (चीन), ३ जैन धर्म, ४ बौद्ध धर्म, ५ झरतुष्ट्र धर्म, ६ खिरस्ती धर्म व ७ महमदी धर्म.
सात प्रमुख पद्धति योगाच्या   
१ ह्ठयोग, २ भक्तियोग, ३ मंत्रयोग, ४ कर्मयोग, ५ ज्ञानयोग, ६ राजयोग, व ७ लयक्रियायोग, ([Yoga explained])
सात प्रमुख प्रकार निबंध वाङमयाचे   
१ विवरणात्मक, २ वर्णनात्मक, ५ विवेचनात्मक, ४ व्याख्यात्मक, ५ आलोचनात्मक, ६ साहित्यिक - गंभीर निबंध व ७ ललित निबंध (निबंध प्रबोध)
सात प्रलयकालचे मेघ   
१ संवर्त, २ भीमनाद, ३ द्रोण, ४ चंड, ५ बलाहक, ६ विद्युत्पताक व ७ शोण. ([मत्स्य. २-८])
सात प्रसंगीं वपन विहित आहे   
१ गंगातीरीं, २ भास्करक्षेत्रांत ३ माता, ४ पिता, ५ गुरु यांच्या निधनप्रसंगीं, ६ अग्न्याधानकाळीं व ७ सोमयाग. अशा सात प्रसंगीं धर्मशास्त्रानें वपन विहित मानिलें आहे.
गंगायां भास्करक्षेत्रे मातापित्रोर्गुरोर्मुते।
आधानकाले सोमे च वपनं सप्त सुस्मृतम् ॥ (मिताक्षरा ३-१०)
सात भूमिका (अज्ञानाच्या)   
१ बीजजाग्रत्, २ जाग्रत्, ३ महाजग्रत,, ४ जाग्रत, ५ स्वप्न, ६ स्वप्नजाग्रत् आणि ७ सुषप्त या अज्ञानाच्या सात भुमिका आहेत. (यो. वा.)
सात प्राण मस्तकाचे ठिकाणीं असलेले   
१-२ कान, ३-४ दोन डोळे, ५-६ दोन नाकपुडया व ७ वाणी हे सात प्राण होत.
(तैत्तिरीय श्रुति)"सप्त वै शीर्षण्यः प्राणाः"
सात भूमिका मनुष्य जीवनांतल्या   
१ बाल्य, २ पौगंड, ३ प्रेमिक, ४ सैनिक, ५ चाळिशी उलटलेली, ६ न्यायाधीश व ७ वृद्धावस्था, जग ही एक रंगभूमि असून तींत मानवजीवनांतल्या या सात भूमिका असतात. (As you like it)
सात भूमिका योग्याच्या योगाच्या   
१ श्रवण, २ मनन, ३ निदिध्यासन, ४ विलापनी, ५ आनंद स्वरूपाची प्राप्ती, ६ स्वसंवेदनरूप तुर्यावस्था व ७ केवल विदेह - मुक्ति (तुर्यातीत अवस्था) (यो वा. निर्वाण प्रकरण)
सात मित्रदूषणें   
१ गुह्म प्रकट करणें, २ याचना, ३ निष्ठुरता धरणें, ४ चंचल स्बभाव, ५ राग, ६ खोटें भाषण आणि ७ जुगार,
रहस्यमेदो याच्ञा च नैष्ठूर्यं चलचित्तता।
क्रोधो निःसत्यता द्यूतमेतद्वै मित्रदूषणम् ॥ ([सु.])
सात मुद्रा   
१ खेचरी, २ भूचरी, ३ चाचरी, ४ अलक्ष, ५ अगोचरी, ६ त्राटक आणि ७ षण्मुखी मुद्रा. ([योगशास्त्र])
सात मूलभूत गंध घ्राणोंद्रियाला समजणारे   
१ अगदीं तरल गंध, २ कर्पूरासमान गध, ३ कस्तूरीसमान, ४ पुष्प गंध, ५ पुदीना वर्ग ६ तिखट आणि ७ दुर्गंध.
इतर सर्व गंध या मूलभूत सात गंधाच्या मिश्रणानें बनले आहेत. (चित्रमयजगत् ‌, आगष्ट १९६३)
सात मोक्षधर्मप्रवर्तक   
१ सन, २ सनत्सुजात ३ सनक, ४ सनंदन, ४ सनत्कुमार, ६ सनातन आणि ७ कपिल. हे सात प्रमुख सांख्यज्ञानविशारद व मोक्षधर्मप्रवर्तक होत.
एते योगविदो मुख्याः सांख्यज्ञानविशारदाः।
आचार्या धर्मशास्त्रषु मोक्षधर्मप्रवर्तकाः ॥ ([सु.])
सात मंत्रसिद्धीचे उपाय   
१ भ्रामण, २ रोधन ३ वश्य, ४ पीडन, ५ पोषण, ६ शोषण आणि ७ दाहन. ([कल्याण साधनांक])
सात यज्ञ   
१ अग्निष्टोम, २ अश्वमेध, ३ बहुसुवर्णक, ४ राजसूय, ५ गोमेध, ६ वैष्णव आणि ७ माहेश्वर,
असे सात प्रकारचे यज्ञ करून रावणपुत्र इंद्रजितानें सिद्धि मिळालेली होती. ([भा. रा. उत्तर. अ. २९])
सात रथी यादव सैन्यांतील   
१ चारुदेष्ण, २ चक्रदेव, ३ सात्यकि, ४ श्रीकृष्ण, ५ बलराम, ६ सांब व ७ प्रद्युम्न. ([म. भा. सभा, १४-५८])
सात महारथी यादव सैन्यांतील   
१ कृतवर्मा, २ अनाधृष्टि ३ समीक, ४ समितिंजय, ४ कंक, ६ शंकु व ७ कुंति, ([म. भा. सभा. १४-५९])
सात रानधान्यें   
१ कुलित्थक - कुळीथ, २ श्यामक - सांवे, ३ नीवार - देवसाळी, ४ जर्तिल - रानतीळ, ५ गवेधुक - तृणधान्य, ६ वेणुयन - वेळूचें बीं आणि ७ सर्कंटक - एक प्रकारचें धान्य. ([वि. पु.])
सात रुद्रगण   
१ शंकुकर्ण, २ महाकर्ण, ३ कुंभकर्ण, ४ सागरालय, ५ गजेंद्रकर्ण, ६ गोकर्ण, आणि ७ पाणिकर्ण.
असे सात रुद्रगण आहेत. परंतु शंकराशीं अभिन्न असल्यामुळें त्यांचींच नांवें शंकरास दिलीं आहेत.
सात रेषा (हस्तसामुद्रिक शास्त्रांत)   
(अ) १ आयुष्यरेषा, २ मस्तकरेषा, ३ अंतःकरणरेषा, ४ धनरेषा, ५ आरोग्यरेषा, ६ रविरेषा आणि ७ मन्मथ (विवाह) रेषा,
अशा हातावरील रेषा हस्तसामुद्रिकांत सांगितल्या आहेत. (ब्रह्मलिखित),
(आ) १ आयुष्यरेषा, २ मस्तकरेषा, ३ अंतःकरणरेषा, ४ भाग्यरेषा, ५ विद्यारेषा, ६ बुधरेषा आणि ७ चंद्ररेषा.
सात ललितकला   
१ काव्य, २ गायन, ३ चित्रकला, ४ मूर्तिकला, ५ वास्तुकला, ६ नर्तनकला व ७ नाटयकला. अनेक माणसें एकस - समयावच्छेदेंकरून जिचा आस्वाद घेऊं शकतात ती ललितकला.
सात वस्तूंचा संग्रह कोठूनहि करावा   
१ स्त्रिया, २ रत्नें, ३ विद्या, ४ धर्म, ५ सदाचार, ६ सुभाषित आणि ७ विविधकला.
स्त्रियो रत्नान्यथो विद्या धर्मः शौचं सुभाषितम् ।
विविधानि च शिल्पानि समादेयानि सर्वतः ॥ ([मनु. २-२४०])
सात वार   
१ रविवार, २ सोमवार, ३ मंगळवार, ४ बुधवार, ५ गुरुवार ६ शुक्रवार आणि ७ शनिवार.
आदित्यःअ सोमो भौमश्च तथा बुधबृह्स्पती।
भार्गवः शनैश्चरश्चैव एते सप्त दिनाधिपाः ॥ ([अथर्व. ज्योतिय])
याच अर्थाचीं वारांचीं नांवें सर्व भाषांतून सर्वत्र आढळतात.
सात वैदिक छंद   
१ गायत्री, २ उष्णिह, ३ अनुष्टु्भ् ४ बृहती, ५ पंक्ति, ६ त्रिष्टुभ् आणि ७ जगती. छंद याचा अर्थ"मनाला प्रसन्न करणारें गानामध्यें रुचिर असें वृत्ताचें रूप."
सात वैदिक देणग्या (वेदमातेच्या)   
१ आयु, २ प्राण, ३ प्रजा, ४ पशु, ५ कीर्ति, ६ द्रविणं (धन) आणि ७ ब्रह्मवर्चसम् (ब्रह्मतेज).
सात व्यसनें राज्यशासकांनीं त्यागावींत   
१ कटु भाषण, २ कठोर दंड करणें, ३ धनाचा अपव्यय, ४ मद्यपान, ५ स्त्रियांसबंधीं आसक्ति, ६ शिकारींत कालहरण व जुगार.
सात शल्यें   
(अ) १ दिवसाचा निस्तेज चंद्र, २ यौवन संपलेली स्त्री, ३ कमलहीन सरोवर, ४ निरक्षर सुंदर मुख, ५ द्रव्यलोभी प्रभु अथवा धनी, ६ दारिद्रय असलेला सज्जन आणि ७ राजगृहांत दुर्जनांचा प्रवेश. हीं सात शल्यें होत.
शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृतेः।
प्रभूर्धनपरायणः सततदुर्गतः सज्जनो नृपाङ्रणगतः खलो मनसि सप्त शल्यानि मे ॥ ([भ. नी. ५६])
(आ) १ समाजकंटकापासून होणारा उपद्रब, २ गर्विष्ठ लोकांचा उद्दामपणा, ३ प्रेमभंगामुळें होणार्‍या मानसिक वेदना, ४ न्यायाच्या कामीं लागणारा अज्ञ लोकांकडून भिळणारे लत्तप्रहार व ७ दुर्वह प्रपंचमार डोकीवर घेऊन दुःसह आयुष्य कंठण्याचा प्रसंग. (हॅम्लेट अंक ३)
अतर्क्य असें दुर्दैव   
हें आठवें शल्य होत.
सात शब्दांत ब्रह्मविद्येचें   
रहस्य १ ब्रह्म - अक्षर म्हणजे अविनाशी तत्त्व, २ अध्यात्म - वस्तूंचा मूळ स्वभाव, ३ कर्म - सृष्टिव्यापार, ४ अध्हिभूत - नश्वरवस्तू - देह, ५ अधिदैवत - जीवात्मा, ६ अधियज्ञ - भगवंत आणि ७ अंतकालीं भगवंताचें स्मरण, या सात शब्दांत सर्व ब्रह्लाविद्येचें रहस्य भगवान् श्रीकृष्णानें अर्जुनास सांगितलें. ([भ. गी. ८-१ ते ५])
सात शारीर - संस्था   
१ अस्थिसंस्था, २ स्नायुसंस्था, ३ अभिसरणसंस्था, ४ श्वसनसंस्था, ५ पचनसंस्था, ६ उत्सर्जकसंस्था व ७ मज्जासंस्था.
अस्थि स्नायूचाभिसरणं श्वसनं पचनं तथा।
उत्सर्जकं च मज्जा च सप्त संस्था विशेषतः ॥ ([सु.])
सात षडगुणसंपन्न भगवद्भक्त   
१ वसिष्ठ, २ बामदेव, ३ नारद, ४ व्यास, ५ वाल्मीकि, ६ प्रह्लाद आणि ७ शुकाचार्य. ([चतुःश्लोकी भागवत])
सात 'स' कार दुर्लभ   
१ संपत्ति, २ सरस्वती, ३ सत्य (सचोटी), ४ संतति, ५ सदनुग्रह, ६ सत्ता आणि ७ सुकृतसंचय.
'सत्तासुकृतसंभाराः सकाराः सप्त दुर्लभाः।' ([सु.])
सात सत्याग्रही (रामायणकालीन)   
१ विश्वामित्र, २ सीतामाई, ३ लक्ष्मण, ४ केवट, ५ भरत, ६ श्रीराम आणि ७ शम्बूक.
या सातांनीं आपल्या ध्येयसिद्धीसाठीं सत्याग्रह केला होता. ([कल्याण - रामायणांक])
सात सहज प्रेरणा   
१ प्रेप्सा - आशा, २ जिजीविषा - जगण्याची इच्छा, ३ चिकीर्षा - करण्याची इच्छा, ४ जिज्ञासा, ५ शोक, ६ भय आणि ७ अतृत्पि. या सात सह्ज प्रेरणा होत. ([पातंजल योगसूत्रें])
सात साधनें उत्कर्षप्राप्तीचीं   
१ उद्योग, २ स्वार्थत्याग, ३ अहंपणाचा विसर, विश्वव्यापक प्रेम, ५ उल्हास, ६ निर्मयता व ७ स्वावलंबन. (स्वामी रामतीर्य)
सात साधनें कीर्तीचीं   
१ दान, २ पुण्य, ३ विद्या, ४ वक्तृत्व, ५ काव्य, ६ आर्जव व ७ शौर्य.
सात साधने ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यचीं   
१ सत्‌‍संग, २ गुरूपासून ज्ञान, ३ सार - असार विचार, ४ परमवैराग्य, ५ श्रवण, ६ मनन आणि ७ निदिध्यास. ([दा. बो.])
सात सिद्धांत   
१ पांचरात्रसिद्धान्त, २ कापिलसिद्धान्त, ३ अपान्तरतमसिद्धान्त - ४ ब्रह्मिष्ठसिद्धान्त, ५ पाशुपतसिद्धन्त, ६ हैरण्यगर्मसिद्धान्त आणि ७ शिबसिद्धन्त,
प्राचीन चौदा विद्यांखेरीज हे सात स्वतंत्र सिद्धान्त मानले आहेत. ([कल्याण - हिन्दु संस्कृति अंक]).
सात सिद्धमंत्र   
१ नृसिंह, २ राम, ३ विष्णु, ४ शंकर, ५ देवी, ६ गणेश व ७ गुरु.
मंत्रांत सांगितलेल्या फलांत तत्काल प्राप्ती होण्याचे सामर्थ्य ज्याला प्राप्त झाले आहे तो 'सिद्धमंत्र' म्हणतात.
नृसिंहरामौ विष्णुश्च शंकरश्चाम्बिका तथा।
गजननो गुरुश्चैव सप्तैते सिद्धमंत्रदाःअ ॥ (शारदातिलक)
सात सूर्य   
१ आरोग्य, २ भ्राज, ३ पटर, ४ पतंग, ५ स्वर्णर, ६ जोतिषिमान, व ७ विमार, जगाला प्रकाशित करणार्‍या सूर्यांत सात सूर्य समाविष्ट आहेत.
ख्रेरीज कश्यप नांवाचा आणखी एक आठवा सूर्य आपण पाहिल्याचें वैदिक कालचे खगोल शास्त्रज्ञ वर्णितात. ([तै - आरण्यक])
सात सोमसंरक्षक   
१ स्वान, २ भ्राज, ३ अंधारि, ४ बंभारि, ५ ह्स्त, ६ सुहस्त, आणि ७ कृशानु. हे सात जण सोमसंरक्षक होत. ([तैत्तिरिय १-२-७]), (वैदिक आर्यांचें ज्योतिर्विज्ञान)
सात सौभाग्य द्र्व्यें   
१ हळद, २ कुंकू, ३ शेंदूर, ४ काजळ, ५ गळसरी, ६ मंगळसूत्र आणि ७ चुडा.
हरिद्राकुंकुमश्चैव सिंदुरादिसमन्वितम् ।
कजलं कंठसूत्रं च सौमाग्यद्र्व्यमुच्यते ॥ (वार्षिक व्रतपूजाविधि)
सात संकटें (शेतीला)   
१ अतिवृष्टि, २ अनावृष्टि, ३ उंदीर फार होणें, ४ टोळधाड, ५ पांपरांचा उपद्रव, ६ स्वसैन्याकडून अथवा ७ परसैन्याकडून लुटालूट.
अतिबृष्टिरनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः।
स्वचक्रं परचकं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥ ([सु.])
सात स्त्रीजातीय विभूति   
१ कीर्ति, २ संपत्ति, ३ वाणी, ४ स्मृति ५ बुद्धि, ६ धैर्य आणि ७ क्षमा,
या सात स्त्रीजातींतील सात विभूति (परमेश्चरी अंश) होत.
एवं नारी माझरी। या सातहि शक्ति अवधारी ॥
ऐसे संसार गजकेसरी। म्हणतां जाहला ॥ ([ज्ञा. १०. २८०])
सात स्वदेशी शूंखला (सावरकरप्रणीत)   
१ वेदोक्तबंदी २ व्यवसायबंदी, ३ स्पर्शबंदी, ४ सिंधुबंदी, ५ शुद्धिबंदी, ६ रोटीबंदी आणि ७ वेटीबंदी.
महान् हिंदु राष्ट्राच्या एकतेला बाध आणाणार्‍या पण समाजांत फार खोलवर रुजलेल्या या सात बंद्या अथवा सात श्रृंखलाच होत. त्या उच्छेदून टाकल्याच पाहिजेत, असें स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीं आग्रहानें प्रतिपादिलें आहे.
सात स्वर्गप्राप्तीचीं महाद्वारें   
१ तप. २ दान, ३ शम, ४ दम, ५ लज्जा, ६ सरळपणा आणि ७ सर्वभूतीं दया. ([म. भा. आदि, ९०-२२])
सात स्वातंत्र्यें   
१ भाषण - स्वातंत्र्य व मतस्वातंत्र्य, २ शांततेनें शस्त्रशिवाय एकत्र जमणें, ३ संस्था व संघस्वातंत्र्य, ४ संचारस्वातंत्र्य, ५ वास्तव्य - स्वातंत्र्य, ६ संपत्तीचें संपादन, धारण व वासलात लावणें आणि ७ व्यवसाय - स्वातंत्र्य.
हीं सात स्वातंत्र्यें भारतीय नागरिकांना घटनेनें दिलीं आहेत. (हिंदी राज्यघटना)
सात स्थानें उच्चाराची   
१ ऊर्ध्व, २ तालु, ३ दांत, ४ कंट, ५ ओठ, ६ नाक, व ७ अप्रयत्न - सहज उच्चारण.
सात हांमद्वव्यें   
१ समिधा, २ तूप. ३ चरु (भात), ४ लाह्या, ५ मोहरी, ६ यव आणि ७ तीळ. हीं सात प्रकारचीं द्र्व्यें हवनीय होत.
सातजण आश्रयास अपात्र   
१ निरुद्योगी, २ अधाशी, ३ लोकांच्या द्वेषास पात्र झालेला, ४ कपटी, ५ निर्दय, ६ देशकाला न जाणणारा आणि ७ अनिष्ट वेष धारण करणारा. ([म. भा. उद्योग. ३७-३५])
सात जणांना चरणस्पर्श करूं नये.   
१ अग्नि, २ गुरु, ३ ब्राह्मण, ४ गया, ५ कन्या, ६ बृद्ध, आणि ७ शिशु, (व्र. चा ७-६)
सात जणांचा जन्मच परोपकारार्थ   
१ सूर्य, २ चंद्र, ३ मेघ, ४ बृक्ष, ५ नद्या, ६ गायी, व ७ सज्जन,
या सातांना परमेश्चरानें सृष्टीच्या आरंभीं परोपकारार्थच उत्पन्न केलें."एते परोपकाराय देवेन निर्मिताः"([सु.])
सातजप झोपले तरीहि जागृत करावे   
१ विद्यार्थी २ सेवक, ३ मार्गस्थ, ४ भुकेलेला, ५ भयभीत, ६ कोठीवाला आणि ७ राखणदार.
विद्यार्थी सेवकः पांथः क्षुधार्थी भयकातरः।
भाण्डारी प्रतिहारी च सप्त सुप्तान्प्रबोधयेत् ॥ ([वृ. चा. ९-६])
सातजण परभक्ष होत   
१ माश्या, २ डांस, ३ वेश्या, ४ उंदीर, ५ याचक, ६ ग्रामाधिकारी आणि ७ ज्योतिषी.
मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तथा।
ग्रामणीर्गणकश्चैव सप्तैते परमक्षकाः ॥ ([सौर. ६७-१८])
सातजण पित्यासमान   
१ जन्म देणारा, २ पालन करणारा, ३ सासरा, ४ थोरला भाऊ, ५ मंत्रदीक्षा देणारा, ६ अभय देणारा व ७ ज्ञान देणारा. (तत्त्व - निज - विवेक)
सातजणांमुळें पृथ्वीची धारणा होते   
१ गाय, २ ब्राह्मण, ३ वेद, ४ सती स्त्री, ५ सत्यवादी पुरुष, ६ लोभहीन मनुष्य व ७ दानशूर.
गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः।
अलुब्धैर्दानशीलैश्च सप्तभिर्धार्यते मही ([स्कंद. मोहश्चर २-७१])
सात जणी मातेसमान   
१ जन्मदात्री, २ गुरुपत्नी, ३ ब्राह्मणी, ४ राजपत्नी, ५ गाय, ६ दाई व ७ मातृभूमि. (तत्त्व - निज - विवेक)
सातजण योगपारंगत   
१ सुमन, २ कुमुद, ३ शुद्ध, छिद्रदशीं, ५ सुनेत्रक, ६ सुनेत्र आणि ७ अंशुमान . असे सातजण योगपारंगत होऊन गेले.
सुमनः कुमुदः शुद्धश्र्छिद्रदशीं सुनेत्रकः।
सुनेत्रश्चांशुमांश्चैव सप्तैते योगपारगाःअ ॥ ([मत्स्य २०-१८])
सातजण सत्कमीं क्षीण झाल्यामुळें अधिक शोभतात   
१ सहाणेवर घासलेला हिरा,
२ जखमी झालेला पराक्रमी असा शूर,
३ मदस्त्रावानें क्षीण झालेला हत्ती,
४ शरदूऋतूंत ओसरलेल्या नद्या,
५ प्रतिपदेचा चंद्र,
६ सुरतश्रमानें म्लान झालेली नवयौवना आणि
७ दान दिल्यामुळें धनहीन झालेले दाते.
मणिः शाणोल्लीढः समरविजयी हेतिनिहतो
मदक्षीणो नागः शरदि सरितः श्यानपुलिनाः ॥
कलाशेषश्चन्द्रः सुरतमृदिता बालललना।
स्तनिम्ना शोभन्ते गलितविभवाश्चार्थिषु जनाः ॥ ([भर्तृ. नीति. ४४])
सातजण साक्षीस वर्ज्य   
१ सामुद्रिक जाणणारा, २ पूवींचा चोर पण नंतर व्यापारी बनलेला, ३ शकुन वगैरे सांगून दुसर्‍यास फसविणारा, ४ वैद्य, ५ शत्रु, ६ मित्र आणि ७ नट, ([म. भा. उद्योग. ३५-४४])
सातजण सात गोष्टीमुळें वश्य   
१ देव - भावानें, २ राजसत्ताधारी - कलेमुळें, ३ कांता - धनानें, ४ शत्रु - कपटानें, ५ मित्र - सत्यानें, ६ पुत्र - कृपेनें आणि ७ मोक्ष - ज्ञानानें प्राप्त होतो.
भावेन देवं कलया नरेंद्रम । धनेन कांता कपटेन शत्रुं ॥
सत्येन मित्रं, कृपया च पुत्रम् । ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति ॥ ([सु.])
सातजण स्वर्गाचे अधिकारी   
१ आज्ञाधारख पुत्र, २ प्रतिष्ठित भार्या, ३ निःस्वार्थी सेवक, ४ गुरुजनांविषयीं आदर असलेला. ५ प्रजापालक शासक, ६ स्वधर्मरत ब्राह्मण आणि ७ धारातीर्थी पतन पावलेला वीर पुरुष. (चंद्रकांत भाग २ रा)
गीतासप्तक   
१ भगवद्नीता, २ रामगीता, ३ गणेशगीता, ४ शिवगीता, ५ देवीगीत, ६ कपिलगीता व ७ अष्टावक्रगीता. या सात प्रमुख गीत होत.
सप्ततीर्थे   
१ भगवद्भक्त, २ गुरु, ३ माता, ४ पिता, ५ पति, ६ पत्नी व ७ स्वतःचे शुचिर्मूत आचरण, हीं सप्ततीर्थे होत ([पद्म - भूमिखंड])
सात गुण क्षत्रियाचे   
१ शौर्य, २ तेज, ३ धैर्य, ४ दक्षता, ५ रणशूरत्व, ६ दातृत्व आणि ७ ईश्वर भाव - नियामकशक्ति ([भ. गी. १८-४३])
सात प्राकृत भाषाअ   
१ मागधी, २ अवंतिजा, ३ प्राच्या, ४ शूरसेनी, ५ अर्धमागधी, ६ बाल्हीका व ७ दाक्षिणात्या.
मागध्यवंतिजा प्राच्या शूरसेनार्धमागधी।
बाल्हीका दाक्षिणात्या च सप्तभाषा प्रकीर्तिताः ॥ ([भ. ना.])
सात मोक्षकला   
१ विवेकसहित प्रेम, २ शांति, ३ तृष्णात्याग. ४ संतोष, ५ एकांतवास, ६ आत्मज्ञान व, ७ परब्रह्मज्ञान (चातुर्य चिंतामणि)
सात शीलकला   
१ सत्संग, २ ब्रह्मचर्य, ३ पवित्रता, ४ गुरुसेवा, ५ सदाचार, ६ निर्मला - शास्त्र - ज्ञान व ७ यशप्रेम (चा. चिं.)

७     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : सात, सात

Related Words

   ७॥   ७ कोटी   ७ तारीख   heptad   septenary   septet   sevener   7   vii   seven   अश्र्रु पटपट गळून पडणें   कडेकरी   माळचा गुठ्ठा   चवार   शुध्दान्त   करवतणें   goup of 77   किमखाप   कठाणी   bedaux 75 percent wage (sharing) plan   अग्नि सौचिक   आंघ्रिक   खेदारु   खेवी   कान्हम   कावीस   उबहतमंझिलत   इसाला   इसोळा   कण्ही   करबडी   ऊठ   ऊठड   घुरमुळणें   जावरा   जिसाळी   झांब   भिडकणें   पावलीमर्द   नास्तालिक   तव्हय   डावस   शेळीचें कातडें आणि लांडग्याचें आंतडें   वढ्या   दुस्सर   विसिफ   विसीफ   अक्षमी   आतित्य   आधाडा   आनीबे   आरातिक   अधेन   गुजास्त   खिजीपडन   उफाडणें   इंटाळ   इंठाळ   कबिरा   अमाळसा   उस्तरखाना   कोरंटी   कुर्‍हें   सिलका   वाडि   विणेकरी   व्हएल   जोडेजोडे   भरंगळणें   भरंगाळणें   राडवाळि   रेडे मुसळें   रो   भीमरात्र   च्यारी   बर्पा   चाफेल   तपराख   तव्हसन   तिही   झुम्मड   टुमणीदंड   डिकरी   तडशा   मळकटा   मळफ   श्वेद   संगरात   संदुक   वाकल्या   न्याहा   न्याहो   आवाई   ओडंबर   कीटकी   कीटी   चांचर   देव्हडे   डुर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP