-
पु. १ काम ; कर्म ; कृत्य . कां निमेषोन्मेषांचे व्यापार - एभा २ . ४३३ . क्रिया ; व्यवहार ; कार्य ; उद्योग . मेंदूला रोग झाल्यास त्याचे व्यापार बंद पडतात . ३ हालचाल ; चलनवलन ; चळचळ . ४ धंदा ; उदीम ; व्यवसाय ; देवघेव ; व्यवहार . लुगडयांचा , भांडयांचा इ० व्यापार . [ सं . ] अव्यापारेषु व्यापार - पु . ज्यांत कांही संबंध नाही अशा गोष्टी करणे ; नसत्या भानगडी करणे . सरकारी शांळाची कशी काय व्यवस्था असते व तेथील विद्याभ्यासाच्या मानाने कोणत्या तर्हेची पुस्तके तेथे चालणे जरूर आहे याविषयी या पुस्तकांत उठाठेव करणे म्हणजे अव्यापारेषु व्यापार होणार . - नि .
-
पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ]
-
ना. उदीम , क्रय - विक्रय , खरेदी - विक्री . दुकानदारी , देवघेव , धंदा , पणन ;
-
Work or action generally; any working or acting; any work, operation, business, or proceeding. 2 Trade, traffic, commerce, mercantile business.
Site Search
Input language: