Dictionaries | References

घसा

   
Script: Devanagari

घसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. See घांटी फुटणें under घांटी. घसा बसणें g. of s. To lose one's voice, or to become hoarse. घसा वाजणें g. of s. To breathe hard; to wheeze; to rattle; to snore.

घसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The œsophagus or gullet: also the windpipe.
घशाखाली उतरणें   To be gulpedan embezziement &c.
घश्यातून काढणें   To force to disgorge (an embezzlement or a theft).
घसा कोरडा करणें   To make one's throat dry (by speaking &c.).
घसा फुटणें   To undergo change of voice (as on attaining puberty).
घसा बसणें   To loss one's voice, or to become hoarse.
घसा वाजणें   To breathe hard.

घसा     

ना.  अन्ननलिका ;
ना.  आवाज , गळा , नरडे .

घसा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग   Ex. घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गळा नरडे
Wordnet:
benনলি
gujગળું
hinघेघा
kanಅನ್ನನಾಳ
kokअन्ननळी
malഅന്നനാളം
oriତଣ୍ଟି
tamநத்தை
telస్వరం
urdگھینگھا
See : कंठ

घसा     

 पु. १ गळयाच्या आंतील भाग ; नरडें ; अन्ननलिका . २ श्वासनलिका . ३ आवाज ; कंठध्वनि . त्याचा घसा गोड आहे . [ सं . घस - खाणें , गिळणें ] ( वाप्र . )
 पु. राब वाहून नेण्याची बिनचाकी गाडी . - बदलापूर २९४ . घसें पहा . [ घासणें , घसरणें ]
०कोरडा   फार वेळ बोलत राहणें ; घसा कोरडा होईपर्यंत एखाद्यास उपदेश , एखाद्याशीं माथाकूट करणें .
करणें   फार वेळ बोलत राहणें ; घसा कोरडा होईपर्यंत एखाद्यास उपदेश , एखाद्याशीं माथाकूट करणें .
०खाणें   घशाशीं घुरघुरणें ; घशांत घरघर आवाज होणें . घसा वाजणें . घसर घसरूं घसा खाणें । घुमघुमोंचि घुमणें । योग्य नव्हे ॥ - दा १४ . ४ . घशाखालीं उतरणें - १ गिळला जाणें ; गिळंकृत होणें . २ ( ल . ) लांच खाल्लेला , लबाडीनें लाटलेला पैसा पचविला जाणें . ३ कबजांत जाणें . पण एतद्देशीय संस्थानें मात्र सरकारच्या घशाखालीं उतरविलीं . - नि . घशांत घालणें - बळकावणें ; गिळंकृत करणें ; ( एखाद्या मालमत्तेवर ) बळेंच हक्क सांगून ( ती ) बळकावणें . दुसर्‍याचे देश घशांत घालण्याची असुरी लालसा टिकणार नाहीं . - के १४ . ६ . ३० . घशात टाकणें - गिळंकृत करणें ; लाटाणें . सरकारचा विचार इंदूरची इस्टेट घशांत टाकण्याचा होता . - विक्षिप्त ३ . १६४ . घशांत पीक धरणें , घशांत पीक अडकणें - पाऊस न पडल्यामुळें पिकांची , कणसांची वाढ खुटंणें . घशांतून काढणें - खाल्लेला , गिळंकृत केलेला पैसा , चोरलेला माल इ० ओकावयास , परत द्यावयास भाग पाडणें . घशाबाहेर पडणें - १ गिळंकृत केलेली वस्तु , पैसा बाहेर ओकून पडणें . २ ( पिकाच्या पोटरी येणें ; पीक निसवणें , पिकाचें कणीस लोंगर बाहेर पडणें .
०पसरणें   ( एखादी वस्तु खाण्याकरितां , गिळण्याकरितां ) आ करणें ; तोंड उघडणें ; अशाळभूतपणानें पहाणें .
०फुटणें   ( मुलगा ) वयांत आल्यामुळें त्याचा आवाज , स्वर बदलणें ; आवाजाची कोमलता नष्ट होऊन तो मर्दानी बनणें ; घांटी फुटणें ; घांटी पहा .
०बसणें   ( ओरडण्यानें , तेलकट , इ० पदार्थ खाल्यानें ) आवाज घोगरा होणें ; शब्दाचे उच्चार अस्पष्ट होणें .
०वाजणें   घोरणें ; ( घसा ) घरघर वाजणें ( प्रयोगांत कर्त्याची षष्ठी असावी लागते )

घसा     

घसा कोरडा करणें
फार वेळ बोलणें
पुन्हां पुन्हां बोलणें
मोठमोठ्याने सांगणें
अनेक वेळा सांगून पाहाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP