Dictionaries | References

अरसिकेषु कवित्व निवेदनं

   
Script: Devanagari

अरसिकेषु कवित्व निवेदनं     

ज्याला ज्याची गोडी नाहीं त्याच्या पुढें तें सांगावयास लावणें म्हणजे मोठी शिक्षाच आहे. गाढवा पुढें गीता वाचल्याप्रमाणें तें होतें. ‘ इतर कर्मफलानि यदृच्छया विलिख तानि सहे चतुरानन । अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मालिख मालिख मालिख ॥ ’ हे ब्रह्मदेवा ! माझ्या पापांबद्दल वाटेल ती शिक्षा कर पण अरसिकाच्या पुढें काव्य निरुपण करण्याची तेवढी शिक्षा देऊं नकोस, असा आशय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP