Dictionaries | References

अष्टाधिकार

   
Script: Devanagari

अष्टाधिकार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Applied humorously to express the daily operations or business of the body--ablution, inunction, eating, evacuating, sleeping &c.

अष्टाधिकार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Plenary powers. Full powers.

अष्टाधिकार     

 पु. अव .
( अ ) जलाधिकार - प्रवाशांना व सरकारी नोकरांना पाणी पुरविण्याचा अधिकार . ( आ ) स्थलाधिकार - अनेक प्रकारच्या वस्तीच्या जागा ठरविणें व दाखवून देणें . हा पाटलाचा अधिकार . ( इ ) ग्रामाधिकार - लहान गांवांतील व्यापार व सामान्य धंदे यांची देखरेख करणें . ( ई ) कुललेखन - रयतेचा सरकारी हिशेब ठेवणें व सरकारी दप्तर सांभाळणें - हें कुळकर्ण्याचें काम . ( उ ) ब्रह्मासन - बेलिफाचा अधिकार . ( ऊ ) दंडविनियोग - मामलेदाराचा अधिकार . ( ऋ ) पौरोहित्य - ग्रामोपाध्यायाचें किंवा कुलोपाध्यायाचें काम . ( ऋ ) ज्योतिष - ग्रामज्योतिषाचें काम ; जोसकी . या अधिकारांचींच रुढ असलेलीं नांवें :- कोळीपणा , पाटिलकी , देशमुखी किंवा महाजनकी , कुळकरण , वर्तकी , धर्माधिकार , उपाध्धिक किंवा भटपणा , जोशीपणा .
( ल . ) स्नान , शौच , भोजन , निद्रा , बसणें वगैरे शरीराच्या दैनिक विधींनाहि थट्टेनें हा शब्द योजितात . एका खणाचे खोलींत सगळे अष्टाधिकार करुं म्हणतां ते होतील कसे ?
राज्यादिसंबंधीं प्रधानकी , सेनापत्य इ० जे सर्वाधिकार ते ; गडी , कारकून वगैरेंकडून होणारीं कामें . नारु एक असला म्हणजे दुसरा गडी , कारकून , मोतद्दार इ० कोणी नको सगळे अष्टाधिकार एकटा संभाळील [ सं . ]

अष्टाधिकार     

(अ) १. जलाधिकार, २. स्थलाधिकार, ३. ग्रामाधिकार, ४. कुललेखन, ५. ब्रह्मासन, ६. दंडविनियोग, ७. पौरोहित्य, ८. ज्योतिष. (आ) १. कोळीपण, २. पाटिलकी, ३. देशमुखी किंवा महाजनकी, ४. कुळकरण, ५. वर्तकी, ६. धर्माधिकार, ७. उपद्धिकभटपणा, ८. जोसकी-जोशीपणा. (इ) १. स्नान, २. शौच, ३. भोजन, ४. निद्रा वगैरे. ‘एका खणाचे खोलीत सगळे अष्टाधिकार करू म्हणतां, पण ते होतील कसे?’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP