Dictionaries | References

उपटणें

   
Script: Devanagari

उपटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To gormandize, gorge, cram, stuff.
To come up and fall out--a nail, peg, tree. 2 To turn up; to come to light; to become public. 3 To break out; to come to the surface; to become manifest--a disease &c. 4 To rise upon or fall upon angrily. Ex. अन्याय केला कोण्ही आणि मजवर कां उपटतोस?

उपटणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Pluck up or out; catch up fur tively.
v i   Come up and fall out; break out.
उपटुन सुळ खांद्यावर घेणें   Draw upon one's self by reckless folly a trouble, evil &c.

उपटणें     

अ.क्रि.  ( तंजा .) टांकी लावणें . ( सं . उत् + पट )
स.क्रि.  
उपटून काढणें ; मूळासकट वर काढणें . रंगूनें ती खुंटी सकाळीं उपटली .
( एखाद्यापासून द्रव्य वगैरे ) कपटानें , युक्तीनें काढणें ; लाटणें ; लुबाडणें . माझी खुशामत करुन तुला पैसा उपटणें असेल . - विवि ८ . २ . ४० .
हिसकून घेणें ; लांबविणें ; चोरणें ; न कळत घेणें ; पळविणें . उंटावरील हमिणी या भामट्यानें उपटली तर नसेल ?
आपटून मारणें . जें पांखिरु एकु चांचुवाडां । धरौनि उपटिलें ॥ - शिशु ८६७ . [ सं . उत + पत - पात , उत्पाटन ] - अक्रि .
( खिळा खुंटी झाड वगैरे भिंतींतून ) बाहेर येणें ; वर येणें .
प्रगट होणें ; उजेडांत येणें ; दिसूं लागणें ; ( अंमल ) सुरु होणें . अरे बापरे ! घातवार , व्यतिपात , संक्रांत , किंक्रांत , मरीआई , बारावा बृहस्पति , साडेसाती सारीं एकदम उपटलीं । - भाबं ८९ .
उत्पन्न होणें ; प्रादुर्भाव होणें ( एखादी सांथ वगैरेचा ); पुन : उद्भवणें ( रोग ). त्याला कालपासून मूळव्याध उपटली आहे
उडणें ; आपटून वर येणें . आपणचि चेंडु सुटे । मग आपणयां उपटे ॥ - अमृ ९ . ५७ .
एखाद्यावर तुटून पडणें , रागावणें . रथें रथूं दाटी । गजें गजां उपटी । - शिशु ८८१ . अन्याय केला कोणी आणि मजवर कां उगीच उपटतोस ? . [ सं . उत + पत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP