Dictionaries | References

आड

   
Script: Devanagari

आड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  संगितांतल्या अश्टतालाचो एक प्रकार   Ex. संगीतकार आडाची माहिती दिता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআড়
gujઆડ
hinआड़
kasآڑ , آڑ تال
oriଆଡ଼ ତାଳ
sanआडतालः
urdآڑ , آڑتال
See : आडोस

आड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A dilemma, a strait betwixt two.
A proverb amongst the Shúdras indicative of their barbarism. 5 In comp. as a prefix. Odd or occurring oddly; as आडदिवस, आडवार, आडसाल.
āḍa f An obstinate resisting or insisting upon: also a point maintained of opposition or difficulty. v कर, धर. 2 R A glen or dingle. 3 R A distinct portion of a village.

आड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The common round well without steps.
 f  An obstinate resisting. A glen. A distinct portion of a village.
ad   In the way, across.
इकडे आड तिकडे विहीर   A dilemma; a strait, between two dangers.

आड     

ना.  कुवाँ , कूप , बाव , बावडी , वापी , विहीर ;
ना.  अटकाव , अडथळा , प्रतिबंध , विरोध .

आड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने   Ex. खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता .
adverb  अडथळा निर्माण करत मध्ये येणे   Ex. त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.
See : विहीर

आड     

 पु. वाटोळी , पायर्‍या नसलेली व लहान तोंडाची विहीर ; कुवा ; कूप . असतां आयु , न हो कां क्षम पळ जलधीस आड वाराया । - मोभीष्म . ७ . ४९ . आडांत पडला मृगेंद्र । कीं सांपळ्यांत कोंडिला व्याघ्र । तैसा साचार गुंतलों मी । [ सं . अवट = खळगा ; प्रा . अड = कूप ; अअड = आड ] म्ह०
 स्त्री. आडकाठी ; अडचण ; प्रतिबंध . ' मोठी आडत्याच ठिकाणीं पडली होती ' - पेद २७ . १०७ . ' येक दोन आडी मशारनिलेनी मातबार घातल्या आहेत ' - पेद ३५ . ६८ . ( आडणें )
अ.  
 न. पीच नांवाचें फळ .
 स्त्री. वरकस ' जमीन ; डोंगराच्या उतारावरील गवताळ जमीन .
 न. ( ना . ) घराचें आढें . आड बसलं की नाहीं . [ का . अड्ड ] - स्त्री .
( राजा . ) दोन डोंगरांच्या मध्यें पाण्याजवळ असलेली वस्तीस योग्य अशी जागा ; घळ ; दरी ; खोरें . [ का . अड्ड ].
आडांत नाहीं तर पोहर्‍यांत कोठून येणार ?
हा शब्द उपपदाप्रमाणें कित्येक शब्दांना जोडून येतो . याची सविस्तर माहिती अडमध्यें दिलेली आहे . या शब्दाचे अर्थ -( अ ) एकीकडे ; एका बाजूस ; दूर ; मार्गाच्या बाहेर ; रीतीवेगळा ; सांधीकोंदींत . उ० आडमार्ग ; आडबाजू . ( आ ) मधून ; वरुन ; उलट ; विरुध्द ; मार्गांत ( प्रतिबंधरुपानें ); उ० आडदंड ; या उपपदांतील आणि अड उपपदांतील अर्थभेद अड शब्दामध्यें पहा .
इकडे आड तिकडे विहीर = दोन मोठ्या अडचणींत , संकटांत सांपडणें .
एखाद्या पदार्थांच्या मागें ; पलीकडे ; पाठीमागें ; पुढें ; मागें , न दिसेल असा ; एका बाजूला . जे नित्य मायापट आड लावी . - सारुह १ . ५ . मेघ आड आला म्हणजे चंद्र दिसणार नाहीं .
विरोध ; अडथळा ; अटकाव . - स्त्री .
हट्ट ; हेका ; आग्रह . या सर्व अर्थी अड पहा . धरिली भाऊनीं आड । - ऐपो १२६ .
आडांत घालून दोर कापणें = विश्वासघात करणें . सकळांसी आडामध्यें घालून । दोर कापून गेलासी । - ह १७ . १५१ .
( दृष्टिविरोध करण्याकरितां , प्रवेशप्रतिबंधाकरितां , आश्रय देण्याकरितां , संरक्षण करण्याकरितां ) मध्यें येणारा ; मार्गांत असणारा ; मध्यंतरी ; मागें . आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं । - तुगा १५६८ .
एखाद्याच्या छत्राखालीं , आश्रयाखालीं ; उ० शेताआड चोरी ( आपल्याला स्वत : चें शेत आहे तेव्हां दुसर्‍याचें चोरलें असा आरोप येणार नाहीं ). दादल्या आड शिंदळकी ; यावरुन आड करणें , आड दडणें = आश्रय घेणें .
अर्ध्या आडांत सोडणें = संकटांत टाकून जाणें .
द्विरुक्तीनें आलेल्या शब्दांत आड शब्द आल्यास त्याचा अर्थ प्रत्येक दुसरा ; एक टाकून एक असा होतो . जसें - सालाआड साल ; झाडाआड झाड ; एकाआड एक . द्विरुक्ति नसतांहि आड या शब्दाचा असा उपयोग करतात . जसें - तासाआड बैल आणि दिसा आड बायको ( मारावी म्हणजे ठीक ).
आडांतला बेडूक आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो = अल्प ज्ञान असून मोठाल्या गोष्टी सांगणें .
( समासांत ) विविक्षित कालाव्यतिरिक्त . जसें - आडवार ; आडसाल ; आडदिवस = ठराविक दिवसांपोक्षां इतर दिवशीं . समासांत आड याचा अर्थ केव्हां केव्हां अकस्मात असा होतो . कांहीं वाक्यप्रचार -
०पडप   ( गो . ) वामकुक्षीकरितां आडवें होणें . [ पडणें ]
०यॅवप   ( गो . ) विरोध करणें ; आड येणें . [ येणें ]
०लावून   - ओंवळ्या लुगड्यावर सोंवळें नेसतांना बायका मध्यें एखादें वस्त्र लावून घेतात तें किंवा नाहण्याच्या वेळीं लावून घेतात ती पडदणी ; पडदा . नव्हे सपातळ आड लावणें । - ज्ञा ६ . ११४ .
घेणें   - ओंवळ्या लुगड्यावर सोंवळें नेसतांना बायका मध्यें एखादें वस्त्र लावून घेतात तें किंवा नाहण्याच्या वेळीं लावून घेतात ती पडदणी ; पडदा . नव्हे सपातळ आड लावणें । - ज्ञा ६ . ११४ .
०जाणें   
आडरस्त्यास , आडमार्गास लागणें ; रस्ता चुकून भलतीकडे जाणें ;
जवळून जाणें . जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखंडियाहि आस्था । समूळ होय । - ज्ञा ६ . १६७ .
०पडणें   
नमस्कार करणें ; विनवणी करणें . - शर .
अडविणें . तिये कडोन येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजे कीजो । - ज्ञा १३ . ३७५ .
मुरकुंडी वळणें . गोपाळ हांसां आडपडतु । - दाव २१७ .
०घालणें   
मध्यें आणणें ; रक्षण करण्यासाठीं कांहीं मध्यंतरी ठेवणें . तंव आड घातलें आणीकी वीरी - उषा ६१६ .
उडी घालणें . कोणी आड घाली काय अथावीं । - ज्ञा ८ . २४० .

आड     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  यस्तो छेकवार जसले गर्दा छेउको वस्तु देखिदैन   Ex. रामले बालीलाई रूखको आडमा छेलिएर मारे
HYPONYMY:
बलैंसी पर्खाल
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ओट
Wordnet:
bdआन्दो
benআড়াল
gujઆંતરો
hinआड़
kanಮರೆ
kasڈال
kokआडोस
malമറ
mniꯃꯔꯨꯝꯗ
oriଆଢ଼ୁଆଳ
panਓਹਲਾ
sanव्यवधानम्
telచాటు
urdآڑ , اوٹ , رکاوٹ , حائل , پردہ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP