|
स्त्री. एक मोठी ३ - ४ फुट व्यासाची २ फुट खोल बांबूची परडी . ' यल्लमाची मूर्ती पुजारी सौदत्तीस घेऊन जात . हिला जगाची यल्लमा म्हणता .' - शिंआत्म ११ . न. १ स्थावरजंगमरूप अखिल सृष्टि ; विश्व ; पृथ्वी ; दुनिया . २ ब्रह्मांड ; माणसांचें वसतिस्थान ; मनुष्यजात ; लोक . [ सं . जगत ] ( वाप्र . ) जगांतून उठणें - १ लोकाचा विरुध्द वागणें . २ ( वैधव्यामुळें , आपत्तीमुळें ) सर्वस्वी बुडणें . जगाबाहेरील , निराळी चाल - लोकविलक्षण चाल . जगामुलखानें सोडलेला - जातीवेगळा टाकलेला ; सार्या गांवाची ओवाळणी ; सार्या दुनियेची खरवड . म्ह० आपण भला तर जग भलें आपण मेला जग बुडालें . सामाशब्द - ०गोळ पु. ( काव्य ) पृथ्वीरूपी गोल . जैसा महाप्रलयीं जगगोळ । जाहाला उदकाभ्रें ब्रह्मगोळ । ०चालक वि. ( काव्य ) जगाचें भरणपोषण करणारा ( ईश्वर ). जगच्छेट - जगतछेट पहा . जगजाहीर - वि . सर्व लोकांना माहित असलेला ; प्रसिध्द असलेला . ०जीवन न. जगज्जीवत पहा . ०जुग न. ( महानु . ) मोठी आपत्ति , जगावर आकाश कोसळणें . औचित्तें जगजुग पडिले सनकादिकावरी । ०जूट पु. सुव्यवस्था . ०जेठी पु. ( काव्य ) १ जगामधील मोठा ( ईश्वर ). २ जगांतील बलवान पुरुष , मल्ल . आम्ही जगजेठी असतां । - एरुस्व ६ . ३५ . - ज्जनक - पु . जग उत्पन्न करणारा . जगतकारण पहा . - ज्जीवन - न . जगाचें जीवन ; जीव सृष्टीचें जगण्याचें साधन ( पाऊसपाणी , अन्न इ० ). २ सजीव प्राण्यांचें अस्तित्व - वि . जगाचें धारण - पोषण करणारा ( ईश्वर ). ०झंप वि. ( महानु ) जगाला झोडणारा . उघटेआं देवां जगझंपु । - शिशु १५४ . ०झोडी स्त्री. बटीक ; दासी . लाज धरीं भांडे । जगझोडी रांडे । - तुगा . २६० . ०डंबर न. १ अवडंबर ; अवाढव्य पण निरर्थक थाटमाट , धामधूम , आव ( विद्या , पैसा यांचा ). ( क्रि० घालणें . २ अफाट जगास आश्चर्यानें म्हणतात ; विश्वविस्तार ; एखादी अवाढव्य , विस्तीर्ण वस्तु . तो हा जगडंबरु । - ज्ञा १५ . ४७ . [ सं . जगत + अंबर ] - डवाळ , डव्याळ - वि . प्रचंड ; अवाढव्य ( इमारत , शरीर , अरण्य ); प्रमाणरहित , बोजड ( पदार्थ ). [ सं . जगत + व्याल ] ०ढाल ढाळ - पु . ध्वज ; झेंडा . [ सं . जगत + ढाल ] जगत - न . जग अर्थ १ , २ , पहा . जगती - स्त्री . १ जग अर्थ १ , २ पहा . किं पळता सरली अवघी जगती । २ ( महानु . ) मठ . पूर्वाभिमुखजगती असे । - ऋ १०६ . जगतीतल - न . पृथ्वीतल ; पृथ्वीचा पृष्ठभाग . जगत्कर्ता - पु . ब्रह्मदेवाचें एक नांव . जगज्जनक पहा . - त्कारण - न . जगाला उत्पन्न करणारी शक्ति ; हा शब्द निरनिराळे पंथ , ईश्वर , माया , प्रधान , परमाणु , या निरनिराळया शब्दांना लावतात . जगतत्रय - न . स्वर्ग , मृत्यु , पाताळ . जगत्पति प्रभु - पु . जगाचा धनी , नियंता , ईश्वर किंवा राजा . जगत्पालक पाळक - वि . जगाचें पालन करणारा . जगतप्रसिध्द - वि . जगजाहीर पहा . जगत्प्राण - पु . हवा ; वायु . जगध्दंधु - पु . विश्वबंधु ; सर्व सृष्टीवर प्रेम करणारा . जगत्शेट - पु . १ फार श्रीमंत . २ ( ल . ) निर्धन पुरुष . जगत्शेटीचा नातू - वि . निर्धन मनुष्य . जगतस्त्रष्टा - जगज्जनक पहा . जगतस्वामी - पु . जगाचा धनी . जगतक्षय - जगाचा नाश . जगदंत - पु . जगाचा नाश शेवट , अखेर . [ जगत + अंत ] ०दंबा दंबिका - स्त्री . पार्वती ; देवी ; जगाची माता . विन्मुख जाहली जगदंबा । - एरुस्व ५ . ७३ . [ जगत + अंबा ] ०दळ दाळ - वि . १ जगाला भरडणारा . दापीतेआं देवांचा जगदळा । - शिशु १५५ . २ ( बायकी ) जगाशीं भांडणारा . ०दात्मा जगदीश दीश्वर - पु . ईश्वर ; ब्रह्म . [ जगत + आत्मा , ईश , ईश्वर ] ०दाभास पु. विश्वसादृश्य ; जडरूप माया ; बाह्य सृष्टि . [ जगत + आभास ] ०दुध्दार पु. १ जगाचा उध्दार , मुक्ति . २ - वि . जगाचा उध्दार करणारा . [ जगत + उध्दार ] - दगुरु - पु . १ ईश्वर . २ श्रीशंकराचार्यांची पदवी . ३ थिऑसफी पंथांतील गुरुस्थानी मानलेली श्रेष्ठ विभूति . - दभूषण - न . जगाचा अलंकार ; ईश्वर . - द्वंद्य - वि . सर्व जगास पूज्य . - द्विनाश - जगतक्षय पहा . - द्विलक्षण - वि . १ सर्व जगाहून निराळा ; विलक्षण . २ वाह्यात ; चमत्कारिक ; तर्हेवाईक . जगधाम , जगन्निवास - वि . ( काव्य . ) सगळें जग व्यापून राहणारा ; परमेश्वर ; सर्व जग हें ज्याचें घराअहे असा . ०नाड स्त्री. जगदळ - दाळ पहा . ०न्नाथ पु. १ जगाचा स्वामी . २ पुरी येथील श्रीविष्णूची मूर्ति . म्ह० आपला हात अन जगन्नाथ = स्वत : स पूर्ण स्वातंत्र्य असणें . [ जगत + नाथ ] ०न्नायक पु. जगाचा स्वामी , पालनकर्ता ; ईश्वर . [ जगत + नायक ] ०न्निंद्य वि. सर्व जग ज्याची निंदा करतें असा . ०न्नियंता वि. जगाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारा . - न्मंगल - वि . जगाचें कल्याण करणारा . माळा हे कमळा विचारुनि गळा घाली जगन्मंगला । - न्माता - स्त्री . १ जगाची आई ; जगदंबा . २ ( ल . ) मार्तृतुल्य स्त्री . - न्मित्र - पु . जगतबंधु पहा . आवडतें मूल , सुस्वभावी माणूस . - न्मोहना - स्त्री . जगाला भुलविणारी स्त्री . ०प्रसिध्द जगजाहीर पहा . ०बोळ पु. १ ( महानु . ) जगाला पारखा होणें . त्यागा जगबोळ जाहाला । - भाए ९१ . २ कडू कातबोळ . नारदा होतुसें जगबोळाचें मानू । - भाए ६३ . ०भांड वि. जगदळ पहा . ०मित्र मैत्र - वि . सर्व जगाशीं मैत्री करणारा . ०लीला स्त्री. १ जगाची रीत ; सर्वसामान्य लोकांची वागणूक , पध्दति , समजूत वगैरे . जगलीला अशीच , बर्याला वाईट वाईटाला बरें म्हणावें . २ आधिभौतिक मोह , माया ; खोटया जगाचा खर्या जगाप्रमाणें भास .
|