Dictionaries | References

काबु

   
Script: Devanagari

काबु

  स्त्री. १ संधि . ' आपली काबु साधुन तेथें न गुंततां महारांजांनी स्वराज्यांत यावें .' - चित्रगुप्त ८० . ' मस्लत काबूस आली .' - खरे १ . १४४ . २ कब्जा ; ताबा ; सत्ता ; नियंत्रण ' पातशहाचे मनांत स्वामीचें काबूंत राहवें . - दिमरा १ . ११ . ' या पद्धतीनें घोडा स्वाराचें कांबुत राहावें .' - हिंलइ १७२ . वि . १ बळकट ; मजबूत . '(* चेनरायदुर्ग ) इतका काबु किल्ला असुन एकाएकीं फत्ते झाला .' - खरे १२२४ . २ धूर्त ; कावेबाज ; लबाड . ( तु . काबू - सामर्थ्य ; सत्ता ) ०कार - यार - वर - वि . धूर्त हिकमती ; लबाद . ' जाटांत जीव आहे ... मोठा काबूकार आहे .' - रा . १ . १३९ . ' काबूवार खरा फिरंगी '- आयाह ३ .
०तलब वि.  संधि साधणारा . ' इंग्रज बेइमान कबुतलब .' - पया ४६४ . यारी - स्त्री लुच्चेगिरी ; धूर्तता .
०वख्त  पु. संधि ; योग्य समय . ' खाली मैदान देखुन व काबूवख्त पाहून ...' - खरें ३५३७ .

काबु

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : अधिकार

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP