Dictionaries | References

अगा अगा देसाया, काष्टी नाय नेसाया

   
Script: Devanagari

अगा अगा देसाया, काष्टी नाय नेसाया     

(कु.) पूर्वीं कुडाळ प्रांतीं देसाई सत्ताधीश होते. त्यावेळीं वैभव, संपत्ति, सत्ता, कुळ वगैरे बाबतींत देसाई श्रेष्ठ असा समज होता. परंतु सावंताच्या मराठया घराण्यानें देसायांना पराजित करून स्वतःची सत्ता स्थापन केली. त्यानंतर देसायांना हलाखीचीआ स्थिति प्राप्त झाली. तेव्हां देसायांची इतकी हीनस्थिति झाली कीं, त्यांस नेसण्यास पुरेसें वस्त्रहि राहिले नाहीं. यावरून एका काळीं वैभवसंपन्न असलेल्या मनुष्यास दैन्यावस्था प्राप्त झाली असतां योजितात.(विविधवृत्त १९-२-३
पान१८)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP