Dictionaries | References

घालणें

   
Script: Devanagari
See also:  घरा , घरे , पाडणें

घालणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also, generally, with implication of violence or suddenness. Ex. त्याला फेंफरें आलें म्हणजे आगींत घालून घेतो; विहिरीचे कांठीं जाऊं नको घालून घेसील; भूतळीं भरत घालुनि घे हो ॥ त्या स्थळींहूनि न चित्तनिग्रहीं ॥. घालून पाडून बोलणें To cast censure by innuendo or insinuation; to speak tauntingly or twittingly.

घालणें     

स.क्रि.  १ ठेवणें ; राखणें ; स्थित करणें . भंवती अस्त्रीयांची राषणे । तेथें घातली ते राजकुमारी । - उषा २१ . २४ . सर्व माल आधीं घरांत घाल . २ सोडणें ; टाकणें ; फेकणें ; टाकून देणें ; फेकून देणें . उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । - राम ३७ . घोडा घालण्याची सोय नसेल अशा खडकाळ व डोंगराळ मुलखांत डुकराची शिकार गोळीनेच करावी लागते . - डुकराची शिकार ( बडोदें ) १ . त्याला काठीवर भार घालून चालावें लागे . - कोरकि ३२ . ३ उडी टाकणें . वणवा मियां आघवा । पांखेंचि पुसोनि घेयावा । पतंगु या हांवा । घाली जेवीं । - ज्ञा १४ . १९१ रागें उमा घातलें आगीं । यालागीं याज्ञिकाचें शिर भंगी । - एभा ५ . १७७ . ४ जडविणें ; लावणें ; तल्लीन करणें . स्वरूपीं घातलें मना । यातनेसी केली यातना । - दा ५ . ९ . ५४ . ५ मारणें ; फेकणें ; प्रक्षेपणें ; फेंकून मारणें . अभिमंत्रुनी पंनकासस्त्रें । बाणु घातला ईस्वरें । - उषा १६९४ . इंद्राच्या या कपटी वारांगनेच्या डोक्यांत विश्वामित्रानें जर कमंडलु घातला असता तरच असल्या स्त्रीजातीचा योग्य सन्मान झाला असता . - नाकु ३ . ९१ . ६ ओतणें . दुधांत पाणी घालणें . ७ पसरणें ; बाहेर मांडणें ; मांडून ठेवणें ; रचणें ; ठेवणें . आकाशीं घातीला मंडप । - मसप २ . २६ . ८ ( आंत ) खुपसणें ; भोंसकणें . घे सुरी घाल उरीं . ९ ( एखाद्या पदार्थांत दुसरा पदार्थ ) शिरकावणें , प्रविष्ट करणें ; पिशवींत पैसे घाल . १० ( एखाद्या कामाला मनुष्य , जनावर ) लावणें ; जुंपणें ; नेमणें ; योजणें . मुलगा पढावयास घातला . तो गडी भात कांडावयास घाला . ११ ( दुकान , शाळा , बाजार इ० ) मांडणें ; स्थापनकरणें ; सुरू करणें . १२ ( अंगावर धारण करण्याच्या विवक्षित वस्तू ) धारण करणें ; परिधान करणें ; चढविणें . अंगांत अंगरखा , डोकींत पागोटें , पायांत जोडा घातला . नाकांत नथ व बोटांत आंगठी घाल . १४ एखाद्यावर अनिष्ट संकट आणणें ; गोत्यांत आणणें ; ( एखाद्याच्या ) नुकसानीस कारण होणें ; गंडा घालणें ; ( एखाद्यास ) बुडविणें . त्यानें मला दहा रुपयांस घातलें . १५ ( मूल ) प्रसवणें ; ( अंडीं ) टाकणें ; गाळणें . १६ ( प्रश्न , उदाहरण , कोडें इ० ) सोडवावयास देणें , सांगणें ; हिशेब सांगणें . १७ एखाद्यास एखादी गोष्ट करण्यास अथवा न करण्यास शपथ इ० देणें ; शपथ इ० कांचा जोर . आग्रह करणें ; शपथ घालणें . १८ बाहेर टाकणें ; काढणें ; काढून देणें ; घालविणें . या चोरास प्रथम घराबाहेर घाल . १९ ( दरारा , धाक , भीति , भूल इ० ) उत्पन्न करणें ; उपस्थित करणें ; उठवणें ; उद्दीपित करणें . २० ( बाद , गोंधळ इ० ) करणें ; माजविणें . २१ ( भिंत , कूड इ० ) बांधणें ; उभारणें ; रचणें . २२ ( भोजन , समाराधना , ब्राह्मण , मित्र इ० कांस ) अर्पण करणें ; देणें . २३ ( एखादें काम ) सुरू करणें ; आरंभणें . तिने गहूं दळावयास घातले . त्यानें घर बांधावयास घातलें . २४ ( चाल , संप्रदाय ) प्रचलित करणें ; रूढ करणें . २५ ( सणाच्या दिवशीं पुरण इ० खाद्यपदार्थ ) खावयास , नैवेद्यास सिध्द करणें . मंगलप्रसंगीं ब्राह्मण जेवावयास घालणें . घालणें हा धातु कांहीं नामास जोडूनहि वापरतात . उदा० ( गोष्ट ) कानावर घालणें ; ( मुलाला ) कित्त्यावर घालणें इ० या धातूचे अर्थ अनेक आहेत , पण त्या सर्वांचा भावार्थ ठेवणें ; स्थापणें ; मांडणें ; लावणें असा आहे . [ प्रा . घल्ल ; जु . का . घल्लणे भांडण , युध्द , मारामारी ; हिं . घालना ] ( वाप्र . ) घालून घेणें - ( हट्टानें , जोरानें , वेगासरशीं ) स्वत : चें शरीर , अंग खालीं वरून आंत टाकणें , फेकणें ; एकदम अंग टाकणें . त्याला फेंकरें आलें म्हणजे तो आगींत घालून घेतो . नदी भरतां भरतां घालुनिया घेती । - रामदास - रामदासी भा . १५ . पृ . २६४ . भूतळीं भरत घालुनि घे हो । त्या स्थळींहूनि न चित्त निघेहो । - वामन भरतभाव ५१ . हें वर्तमान मल्हारराव यांनीं ऐकतांक्षणींच अंबारींत घालून घेतलें . - भाब ७४ . घालून पाडून बोलणें - वक्रोक्तीनें उपरोधिक भाषेंत निंदा करणें , दोष देणें ; टोमणा मारणें ; खोचून बोलणें . टोंचून , घालूनपाडून बोलण्याच्या कामांत बायका पटाईत असतात . - संगीत मेनका ११ . एखाद्यावर घालणें - एखाद्यास दोष देणें , लावणें . कष्टी होऊनियां लेखीं । प्रारब्धावरी घालिती । - दा १२ . २ . ५ . ह्या धातूचें समासांत घाल असें रूप होतें . घाल - घालणें या क्रियापदाचें समासांत योजावयाचें रूप . यावरून पुढील सामासिक शब्द बनले आहेत .
 न. हल्ला ; घाला ; छापा . अनुर्धा कारणें । पडलें अवचीतें घालणें । - उषा८९९ . कोपावरी घालणें घातलें । कापटय अंतरीं कुटिलें । - दा ५ . ९ . ५० . [ का . घल्लणे ]
०काढ  स्त्री. ( कांहीं जिन्नस , सामान इ० विशिष्ट ठिकाणीं ) पुन्हा पुन्हां घालण्याची व तेथून काढण्याची क्रिया , व्यापार ; उपसाउपस ; ( जिनसांची ) उगीच्या उगीच हालवाहलव करण्याचा व्यापार ; चालढकल पहा . [ घालणें + पाडणें ]
०घसर  स्त्री. १ लांबणीवर टाकणें ; टंगळमंगळ ; दिरंगाई ; चालढकल . आज पाहूं उद्या पाडू अशी घालघसर केली तर ऐनवेळीं कांहींच करतां यावयाचे नाहीं . - हिंदु ( गोवें ) १३ . ८ . १९२९ . २ रपाटणें ; खच्चून भरणें ; कोंबणें ; ठासणें ; कोंदून भरणें . ३ अनास्था ; आळसामुळें दुर्लक्ष . अध्ययनाविषयीं घालघसर करशील तर फसला जाशील . ४ घालघुसड शब्दाच्या कांहीं अर्थीहि या शब्दाचा उपयोग करतात . घालघुसड पहा . [ घालणें + घसरणें ]
०घसरपणा  पु. चुका करण्याचा स्वभाव ; वेंधळेपणा . [ घालघसर ]
०घसर्‍या वि.  दिरंगाई , टंगळमंगळ ; चालढकल करणारा . [ घालघसर ]
०घुसड  स्त्री. १ ( एखादे काम , धंदा इ० ) स्वैरपणानें , मनसोक्तपणें , दपटणें ; पुढें चालवणें , ढकलणें . २ ( एखादें काम ) दडपण्याची , लाटण्याची , लोटण्याची क्रिया ; वेठ वारून , बिगार काढून , गडबडगुंडा करून ( एखादें काम ) करण्याची क्रिया . ३ जमाखर्च इ० कांत ) अव्यवस्थितपणें , लबाडीनें दडपून देणें ; घुसडणें . ५ गोंधळ ; घोटाळा इ० नीं युक्त भाषण , व्यवहार ; लबाडीचा व्यवहार ; लपंडाव . मी वचन मोडून कांहीं घालघुसड केली तर मग त्याला काय समजणार आहे ? - बाल २ . १८८ . [ घालणें + घुसडणें ] घालपांडया - पु . १ बिनदिक्कत ( दुसर्‍याचा ) घात , नाश करणारा , कळलाव्या , आगलाव्या , घातकी मनुष्य . २ वरून मात्र बावळा , वेडा दिसणारा पण आंतून कावेबाज असलेला मनुष्य ; वेड पांघरणारा मनुष्य ; घालवेडा पहा . [ घालणें = बुडविणें , नुकसानींत आणणें + पांडया ] घालपिसा - वि . वेडेपणाचें , बावळटपणाचें सोंग , ढोंग करणारा ; वेड पांघरणारा ; घालवेडा , [ घालणें + पिसा = वेडा ] घालपिसें - न . वेडाचें ढोंग ; बाह्यात्कारी धारण केलेला वेडेपणा , खुळेपणा , बावळेपणा . [ घालणें + पिसें ] घालफेड , घालफेडी - स्त्री . घालफेल ; तळमळ ; काहिली ; ( ताप इ० नें ) जीव कासावीस होऊन शरीराची होणीरी चळवळ ; घालमेल अर्थ ७ पहा . नवकिसलयतल्पीं तीजला नीजवीती । घडिघडि करिते हे भीमकी घालफेडी । - सारुह ३ . ६५ . [ घालणें + फेडणें ] घालफेल - स्त्री . ( कों . ) ( आजारी मनुष्याची होणारी ) तळमळ ; तगमग ; कासाविसी ; काहिली ; तापाच्या काहिलीमुळें आजारी माणसानें इतस्तत : केलेलें शरीराचें चलन वलन . घालमेल , घालमेली - स्त्री . १ ( वस्तूंचा , हिशेबाचा , कामांचा ) घोंटाळा ; अस्ताव्यस्तपणा ; अव्यवस्थितपणा ; गोंधळ . २ धांदल ; गडबड ; गर्दी ; धामधूम ; धुमाळी . ३ सरमिसळ ; सर्व एकांत एक मिसळणें ; उलथापालथ . ४ ( ल . ) एकसारखी मसलत , हिकमत , युक्ति ; बेत करणे ; डावपेंच खेळणें ; साहसाच्या धाडसाच्या कामांत स्वत : स गुंतवणें ; ( उपजीविकेसाठीं ) अनेक उलाढालीं करणें ; मामलत इ० व्यवहारांची अदलाबदल , घटवटना . ५ ( एखादें कार्य जुळवून , घडवून आणण्याची अनेक प्रकारची ) खटपट ; मसलत ; गडबड ; धांदल . तो सध्यां लग्नाच्या घालमेलींत आहे . ६ सुरळीतपणें चाललेल्या व्यापारांत , क्रमांत झालेला अडथळा , भंग , खळ . पथ्यामध्यें घालमेल न झाल्यास गुण येईल . ७ ( ताप इ० कांच्या योगानें होणारी शरीराची ) तगमग ; तळमळ ; कासाविसी ; काहिली . नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥ - तुगा २९ . घालफेल पहा . ८ तगमगीमुळें ( आजारी माणसाने चालवलेली शरीराची ) चळवळ ; चुळबुळ . तिचा जीव घालमेल घालूं लागला - चंद्र १४० . ९ पोटांतील क्षुब्धता , कालवाकालव . १० ( पित्तक्षोभामुळें ) उसासणें ; उसासा येणें ; ( उकाडयामुळें , उबार्‍यामुळें शरीराचा होणारा ) गदका ; गदमदणें ; गदगदणें ; चबढब पहा . ११ ( व्यवहारांतील , हिशेबातील ) अफरातफर , डावपेंच ; घोंटाळा ; गोंधळ ; छक्केपंजे ; लपंडाव ; लुच्चेगिरी . १२ ( गो . ) भानगड . [ घालणें + मेळ ; हिं . घालमेल ; गु . घालमेल ] घालमेलणें - घालमेल करणें ; उलथापालथ , गोंधळ , घोंटाळा करणें . [ घालमेल ] घालमेली - स्त्रीअव . ( गो . ) हेलपाटे ; येरझारा ; त्यापासून होणारा त्रास . [ घालमेल ] घालमेल्या , घालमेली - वि . १ घालमेल , चबढब , अव्यवस्था करण्याचा स्वभाव असणारा . २ चळ्वळया ; खटपटी , नाना युक्ती , हिकमती काढणारा , योजणारा ; उलाढाली ; कारस्थानी . [ वालमेल ] घालवेड - वि . वेडाची बतावणी करणारा ; बाहेरून वेड पांघरणारा परंतु आंतून धूर्त , लुच्चा असलेला . [ घालवेड ] घालाघाली - स्त्री . ( कामांचा ) गोंधळ ; धुडगूस ; घालमेल . घालाघाली घालिती नित्य सासा । टाकूं बाई नेदिती हा उसासा ॥ - सारुह ७ . १०६ . [ घालणें द्वि . ] घालामेल - स्त्री . ( गो . ) ब्याकुळता ; घालमेल अर्थ ७ पहा . घालामेलचें - अक्रि . ( गो . ) कासावीस होणें ; तगमगणें ; व्याकुळ होणें . [ घालमेल ]

घालणें     

अडचणींत आणणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP