|
स्त्री. १ ताकास हरभर्याचें पीठ लावून , फोडणी वगैरे देऊन कढवून केलेलें कालवण ; ताकाची आमटी . कोंकणांत आंबसुलाचीहि कढी करतात . ' भाजी होती वांग्यांची । वालाचे गोळ्याची कढी । ' - स्त्रीगीत ६६ . २ एक औषधी काढा ; निरगुडीचीं पानें , ओवा चित्रकमुळ हळद व सुंठ यांचें चूर्ण , व कांजी ताकांत मिसळुन केलेली कढी . ही वातहारक व अग्निवर्धक आहे . ( सं . क्वथ = काढणें ; कढिआ ; सिं . कडही ) ( वाप्र .) शिळ्या काढीला ऊत आणणें = १ ( शिळी कढी कढविणें ), प्रसंग संपल्यानंतर एखाद्याचें धाडस किंवा शौर्य चेष्टविणें . २ स्मरणांतून गेलेल्या - जुन्यापुराण्या दादाला पुन्हां तोंड पाडणें . ०पातळ ( ल .) १ आजारामुळें अशक्त - फिकट - निस्तेज होणें . २ भीतीनें घाबरणें - गांगरणें - जर्जर होणें . ( कष ) होणें ( ल .) १ आजारामुळें अशक्त - फिकट - निस्तेज होणें . २ भीतीनें घाबरणें - गांगरणें - जर्जर होणें . ( कष ) ०खाऊ वि. १ कढीची आवड असलेला . ( ब्राह्मणास उपहासानें म्हणतात ). २ ( ल .) शेळपट ; भ्याड ; नामर्द . ०गवत - पात - नस्त्रे . गवती नहा किंवा पाती चहा , हा कढींत घालतात . ०चट वि. ( ना .) कढीभुरक्या ; कढी खाऊ ( ब्राह्मण ). ०निंब पु. बारीक कांटे असलेलें एक झाड ; यांच्या पालाला एकप्रकारचा सुवास येतो , तो कढींत , मसाल्यांत घालतात व त्याची चटणीहि करतात . यास गोड निंब , ( खान .) मढुनिंब , झिरग असहि म्हणतात . ( सं . कैटर्य .) ०भात पु. लग्नविधींतील एक सोहळा ; सीमांतपूजनांत वधूपक्षानें वरपक्षाकडील मंडळींस कढीभाताचें जेवण घालणें व कढीचें व भातांचें भांडें आंदण देणें . ०भुरक्या कढीभात खाणारा - वि . कढीखाऊ पहा . ' कढीभातखाऊ म्हणती ब्राह्मणा जगांत ..... तयांनींच करणीं केली प्रसंगीं अचाट । ' - विक ७ .
|