|
न. १ पेर ; पर्व ; सांधा . २ दोन पेरांतील भागतुकडा . ३ ऊंस बांबू इ . चा तीन चार पेरांचा तुकडा - भाग , टिपरें . ४ झाडांचें संबंध खोड , विशेषत ; फांद्या फुटावयाच्या आधींचें . ५ ( ल .) लांबी मोजण्याचें एक माप ( काडी , दोरा इ .) अशा रीतीनें वाटेल त्या लांबीचें घेतलेलें माप . यावरुन ( लांबभिंतीचा , ओट्याचा , विहिरीचा , पाण्याच्या पाटाचा , इमारत कामाचा ) एक किंवा विशिष्ट भाग . ६ जुनी वाळलेली वठलेली टणक वेल . ७ एकदां मळणी केलेलीं किंवा झोडपलेलीं धान्याचीं ताटें , कणसें ( फेकून दिलेली किंवा दुसर्यांदां मळणी करण्यासाठीं , झोडपण्यासाठीं ठेवलेलीं ) ८ भात नाचणी वरी इ०ची लावणी करण्यास योग्य असलेली दाढ . ९ वोटांच्या सांध्यास होणारा एक रोग . १० बाण ; तीर ; ' काडें मोकलीसी चांगे । ' - उषा १५२६ . कांड पहा . ११ ( ना .) बोरु ( सं . कांड ) अडचा - अडीच कांड्याव येणें - १ ( गव्हाच्या ताटास ओंबी फुटतें तेव्हां अडीच पेरें असतात यावरुन ) ओंबी बाहेर पडण्याच्या बेतास येणें . २ चिडण्याच्या परमावधीस पोंचणें ( माणुस ). कांडेपेरें लावणें - लावून पहाणें - वहिमी , खुनी मनुष्याच्या , चोराच्या पायांचे मोजमाप सांपडलेल्या मागाच्या पायाशी ताडून पाहाणें . कांडेपेरें मिळणें किंवा कमीजास्त होणें - वरील प्रकारंत बरोबर जुळणें किंवा न जुलणे . कांदेपेरें घेणे . मोजमाप घेणें . कांडेपेरे पाहून -( गुरे विकत घेतांना ) त्याचें सांधे व हाडपेर , अंगकठी वगैरे पाहुन ( घेणें .) ०करी पु. १ ( गुर्हाळ ) कवळ्याने आणून दिलेलीं उसाची कांडीं चरकांत घालणारा . २ ( क .) सुतार . ०चिरणें ( आट्यापाट्या ) सूर धरणारानें पहिली टाळी देऊन पहिल्या पाटीस पाय लावून पुन्हां परत येऊन दुसरी टाळी देणें . ०चोर दर - पु . ऊद ; काळमांजर ; कलिंदर ; कानेदर ; वनेर . ०श्वर सर - पु . लांब मानेचा बगळा , ' गीध गहरी कांडेसरें । ' - दावि २४४ . ( कांड + ईश्वर ) ०साबर न. निवडुंगाची एक जात , त्रिधारी किंवा चौधारी निवडुंग . ( यांच्या उलट पानसाबर .) ०हुरा पु. ( कों .) काडाशेर , चिकाडा . कांडी असलेला शेर .
|