|
१ . कल्पाचा शेवट ; जगाचा अंत ज्यावेळीं होतो त्यास कल्पांत , प्रलय असें म्हणतात - तोहि एक कल्पपर्यंत राहतो . ब्रह्मादेवाच्या अहोरात्राचा शेवट . ' कुपितें कर्णें केली कल्पांतीं जेवि घाबरी सृष्टि । ' - मोकर्ण ४७ . १२ . २ भयंकर संकट ; अनर्थ या शब्दाचें अर्थ १ , २ पहा . ३ ( ल .) परमावधीचें दुःख आकांत ; कल्लोळ ( भुक , तहान , ऊन , रोग , दुःख , विरह इ०चा ). ( कल्प + अंत ) ०काळ पु. १ विश्वाचा अंतकाळ ; प्रलयकाळ . २ ( ल .) अतिशय . भयंकर , क्रूर माणुस , भूत , राक्षस .
|