|
स्त्री. १ पक्ष्यांची झडप ; झेंप ; उडी . ( क्रि० घालणें ). २ ( मनुष्य पोहतांना , साप सरपटतांना , कडेवरील मूल एखाद्या ओळखीच्या माणसाच्या पुढें केलें असतांना करतात ती ) शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढें झोंकण्याची क्रिया ; झेंप ( क्रि० टाकणें ; मारणें ; घालणें ; खाणें ). ३ ( चोर इ० कांचा ) हल्ला ; छापा . ( क्रि० घालणें ; पडणें ). [ सं . झंप = उडी , बुडी ; बं . झाँप ; तुल० इं . जंप = उडी ] पु. १ कांटेरी झुडपांचें दाबून बांधलेलें मोठें ओझें ; काटयांचा भारा . २ झाडाची मोडलेली फांदी ; झांकर . ३ ( कों . ) नारळीच्या झाडाची फांदी , झावळी , सावळी . ४ नारळीची , माडाची चटईसारखी विणलेली झांवळी ; चुडवत ; सावळीचा वळलेला तट्टया , चटई . हा छपराला उपयोगी पडतो . ५ गुरें जाऊं नयेत म्हणून केलेलें फाटक , दुबेळकें . बेडें ; आँगर ; झांपा . ६ दाराचें , खिडकीचें झडप , फळी . ७ शेतांतील गवतारू झोंपडी ; गुरवाडा . शेतांत एकदोन घरें असलीं तर त्यांना झांप म्हणतात . - गांगा २ . ८ कोंबडयांसाठीं मोठया करंडयाच्या आकाराचें केलेलें तट्टयाचें खुराडें . [ प्रा . झंप = झांकणें ; हिं . झांप = झांकण ; गु . झांप = जाळें ] स्त्री. ( मूर्च्छा , भूतबाधा , पित्त इ० मुळें डोळयावर येणारी ) गुंगी ; झांपड ; ग्लानि ; तंद्री . [ सं . स्वाप ( झोंप )- झ्वाप - झांप - झाप . - भाअ १८३४ . ] न. ( गो . ) गुंतागुंत ; घुसणी पहा . [ गु . झांप = जाळें ] ०टळ न. माडाची जुनी झांवळी ; जुनी झांप . [ झांप + टळ प्रत्यय ]
|