Dictionaries | References

कामीन जयाच्या जाहाली नेत्रासी। देखे तो चंद्रासी पतिवर्ण।।

   
Script: Devanagari

कामीन जयाच्या जाहाली नेत्रासी। देखे तो चंद्रासी पतिवर्ण।।     

तुगा ३११०. ज्‍याच्या डोळ्याला कावीळ झालेली असते त्‍याला चंद्रहि पिवळा दिसतो. ज्‍याला कावीळ झालेली असते त्‍यास सर्व पिवळे दिसते. मनुष्‍याच्या मनाचा एकदां पूर्वग्रह वाईट झाला किंवा त्‍याची दृष्‍टि बिघडली म्‍हणजे तो सर्व गोष्‍टींकडे दूषित दृष्‍टीनें पाहूं लागतो व मग त्‍याला सर्व गोष्‍टी वाईट दिसूं लागतात. निजदोषावृत्त मनसा मतिसुंदरमेव भाति विपरीतम्‌। पश्यति पीतोपहतः शशिशुभ्रं शंखमपि पीतम्‌ ।।-सुर १७१.८०१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP