Dictionaries | References

चित्त

   { citta }
Script: Devanagari

चित्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  पीठ के बल पड़ा हुआ   Ex. चित्त पहलवान की बुद्धि काम नहीं कर रही थी ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चित उत्तान उतान सीधा
Wordnet:
asmচিত
bdखांग्रां
benসোজা
gujચત્તુ
kanಮೇಲ್ಮುಖನಾದ
kokउदारें
malമലര്ന്നു കിടക്കുക
marउताणा
mniꯆꯞꯇꯤꯡꯅ
nepसिधा
oriଚିତପଟାଙ୍ଗ
panਚਿੱਤ
sanउत्तान
tamநேரான
telవెల్లకిలా
urdچت , پشت کےبل , سینےکےرخ
See : मन, चित

चित्त     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मन

चित्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The faculty of reasoning; the discursive faculty; the reason, the mind. The heart considered as the seat of sentiment, affection, or passion. चित्त पुरविणें To pay attention; to mind or heed. चित्तांत खाणें impers. or in. con. To feel remorse or compunction.

चित्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The faculty of reasoning; the mind.
चित्त पुरविणें   To pay attention; mind.
चित्तांत खाणें   To feel remorse.
चित्ताची आर्द्रता   Tenderness of heart.

चित्त     

ना.  अंतःकरण , अंतर्याम , दिल , मन , मानस , स्वान्त .

चित्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मन, लक्ष, अंतःकरण

चित्त     

वि.  क्षणिक बुध्दीचा ; लहरी ; अस्थिर मनाचा ; कमकुवत . [ सं . ]
 न. मन ; अन्त : करण ; बुध्दि ; वृत्त्यात्मक अन्त : करण पंचकांतील चवथा अवयव ; मनोवृत्ति , विकार , भावना , राग इ० कांचें अधिष्ठान मानलेलें हृदयस्थान . जे वस्तुचा निश्चयें केला । पुढें तेंचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें । - दा १७ . ८ . ८ . [ सं . ] ( वाप्र . ).
०उडून   अक्रि . १ घाबरणें , उदास होणें ; मन न रमणें . ( कर्त्याची षष्टी असते ). तें ऐकून महाराजांचें चित्त उडून गेले . - चंद्र १३४ . २ एखाद्या गोष्टीविषयीं मन विटणें ; नावड उत्पन्न होणें .
०पणा  पु. चंचलता ; अस्थिरता ; स्वैरपणा . बोलण्यांत चंचलपणा असण्याचें कारण विचारांत चंचलपणा असतो ... तो कृतींतही उतरतों . - शिवपावित्र्य ७० .
जाणें   अक्रि . १ घाबरणें , उदास होणें ; मन न रमणें . ( कर्त्याची षष्टी असते ). तें ऐकून महाराजांचें चित्त उडून गेले . - चंद्र १३४ . २ एखाद्या गोष्टीविषयीं मन विटणें ; नावड उत्पन्न होणें .
०पुरविणें वि.  लक्ष्य देणें ; लक्ष्यपूर्वक ऐकणें . चित्तांत खाणें - अक्रि . मनास लागणें ; वाईट वाटणें . सामाशब्द -
०क वि.  हुषार ; चलाख ; अल्पवयस्क असून मोठया विषयाकडे चित्त लावण्याचा स्वभाव ज्याचा तो . चित्तंगम - वि . हृदयंगम ; मनोवेधक ; हृदयस्पर्शी . माझीं मी निवडूनि अर्पिलिं फुलें अत्यंत चित्तंगम । - टिक १५२ .
०गेह  न. हृदयरूपी घर ; मन हेच गर ; मन . विकल्प प्रवेशला ते समयीं । चित्त गेहीं कैकेयीच्या । - रावि ९ . १६१ . [ सं . चित्त + गेह = घर ]
०चतुष्टय  न. मन , बुध्दि , चित्त व अहंकार या चारांचा समुदाय . चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजेतो । - ज्ञा १५ . ९७ . चित्तचतुष्टयय चमत्कार । मन बुध्दि चित्त अहंकार । - एभा २२ . ३५० . - एभा ३ . ११२ . [ सं . चित्त = मन + चतुष्टय = चारांचा समुदाय ]
०चमत्कार  पु. आश्चर्य ; अचंबा ; सानंदाश्चर्य . [ सं . चित्त + चमत्कार ]
०चाळक वि.  १ इच्छेचें , मनोवृत्तींचें नियमन करणारा ( ईश्वर ). चित्तचाळक विटेवरला । तो हरि माझ्या मनीं भरला । जयजय सकळ चित्तचाळका । २ मन रमविणारा ; मनोरंजक ; मन चाळविणारा , विकारयुक्त करणारा . [ सं . चित्त + चालक ]
०चोर   चोरटा - वि . मन हरण करणारा ; चित्ताकर्षक . [ सं . चित्त + चोर ]
०ज   पु मदन ; कामदेव ; मनांत जन्मणारा ( मदन ). [ सं . चित्त = मन + ज = जन्मणारा ]
०जडसंयोग  पु. आत्मा आणि शरीर यांचा संयोग . [ सं . चित्त = चैतन्य + जड = स्थूल ( शरीर , देह )+ समू + योग = एकत्र येणें ]
०निग्रह  पु. मनाचें संयमन , नियमन ; मन ताब्यांत ठेवणें . [ सं . चित्त + निग्रह = ताव्यांत , दाबांत ठेवणें ]
०निर्वृत्ति  स्त्री. मनाची शांति ; चित्ताची विश्रांति . [ सं . चित्त + निर + वृत्ति ]
०पावन   पु , चितपावन पहा .
०पोळया  पु. चितपावनांना तुच्छतेनें , उपहासानें संबोधण्याचा शब्द .
०प्रसन्न वि.  समाधानी ; संतुष्ट ; शांत चित्ताचा . [ सं . चित्त + प्रसन्न = तुष्ट , शांत ]
०भ्रंश  पु. १ मानसिक शक्तींचा भंग ; म्हातारचळ . २ देहभानाचा नाश ; चित्तभ्रम ; डोकें ठिकाणावर नसणें ; डोकें फिरणें . [ सं . चित्त + भ्रंश ]
०भ्रामक वि.  मनाला मोहून टाकणारा ; चिताकर्षक ; मन वेडें करणारा . [ सं . चित्त + भ्रामक ]
०लहरी   स्त्रीअव . मनस्तरंग ; मनाची हुक्की ; मनोविकार ; मनाचे छंद , तरंग , विलास इ० ब्रह्मानंद सागरीं । विराल्या चित्तलहरी । [ सं . चित्त = मन + लहरी = लाटा , तरंग ]
०विभ्रम  पु. मन बहकणें ; बुध्दिभ्रंश ; मन ठिकाणावर नसणें . [ सं . चित्त = मन + वि = विरुध्द + भ्रम = फिरणें ]
०वृत्ति  स्त्री. १ लक्ष्य ; मन . चित्तवृत्ति ठिकाणीं नाहीं फिरली , बदलली , उडून गेली . २ मनाच्या लहरी , तरंग , परिभ्रमण , उड्डाण . चित्तवृत्ती घटकेघटकेंत पालटातातं . [ सं . चित्त = मन + वृत्ति = वर्तन , वागणें , असणें ]
०वेधक वि.  मन आकर्षिणारा ; मन हलवून सोडणारा ; अन्त : करणास भिडणारा ; हृदयंगम ; [ सं . चित्त + वेधक = वेधणारा ]
०वैकल्य  न. मनोभ्रम ; बुध्दिभ्रंश ; मन बहकून जाणें . [ सं . चित्त + वैकल्य = विकलता , भ्रम , पंगुपणा ]
०शुध्दि  स्त्री. मनाचा शुध्दपणा , पवित्रपणा ; मनाचें रागद्वेषादि वाईट भावनांपासून अलिप्त राहणें . चित्तशुध्दि नसलिया जाणा । एकांतीं मांडिती देवार्चना । पुढें आठवी मनकामना । तें रानोरान हिंडवी । [ सं . चित्त + शुध्दि ]
०संकोच  पु. १ मनोविग्रह ; मनावरील दाब . २ ( विनयामुळें होणारा ) मनाचा लाजाळूपणा ; भिडस्तपणा ; शालीनता . [ सं . चित्त + संकोच = आंखूडपणा ; भिडास्तपणा ]
०समाधान  न. मनाचें स्वास्थ्य ; चित्ताची शांति ; संतुष्टता . [ सं . चित्त + सम + आ + धा अन ]
०स्थैर्य  न. मन : स्वास्थ्य ; मनाची स्थिरता , शांति . [ सं . चित्त + स्थैर्य = स्थिरता ]
०हीन वि.  मन ठिकाणावर नसणारा ; मनावर योग्य संस्कार नसलेला ; अप्रबुध्द . तें आघवेंचि गेलें वाया । जे चित्तहीन । - ज्ञा ९ . १७८ . [ सं . चित्त = मन + हीन = टाकलेलें , वाईट क्षुद्र ] चित्ताची आर्द्रता - स्त्री . मनाचा कोंवळेपणा ; चित्ताची मृदुता . चित्ताथिला - वि . सजीव ; विचारी ; चित्तसंपन्न . मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला । - ज्ञा १८ . १७ . ३२ . चित्तैकाग्र्‍य - न . मनाची एकाग्रता , एकतानता . [ सं . चित्त + ऐकाग्र्‍य = एकाग्रता ]

चित्त     

चित्त उडून जाणें
घाबरणें
उदास होणें
खिन्न होणें
एखाद्या गोष्‍टीत मन रमेनासे होणें. ‘ते ऐकून महाराजांचे चित्त उडून गेले.’ -चंद्र १३४.
मन विटणें
एखाद्या गोष्‍टीचा कंटाळा येणें
एखाद्या गोष्‍टीपासून मनास आनंद न होतां दुःख होऊं लागणें.

चित्त     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : आत्मा, मन

चित्त     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चित्त  mfn. amfn. ‘noticed’ See अ-चि॑त्त
‘aimed at’, longed for, [ChUp. vii, 5, 3]
‘appeared’, visible, [RV. ix, 65, 12]
चित्त  n. n. attending, observing (तिर॑श् चित्ता॑नि, ‘so as to remain unnoticed’), , vii, 59, 8
thinking, reflecting, imagining, thought, [RV.] ; [VS.] ; [ŚBr.] &c.
intention, aim, wish, [RV.] ; [VS.] ; [AV.] ; [TBr.] &c.
चित्त  f. n. ([Naigh. iii, 9] ) the heart, mind, [TS. i] ; [ŚvetUp. vi, 5] ; [MBh.] &c. (ifc.f(). , [Pañcat.] )
चित्त  n. n. memory, [W.]
intelligence, reason, [KapS. i, 59] ; [Yogas. i, 37; ii, 54] ; [Vedântas.]
(in astrol.) the 9th mansion, [VarYogay. iv, 1]
इह   cf.-, चल-, पू॑र्व-, प्रा॑यश्-, लघु-, सु-, स्थिर-.
चित्त   b See √ 4.चित्.

चित्त     

चित्त [citta] p.p. p.  p. p. [चित्-क्त]
Observed, perceived.
Considered, reflected or meditated upon.
Resolved
Intended, wished, desired.
Visible, perceptible.
त्तम् Observing, attending.
(a) Thought, thinking, attention; (b) desire, intention, aim; मच्चित्तः सततं भव [Bg.18.57;] अनेकचित्तविभ्रान्त 16.16.
The mind; यदासौ दुर्वारः प्रसरति मदश्चित्तकरिणः [Śānti.1.22;] so चलचित्त and comps. below.
The heart (considered as the seat of intellect).
Reason, intellect, reasoning faculty.
Knowledge; चित्तं चित्तादुपागम्य मुनिरासीत संयतः । यच्चित्तं तन्मयो वश्यं गुह्यमेतत्सनातनम् ॥ [Mb.14.51.27.] -Comp.
-अनुवर्तिन् a.  a. acting according to one's will, humouring.
-अपहारक, -अपहारिन्, -आकर्षिन्, -हारिन्   a.
'heart-stealing', attractive, captivating.
pleasing, agreeable, beautiful.
-अर्पित a.  a. preserved in the heart; चित्तार्पितनैषधेश्वरा [N.9.31.]
-आभोगः   attention of the mind to its own feelings, exclusive attachment to one thing.
-आसङ्गः   attachment, love.
-उद्रेकः   pride, arrogance.
-ऐक्यम्   agreement, unanimity.
-उन्नतिः, -समुन्नतिः  f. f.
noble-mindedness.
pride, arrogance.-कलित a. anticipated, expected, calculated.
-खेदः   grief
-चारिन् a.  a. acting according to the will of another.
-जः, -जन्मन्  m. m.,
भूः, योनिः love, passion.
Cupid, the god of love; चित्तयोनिरभवत्पुनर्नवः [R.19.46;] सोऽयं प्रसिद्धविभवः खलु चित्तजन्मा [Māl.1.2.]
-ज्ञ a.  a. knowing the mind of another; ते बहुज्ञस्य चित्तज्ञे पत्न्यै, पत्नौ पत्युर्महीक्षितः [R.1.56.]
-नाथः   lord of the heart; चित्तनाथमभिशङ्कितवत्या [Śi.1.28.]
-नाशः   loss of conscience.
-निर्वृत्तिः  f. f. contentment, happiness.
-प्रमाथिन् a.  a. moving or touching the heart, exciting passion or love.
-प्रशम a.  a. composed, tranquil. (-मः) tranquility of heart.
-प्रसन्नता   joy, pleasure.
भेदः difference of view.
inconsistency, inconstancy.
-मोहः   infatuation of the mind.-रक्षिन् a. (=
-चारिन्); शुश्रूषुर्निरभीमाना पतीनां चित्तरक्षिणी   Mb.3.233.2.
-रागः   affection, passion, desire.
-विकारः   change of thought or feeling
-विक्षेपः   distraction of the mind.
-विप्लवः, -विभ्रंशः, -विभ्रमः   aberration, disturbance or derangement of mind, madness, insanity; स्वप्नोऽयं चित्तविभ्रंश उताहो सत्यमेव तु [Mb.13.54.15.]
-विश्लेषः   breach of friendship.
disposition or state of the mind, inclination, feeling; एवमात्माभिप्रायसंभावितेष्टजन- चित्तवृत्तिः प्रार्थयिता विडम्ब्यते [Ś.2.]
thinking, imagining.
inward purpose, emotion.
(in Yoga phil.) inward working of the mind, mental vision; योगश्चित्तवृत्ति- निरोधः [Yoga S.]
-वेदना   affliction, anxiety.
-वैकल्यम्   bewilderment of the mind, distraction.
-सङ्ख्य a.  a. pervading the heart, penetrating the soul.
-हारिन् a.  a. fascinating, attractive, agreeable.

चित्त     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चित्त  n.  (-त्तं) The mind or faculty of reasoning, the heart considered as the seat of intellect.
E. चित् to consider, and करणे क्त aff.
ROOTS:
चित् करणे क्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP