Dictionaries | References

जांवई

   
Script: Devanagari
See also:  आग्रह , जावई , शोध इ०

जांवई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A son in law. Pr. जा0 न्हाला वाफा शिंपला Two birds killed with one stone. 2 Applied fig. to a person who, without warrant, makes himself at home and easy in another's house.

जांवई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A son-in-law. Applied fig. to a person who, without warrant, makes himself at home and easy in another's house.

जांवई     

 पु. ( बे .) धाकट्या बहिणीचा नवरा .
 पु. १ मुलीचा नवरा ; जामात . २ ( ल . ) बोलाविल्या - कळविल्या शिवाय दुसर्‍याच्या घरीं जाऊन चैनींत राहणारा माणूस . [ वैसं . जामेय ; पूर्वी बहिणीचा मुलगा ( जामेय ) जांवई करून घेत ; तेव्हां शब्दहि तसाच ( जामि = बहीण ; जामेय = भाचा ) बनला आहे . सं . जामातृ ; प्रा . जामाऊ ; हिं . जमाई ; पं . जवाई ; गो . जांवय ; ग्री जामीतर ; फेंजि . नमुत्रो ; पँलेस्टाईन . जत्रो ] म्ह० १ जांवई न्हाला वाफा पाणी प्याला ( शिंपला )= एका दगडानें दोन पक्षी मारण्याप्रमाणें . २ अशी लेक हवई , घरोघर जांवई . ३ सासवेचे दोंदावर जांवई उदार . ४ जांवयाचे पंक्तीचें जेवण व लेकाबरोबर अध्ययन ( मिळण्यास दैव पाहिजे ) सामाशब्द -
०आग्रह  पु. १ ( जांवयाला करतात त्याप्रमाणें ) जेवणाखाण्याचा अतिशय आग्रह २ वरवर केलेला , तोंडदेखला आग्रह .
०जेवण  न. ( लग्नांतील जावयाचें जेवण ) थोडथोडें , नाजूकपणाचें खाणें ; अल्पाहार .
०डौल  पु. ( जावयासारखा ) फाजील ऐट , दिमाख ; यथास्थित दुसर्‍याच्या घरीं चैन करणें . जांवईण - स्त्री . जांवयाची बहीण ; करवली .
०पोशाक   पोषाक पोशाख पोषाख - पु . अतिशय डाम डौलाचा , प्रसंगाला न साजणारा असा . भपकेदार पोशाख .
०शोध  पु. मूळचें बरोबर असतां त्यांत ज्ञानाच्या घमेंडीनें अडाणी माणसानें चुकीचा घातलेला शोध ; शुध्दाचें अशुध्द करण्याचा खटाटोप ; अनवश्यक दुरुस्ती . ( हा शब्द एका मूर्ख जांवयाच्या गोष्टी वरून निघाला आहे ). जांवयाचा बेटा - १ जांवयाचा मुलगा . हा बहुत करून आपल्या कामाला निरुपयोगी असतो ; कारण तो वेगळया कुळांतला म्हणून त्याचें लक्ष आपल्याकडे लागणार नाहीं . २ ( ल . ) निरुपयोगी व आपल्याच तोर्‍यांत असणारा आप्त . म्ह० १ जावयाचा बेटा कर्डयीचापेटा . २ जावयाचें पोर हरामखोर . जांवयाची कीड - स्त्री . नाजुकपणादर्शक थट्टेची संज्ञा . जावयाची पंगत - स्त्री . ( जांवयाच्या पंगतीला सासू साखर तूप , पक्वान्नें इ० स्वत : भरपूर वाढते यावरून ) ( ल . ) श्रीमंतपणाची राहणी , जेवण .

जांवई     

जांवई आग्रह
[सासुरवाडी जावयाला विशिष्‍ट तर्‍हेने वागविले जाते व तोहि वागतो. यावरून बरेच वाक्‍प्रचार पडलेले आहेत व गोष्‍टीहि आहेत.] अतिशय आग्रह
फार भीड घालून, आपलेपणाने केलेला आग्रह.
वरवर आग्रह
केवळ शिष्‍टाचार म्‍हणून केलेला आग्रह.

Related Words

अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   जांवई   जांघाडी दुःख, जांवई वैद्य   जांवई न्हाला, वाफा शिंपला   सासरा सुखी, जांवई दुःखी   सासवेचे दोंदावर, जांवई उदार   अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीचें दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे   कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना   कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना   उठवळ सासू, थोट जांवई   माझी मुलगी सवाई, गल्लोगल्लीं जांवई   पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई   पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा   मात्थारिं दांतें दवरुनु घेवनु, जडु जाल्लेलो जांवई   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   जांवई पाव्हणा आला म्‍हणून रेड्याची धार काढायची नसते   बायको येडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेही तसे   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   जांवई जेवण   जांवई डौल   जांवई पोषाख   जांवई शोध   जांवई न्हाला, वाफा पाणी प्याला   धनगराचा जांवई, ताकासंगें शेवया खाई   सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   जांवई आला माझा, अन्‌ आयाबायांनो तुम्‍ही लाजा   नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य   व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं   बायको वेडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेहि तसेच   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   मुलाबरोबर शिकावें व जांवयाबरोबर जेवावें   शोध इ०   हलवाईंकी दुकान, और दादाजीक फाते   धुव दिवन जांवय जोडला   जामात   जवाई   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   रीण घेत्तचि रिणगारी उरुता, चलि दित्तचि जांवयि (माव) उरुता   मायची जिंदगी जावय दान दिता   मुलगी देऊन मुलगा करणें   नाका म्हणयार राजा जांवय करतात   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   पुष्प वर्षाव   दशमग्रह   जार, जामात, भगिनीसुत, हे उपकार नाहीं आठवत   दाहवाग्रह   माता वर पाहे संपतीवंतः कन्या वर पाहे वयसा युक्त   जामाता   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   कत्तलाची रात्र   अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य   माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण   मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें   पाय धुणें   नवरा रडतो तरणास, वर्‍हाडी रडतात वरणास   अहफाद   गिळंकृत   गिळंकृतत्वा   व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला   पुष्पवृष्टि   जावई   जामाता दशमो ग्रहः।   जावयाची कीट   अवघड   जावयाची कीड   दिवाळी   अडचण   आग्रह   तरण   विट   दश   घर   लोक         હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP