|
उदा . ( कों . काशी ) अगो ! अगे ! ( बंगालींतही हे सबोधन आहे . ) असे कायगो करतेस ? - कफा १ . स्त्री. १ गाय . २ बैल ( पशु ). समासांत - गाईपासून झालेलें ; गाईसंबंधीं ( दूध , चामडें , मांस इ० ). अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । - ज्ञा २ . १८४ . [ सं . ] सामाशब्द - ०कर्ण ०क्रण न. १ मुलाला दूध पाजावयाचें ( गाईच्या कानाच्या आकाराचे ) बोंडलें . २ एक वेल व तिचें फूल . ३ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक . हे कुमठें ( कानडा जिल्हा ) तालुक्यांत आहे . ४ ( तंजा . ) दांडयाचें सारपात्र ; कावळा . याचा आकार गोकर्णासारखा असतो . - पु . गाईचा कान . गोकर्णात येणें - संपुष्टांत , गोकुळांत येणें ; संपणें ; दरिद्री होणें . गोकर्णिका , गोकर्णी - स्त्री . एक प्रकारचा लगाम . गोकर्णी - स्त्री . एक वेल , हिचीं फुलें ( पांढरीं , निळीं ) गाईच्या कानासारखीं असतात . [ सं . ] गोकुल , गोकूल , गोकुळ , गोकूळ - न . १ श्रीकृष्णाच्या लहानपणच्या वसतीचें गांव . २ गोकुळाष्टमीस नंद , यशोदा , गोप - गोपी , गाईवांसरें इ० ची पूजा करण्यासाठीं केलेलीं मातीचीं चित्रें . ३ ( ल . ) स्वैरसंभोग ; व्यभिचार . ( क्रि० माजविणें ). [ सं . गो + कुल ] गोकुळांत , येणें - १ संकोचित होणें ; संपुष्टांत येणें ; संपणें . २ आटोक्यांत येणें ( व्यवहार ). [ विश्वव्यापी कृष्णपरमात्मा ज्याप्रमाणें गोकुळाच्या मर्यादेंत आला त्याप्रमाणें ] गोकुळाष्टमी - स्त्री . श्रावण वद्य अष्टमी ; या दिवशीं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला . [ सं . ] गोकुळासारखें घर - न . मुलाबाळांनीं सुखसंपत्तीनें भरलेलें घर . गोकोश - पु . जमीन मोजण्याचें एक माप ; गायीच्या हंबरण्याचा टप्पा ; गोरुत ; दोन कोसांचें अंतर . गोखडी - स्त्री . गाई उभ्या राहण्याची जागा ; गोठण . गिलच्यानीं गोखडींत दहा - पांच बैरागी सत्पुरुष होते तेहि बसले ठिकाणीं लंबे केले . - भाब २८ . गोखमा - पु . १ गुराखी . २ ( ल . ) गांवढळ खेडवळ ; शेत्या ; नांगर्या . गोखरें , गोखरेण , गोखरेड - न . ( कों . ) गुरांनीं खाऊन शिल्लक राहिलेलें गुरांच्या पायाखलचें , निरुपयोगी गवत . केळीला गाखरेडाचें खत चांगले [ गौ + खुर ] गोखाना - पु . १ सरकारी किंवा एखाद्या मोठया माणसाचा गायवाडा ; गुरांचें खातें . २ गायठाण ; गोठा . [ सं . गो + फा . खाना ] गोग्रहण - न . गाईचें हरण , चोरी . उत्तरगोग्रहण . तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरे । - ज्ञा ११ . ४६९ . [ सं . ] गोग्रास - पु . १ जेवण्यास बसण्यापूर्वी गायीसाठीं राखन ठेवलेला अन्नाचा नैवेद्य . २ गाईसाठीं भिक्षा . [ सं . ] गोचर - न . गुरचरण ; गुरचराई [ सं . ] गोचर्म - न . गाईच कातडं . २ ( ल . ) जमीन मोजण्याचें एक माप . गाईच्या चामडयाइतकी जमीन ; ( गाईच्या कातडयाची वादी काढून तिनें वेष्टिलेली जमीन एका माणसानें राजापासून मागून घेतल्याची एक जुनी गोष्ट आहे तिच्यावरून ) तीनशें फूट लांब व दहा फूट रुंद या मानाचें क्षेत्र ( यांतील धान्य एका माणसास एक वर्ष पुरतें असा हिशोब आहे ). [ सं . ] गोजरूं गोजी - नस्त्री . ( प्रेमानें किंवा तिरस्कार करतेवेळीं योजना ) कालवड , वासरी गोजिव्हा - स्त्री . एक वनस्पति ; गोजबान पाथरी ; दवली . [ सं . ] गोठण , गोठाण - स्त्रीन . दुपारीं सावलीसाठीं पाण्याजवळ झाडाखालची बसण्याची गुरांची आखर , जागा ; गोठा . पशु पीडती पर्जन्यें । गळती गाईंची गोठणें । - मुसभा ३ . ७९ . [ सं . गोष्ट , गोस्थान ] म्ह० गोठणीच्या गाई माभळभट दान घेई .= हलवायाच्या घरावर तुळशीपत्र . गोठण घालून बसणें - सभत अस्ताव्यस्त बसणें . गोठा , गोठो - पु . गुरें बांधण्याची जागा ; जनावरें रहाण्याची जागा . [ सं . गोष्ठ ; प्रा . गोट्ट ] गोठापाणी - न . सकाळीं गोठा झाडणें , गुरांच शेण , मूत काढणें इ० गोठयांतील व्यवस्थेचें काम . गोठावणें , गोठाविणें - सक्रि . गोठणांत गुरें जमविणें ; गोठयांत गुरें घालणें . गोठी - स्त्री . ( कों . ) वासरांचा लहान गोठा . गोठयौचें - क्रि . ( गो . ) पशूंचें बसणें [ गोठा ] गोथवड - स्त्री . ( कों . ) गुरांची दावण , ठाण ; लांब पडळ ; कोटंबा . [ सं . गोष्टवत ] गोदंती हरताळ - स्त्री . पिवळा हरताळ . गोदण - स्त्री . ( बे . ) गुरापुढें वैरण टाकण्याची जागा . [ गवादणी ] गोदन - न . ( माण . ) लहान गोठा . गोंदरड - स्त्री . ( राजा . ) गोठयांतील केरकचरा , घाण . गोदान , गोप्रदान - न . ब्राह्यणास गाईचें दिलेलें दान . प्राचीन काळीं गाय दान मिळणें सोपें होतें , पावली मिळणें कठीण , पण हल्लीं चार आण्यांत गोप्रदान . - गांगा १४४ . गोदान - न . सोळा संस्कारांपैकीं व समावर्तनाच्या वेळीं करावयाचा एक संस्कार . [ सं . ] गोधन - न . गुरढोरें किंवा त्यांच्या रूपानें संपत्ति . धन्य तीं गोखनें कांबळी काष्ठीका । - तुगा २०८ . गोधूल गोधूल मुहूर्त , गोंधळिक , गोंधुळूक - पुन . १ सायंकाळचा ( गुर रानांतून परत घरीं येत असतां त्यांच्या चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा ) काळ . २ सूर्यास्तापूर्वीची व नंतरचीं ३० पळ यामधील काळ ; हा लग्नास शुभ मानतात . गोरज मुहूर्त . गोधूल लग्न - न . १ गोरज लग्न . गोधूल पहा . २ सूर्यास्तसमयीं उदय पावणारी राशी , लग्न . गोधूलिक - वि . गोधूलसंबंधीं ( कार्य , लग्न - मुहूर्त ). गोधूळ , गोधूळी - स्त्री . गोधूल पहा . गोप - पु . गुराखी , गवळी जात . व तींतील एक व्यक्ति . पूजिति सांग नगा ती रीति । सुखाचीच गोप सांगन गाती । - मोकृष्ण २४ . ७ . गोपचार - पु . गायरान ; गोचरण . गोपद - न . १ गाईचें पाऊल . २ गाइच्या पावलाचा मार्ग , खूण . ३ आंत पाणी भरलेली गोपदाची खूण , डबकें . गोपद्म - न . चातुर्मास्यांत रांगोळीनें गाईचीं पावलें नववधू काढतात व पूजा करतात तें . गोपदचिन्ह . [ सं . ] गोपवाडा - पु . गवळीवाडा . जो नांदवी उत्कट गोपवाडे । - सारुह १ . ७८ . गोपाल , गोपाळ - पु . १ गुराखी ; गुरें पाळणारा . २ राजा . ३ भगवान श्रीकृष्ण . ४ एक जात व तींतील व्यक्ति ; डोंबारी ; हे मनगटानें दगड फोडतात , मोठालीं वजनें उचलतात व कसरतीचे खेळ खेळतात . हे गांवकर्यांचीं गुरें राखोळीला घेतात . - गांगा १२२ . गोपाष्टमी - स्त्री . कार्तिक शुध्द अष्टमी या दिवशीं श्रीकृष्ण हे प्रथम गाई चारण्यास निघाले , म्हणून या दिवशीं त्यांची व गाईची पूजा करतात . गोपाळकाला - पु . गोकुळाष्टमीच्या उत्सवाच्या व श्रीकृष्णाच्या इतर उत्सवाच्या शेवटीं करावयाचे खेळ , द्यावयाचा प्रसाद , जेवण इ० ; गोकुळाष्टमीच्या पारणेच्या दिवशीं दहीहंडी फोडून तींतील प्रसाद वाटतात तो . गोपाळखेळ - पु . गोपाळ लोकांची कसरत , खेळ ; डोंबार्यांचा खेळ . गोपाळीं - क्रिवि . गोरजीं ; गोधूललग्नीं . गोपिका , गोपी - स्त्री . गोपालस्त्री ; गवळण . तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते । - केका ८६ . [ सं . ] गोप्रदान - १ गोदान पहा . २ ( थट्टेनें ) शिव्या . त्यानें त्यास गोप्रदानें केलीं . गोप्रसव - पु . कुनक्षत्रीं जन्मलेलें मूल गाईच्या तोंडापुढें धरतात व असें केल्यानें तें गाईचें मूल होऊन अशुभापासून मुक्त होतें , अशा मुलाला म्हणतात . गोप्रसवशांति - स्त्री . कुयोगीं जन्मलेलें मूल गाईच्या मुखांतून जन्मलें अशी भावना धरून कुयोगदोषनाशार्थ करावयाची शांति . गोब्राह्मण - पु . १ गाय आणि ब्राह्मण . २ ( ल . ) अगदीं साधाभोळा , गरीब ब्राह्मण . गोमय - नपु . गाईचें शेण . शुध्द करूनिया गोमय गोळा । मृतिकाकण विरहित । [ सं . ] गोमाशी - स्त्री . घोडे , गाई इ० च्या अंगावरील एक मोठी माशी ; माशीची एक जात . गोमांस - न . गाईचें मांस ; शपथेसारखा किंवा निषेध दाखवितांना याचा उपयोग करतात . कारण हिंदूंना गोमांस अगदीं निषिध्द आहे . ही तुमची ठेव मला गोमांसाप्रमाणें आहे . गोमुख - न . १ तीर्थ इ० पवित्र पाणी खालीं पडण्यासाठीं बांधलेलें किंवा बनविलेलें दगडी किंवा धातूचें गाईचें तोंड २ एक प्रकारचें गाईच्य तोंडासारखें वाद्य . तों वाद्यें शंखभेर्यादी पणवानक गोमुखें । - वामन गीतासमश्लोकी १ . १३ . गोमुखव्याघ्र - १ दिसण्यांत गाईसारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ . २ गाईचें कातडें पांघरलेला लांडगा . ३ ( ल . ) वरून गरीब पण आंतून लुच्चा माणूस . [ सं . ] गोमुखी - स्त्री . गाईच्या तोंडासारखी काटकोनी जममाळेची पिशवी ; हिच्या आंत हात घालून जपाची माळ ओढतात . काय मौन धरुनियां गोमुखिला जाळिसी । - राला ८७ . - पु . ( कों . ) एक प्रकारच्या नवसांत नियम केल्यामुळें हात न लावतां तोंडानें अन्न उचलून जेवणारा माणूस [ सं . ] गोमूत्र - न . गाईचें मूत ; हें पवित्र मानतात व अपवित्र वस्तूंवर शिंपडून त्या पवित्र करतात . गोमूत्रिका , गोमूत्रिकान्यायगुणाकार - पू ( ज्यो . ) गुणाकाराचा एक प्रकार . गोमूत्रिकाबंध - पु . काव्याचा एक प्रकार याच्य द्वितीय चरणांत पहिल्या चरणांतील बहुतेक अक्षरें येतात . गोमूत्रवायु - पु . एक नवयुक्त वायु ( इं . ) अमोनिया . गोमेध - पु . ज्यामध्यें गाय मारतात तो यज्ञ . [ सं . ] गारखी - पु . गुराखी ; गुरें ( गाई ) पाळणारा . कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गारखें । - तुगा १८१ . गोरज - पु . गाईची धूळ . गोधूल पहा . गारजें डवरला , मुखचंद्र । - ह १८ . ६३ . गोरजमुहूर्त - गोधूलमुहूर्त पहा . गोरस - पु . गाईचें दूध , दहीं , तूप इ० गाईपासून होणारे पदार्थ . [ सं . ] गोरक्ष , रक्षक - पु . १ गुराखी . २ गुरांची रक्षक देवता . ३ नाथपंथातील गोरखनाथ नांवाची एक प्रसिध्द व्यक्ति गोरख - गोरखनाथ पहा . गोरक्षण - न . कसायापासून गाय वांचविणें ; गोपालन . गोरा , गोर्हा - पु . गाईचा पाडा , खोंड ; धांडा . गोरुव - न . गोवत्स . गोरूं , गोरवा , गोरें - न . ( राजा . गो . ) ढोर , गुरूं . गोरु खडबडी बाहिरी । - भाए ३९४ . गोरोचन , गोरोचना - नस्त्री . गोवर्धन ; हें गोमूत्रापासून किंवा कुपित्याच्या रूपानें गाईच्या ओकण्यापासून . किंवा गाईच्या डोक्यांत उत्पन्न होतें याचा रंग पिंवळा . हें रंग , चित्रें औषधें यांत उपयोगी आहे . गोरोचनापरिस गौर असें गणावें । - र ६ . ( लोक समजूत अशी कीं वाजीकरण किंवा स्त्रियांस मोहविण्यांत गोरोचनाचा उपयोग होतो ). [ सं . ] गोवंड , गोवंडी , गोवडी - पुनस्त्री . जंगल किंवा डोंगरावरील जनावरांची चरण्यास जाण्याची पाऊलवाट ; गायवाट . [ सं . गोवर्तनी ] गोवंडास लागणें , येणें - सरळ रस्त्यास लागणें ; चालीस लागणें ( माणूस , काम ). गोवत्स - पुन . गाईचें वांसरूं . गोवत्सद्वादशी - स्त्री . आश्विन वद्य द्वादशी ; या दिवशीं गाईची पूजा करितात . गोवपा - स्त्री . गाईच्या आंतडयावरील आवरण ; सामान्यत : गाय , बैल यांच्या चरबीस व हाडांतील मगजासहि म्हणतात . [ सं . ] गोंवर - पु . १ शेणी ; न थापलेले वाळलेलें शेण , वाळलेल्या शेणाचा चुरा . २ गाईनें खाल्यानंतर उरलेला चारा , गळाठा . ३ ( कों . ) राब . ४ ( हेट . ) उकिरडा . [ सं . प्रा . गोवर ] गोवरकोंडा - पु . गोठयांतील केरकचरा ; शेणमूत . गोवरी - स्त्री . १ वाळलेल्या शेणाची थापटी ; शेणी ; गोंवर अर्थ १ पहा . २ ( कु . ) शेणखत . ३ राब भाजण्यासाठीं वाळविलेला शेणगोळा . गोवरीची आग - स्त्री . गोवरी जाळली असतां वर राख दिसते परंतु आंत विस्तव असतो यावरून गुप्त परंतु भयंकर वैर . गोवर्या मसणांत जाणें - वृध्दपण येणें . मरण जवळ येणें ; वय होणें . गोवर्धन - पु . १ मथुरजवळील टेकडी ; इंद्रानें पाडलेल्या पावसापासून गोकुळाचें रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णानें याला करंगळीवर धारण केलें व याच्या खालीं गोकुळांतील सर्व माणसें आणि पशु सुरक्षित राहिले . २ कार्तिक शुध्द प्रतिपदेच्या ( बलिप्रतिपदेच्या ) दिवशीं भात , शेण , भाजीपाला इ० चा वल्लभसंप्रदायी लोक गोवर्धनासारखा पर्वत करून त्याची पूजा करतात तो . - न . १ गोरोचन . २ महाराष्ट्रांतील एक प्राचीन राष्ट्र ह्ल्लींच्या नाशिक जवळच्या भागांत हे असावे . ०ब्राह्मण पु. एक महाराष्ट्रीय ब्राह्मण जात . गाईच्या तोंडें गोवर्धन निवडणें - पंचाईत इ० प्रकरणीं ज्याचा विषय त्याच्याच तोंडानें निवाडा करणें . गोवळ , गोवळगोठा - पु . ( कों . ) गोशाला ; गायवाडा ; गोठा . गोवळ , गोवळा , गोवाळ , गोवाळी - पु . १ गुराखी ; गवळी . उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गावळा । - तुगा १२९ २ ( राजा . ) वयानें मोठा पण पोरकट माणूस ; दुधखुळा ( निंदार्थी ). [ सं . गोपाल ; प्रा . गोवाल ] गोवारी - पु . गुराखी ; गवळी . तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी । - कथा १ . ५ . ८२ . गोवाल - पुअव . गंगावन ; गाईच्या शेंपटीचे केंस . [ सं . ] गोवेल - पुस्त्री . एक वेल ; ही गुरांना विषकारक असते म्हणतात ; भारे बांधण्याच्या कामीं हिचा उपयोग होतो . गोवैद्य - पु . गाईचा वैद्य ; गुरांचा वैद्य ; पशुवैद्य . गोशत - न . १ शंभर गाई . २ शंभर गाई दान देण्याचें कर्म . [ सं . ] गोशाला , गोशाळा - स्त्री . गोखाना ; गोठा पहा . गोष्ठ - पुन . गोठा गोष्पद - न . १ गाईचें पाऊल , पावलाचें चिन्ह . २ गावंडी . ३ गोपदाइतकें माप ; गाईच्या खुराखालीं समावेश होईल इतकी जमीन . ४ चिखलांत उमटलेलें व पाण्यानें भरलेलें गाईचें पाऊल . गज गोष्पदीं बुडाला हा दैवा सिंधुशोषिला मशकें । - माद्रोण १ . २३ . गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली । - राला ८१ . गोष्पदोपम - वि . गोष्पदाप्रमाण ( ४ ) ओलांडून तरून जाण्यास सुलभ ; सहजसुलभ ; क्षुद्र ; सुगम . ईश्वरभजन केले असतां भव गोष्पदोपम होतो . गोस्फुरण - न . गाईचें अंग थरारणें , गाईनें भोंवरा करणें . [ सं . ] गोहण - स्त्री . गव्हाण पहा . गाताडी . गोहन - न . ( व . ) गाईचा कळप , ( गोधन ) गोहण्या - पु . ( व . ) गुराखी . गोहत्त्या , हनन - स्त्रीन . १ गाईचा वध . २ गोवधाचें पातक . गोहरा , गोहोरा - पु . गोर्हा पहा . म्ह० गोहर्याच्यानें शेत पोराच्यानें संसार होता तर मग काय ? गोहोत - न . ( राजा . ) १ दाणा , कोंडा , पेंड इ० गुरासाठीं शिजविलेलें आंबोण , मिश्रण . २ ( ल . ) घोंटाळा ; खिचडी ; गोंधळ . गोक्षुर - पु . १ गोखरू ; सराटा . २ गाईचा खूर . ३ गाईची पाऊलवाट ; गोवंडी . [ सं . ]
|