Dictionaries | References

कांटा

   
Script: Devanagari
See also:  काटा

कांटा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कठिनाई, लौंग, काँटा, तराजू, काँटा, काँटा, काँटा, कँटिया, काँटा, काँटा, काँटा

कांटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Expresses the rising of a great evil out of a small one. कांट्यानें कांटा काढणें To employ one hateful person or thing to destroy another.

कांटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A thorn. Balance. A pest. Erection of the hair of the body. The tongue (of a lock). The back-bone The hand of a watch. Congelations or crystals.
कांटा उपटणें   Pluck up the very root ofany mischief or mischievous person.
कांट्याचा नायटा होणें   The rising of a great evil from a small one.

कांटा

  पु. १ अणकुचीदार , तीक्ष्ण टोंक असलेली , जी बोचली असतां अक्त काढते अशी काडी ; बाभळीचा बोरीचा दाभणासारखा टोंचणारा अवयव . सर्प कपाळी कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे । ' - भारा बाल ८ . ३५ . २ ( भयानें थंडीनें वगैरे ) अंगावर उभे राहणारे शहारे ; रोमांच ३ ( अव .) तापानंतर अंगावर खरखरेतपणा अथवा बारीक पुटकुळ्या असतात तो ; पुरळ ; ४ ( अव .) तापाच्या पूर्वी अंगावर येणारी शिरशिरी ; रोमाची ; कसर . ५ विंचवाच्या नांगीचें पुढचें तीक्ष्ण टोक . ६ कुलुपादिकाचा खिळा , जो कुलुपाच्या दांडीत वसतो व मागें सरतो तो . ७ वेळूं बांभू वगैरेना . येणारातुरा ; मोहोर ; फुलोरा . ८ कंबर , मान पाठ यांच्या आंतील बाजूस आधारभूत असलेला आस्थिविशेष . ९ गुणकार भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठी अंक मांडण्याकरितां घातलेली चौफुली (*). १० राघु , मैना इत्यादिकांच्या गळ्यांत होणारा एक रोग . ११ वजनानें विकलेल्या वस्तू वरं जे कांहीं वजन कटतें देतात तें कडता पहा . १२ नदी किंवा समुद्रांतील पाण्याखाली झांकलेला खडक . १३ काट्यासारखी शरीरास बोचणारी कोणतीहि वस्तु ( माशाचें हाड . चक्राचा दांता , घड्याळ्याचा हातकांटा , खडबडीत लागामाचें टोंक , करवतीचा दांता , जेवणांतील वापरावयाचें दांताळें - कांटा , जनावरें किंवा भाजीपाला यांवरील खरखरीत केंस . लव इ० ) ' काटा बराबर एकावर एक आला . - रासक्रीडा ७ . १४ हलवा , इतर मिठाई यांवरील टोंके , रवा ( क्रि० येणे ; उमटणें ; वठणें ; उठणें ). १५ ( विणकाम ) वशारन करतांना इकडून तिकडे ( वशारन पुढें सरकण्यासाठी ) फिरवावयाचें लांकूड १६ ( व .) थेंब . ' घरांत तेलाचा एक कांटा नाहीं .' - वशाप ५१ . १२ . ४७८ . १७ ( कु .) सुताराचें एक हत्यार . १८ ( ल .) त्रास देणारा माणुस व्याधि , शल्य , पीडा , शत्रु . ' धर्मांच्या हृद्‍यांतिल काढितसे मी समुळ कांटा हो । ' १९ तराजुच्या दाडीमधील उभा खिळा . ' जरि कांटा कलताए दैवांचा । जेडता राजमठु । ' - ऋ ३९ . २० काटा असलेला तराजु ( विशेषत ; सोनाराचा सराफाचा ). ' मेरुचिया वजनास पाहीं । कांटिया वातली जैशी राई । ' - ह . ३० . १६१ . ( सं . कंटक , प्रा . कंटओ . अप . कंटउ ; त्सीगत ; फ्रें जि . कंडो . ते काटा )
०उपटणें    १ ( क . व .) त्रासदायक प्राणी , शत्रु , गोष्ठ , नाहींशी होणें . २ ( व . ष .) समुळ नाहींसा करणें . काढुन टाकणें
०काढणें   आपल्या मार्गांत असलेल्या आपणांस पदोपदी नडवणार्‍या शत्रुस दुर करनें . ' वसुदानाच्या पुतें जो अभिमुख काशिराज तो बधिला । कांटाचि काढिला तो जाणो तब सुनुच्या मनामधिला । ' - मोकर्ण ४ . १५ .
०मारणें    १ काट्यानें सिद्ध करणें . २ अंगांत ( तापाची ) कसर येणें .
०मोडणें    १ ( व .) विंचु चावणें . २ किंचित उष्ण होणें . ' थंड पाण्याचा थोडा कांटा मोडला .' कांट्याचा नायटा होणें - कांटा मोडल्यावर लगेच तो काढला नाहीं तर त्या ठिकाणी नायटा होतो म्हणजे आरंभी क्षुल्लक वाटणार्‍या वाईट गोष्टीचे पुढे मोठे हानिकारक परिणाम कधीं कधीं होतात . कांट्यानें काटा काढणें - एका दुष्टाच्या हातून परभारें दुसर्‍या दुष्टाचें शासन होईल असें करणें . ' काट्यानें काढितात काटा की , ' काट्याप्रमाणें सलणें - सतत त्रासदायक होणें ; दुःखकारक होणें ; मत्सर , हेवा , द्वेष वाटणें . काट्यावर ओढणें - दुःखांत घालणें ; वस्त्र कांट्यावर ओढलें असतां फाटतें त्यावरुन . काट्यावर घालणें - दुःखांत लोटणें . ' त्यात ( कौरव सैन्यांत ) मरेनचि शिरतां कांट्यावरि बालितां चिरे पट कीं । ' - मोविराट ३ . ४१ . कांट्यावर येणें -( बैलगाडी ) आंसाच्या दोन्ही बाजूंला समतोल वजन होणें .
०धारवाडी   अगदीं बरोबर तोल दाखविणारा कंटा .' टिका करणार्‍याच्या हातांत नेहमीं धारवाडी कांटा असला पाहिजे .' कांटेकाळजी - अतिशय सुक्ष्म काळजी ; चिंत्ता . ' नवीन गव्हर्नर हे काट्याकाळाजीनें व निःपक्षपातबुद्धिनें आपलें काम करतील . ' - टि १ . ४३३ .
०भर   ( वायकी ) थोडे . ' आज तिच्या दुखण्याला कांटाभर मागचें पाऊल आहे .'
०रोखण   स्ती . ( कु ,) लांकडांत खांच , रेघ , पांडण्याच्या उपयोगी सुताराचें एक हत्यार ; खतवाणी ; फावडी .
०कणगी   ( गो .) कणगर ; कनक पहा .

कांटा

   धारवाडी कांटा
   अगदी बरोबर तोल दाखविणारा तराजू.

Related Words

कांटा   कांटा काढणें   कांटा फेडणें   बाभळीचा कांटा   कमरेचा कांटा   धारवाडी कांटा   अंगावर कांटा उभा राहाणें   नाकाचा कांटा फिटणें   कांट्यानें कांटा काढणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट   कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट   कांटा उपटणें   कांटा मारणें   कांटा मोडणें   बाभुळीचा कांटा   रुपेरी कांटा   मानेचा कांटा   धर्म कांटा   धर्माचा कांटा   crampon   crampoon   fork   कळीवांचून कांटा निघणें   कांटा (अंगावर) येणें   कांटा मोडला, नायटा झाला   कांट्याने कांटा काढणें   काळजीं कांटा करणें   काळजीं कांटा धरणें   अंगावर कांटा उभा राहणें   आंख का कांटा   जिभेला कांटा लावणें   बाभळीस कांटा लावणें   मानेचा कांटा ढिला होणें   मानेचा कांटा पडणें   मोडला कांटा, ज्ञाला नायटा   पाण्याचा कांटा मोडणें   prong   climbing iron   कळीचा कांटा आणि बोरीचा पेठा   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   नाकीं नाहीं कांटा, रिकामा ताठा   fishbone   fishhook   गुलाबाचे फूल गेले व कांटा राहिला   नाकांत नाहीं कांटा आणि लटका ताठा   नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा   नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा   spikelet   thorn   pricker   बाभळीचा कांटा, बोरीचें साल, बाबा कशाचा पैसा आणि कशाचे लाड   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   sticker   prickle   climber   spine   difficulty   balance   कांटारा   सुंक   मोर्‍हांटा   घरटाळें   खुडखुडी   कांटो काण्णु खुंटा घाल्‍लो   कुर्कुटी   भांगरा कांटॉ   पुढें घट्ट, मागें पोंचट   घंटेकांटा   weigh bridge   काटकोरणें   किणकिणी   एळकोट मल्हार   कंटकी वन   वाफरे   थुडथुडा   बारनिशीवर घालणें   निकती   मौळा   खोंचाटा   खोचाटा   कांटीनें कांटी झाडावी   कांट्याचें कोल्‍हे करणें   किरली   अंग जड जाणें   घरका   मानेचा कळस   पुढें तिखट, मागें पोचट   पेकडहाड   कांटे मोडणावळ   कांट्यांप्रमाणें सलणें   कांट्याचा नायटा आणि क्षुल्‍लक गोष्‍ट विकोपाला   कुरुप   अकंटक   विंचूकांटा   विसाप   विसाब   तुरीची काठी (कांटी) तुरीवर झाडावी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP