Dictionaries | References त तांबड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तांबड A dictionary, Marathi and English | Marathi English | | Red soil. Rate this meaning Thank you! 👍 तांबड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Red soil. Rate this meaning Thank you! 👍 तांबड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. तांबडी जमीन . - वि . तांबडा या विशेषणाचे समासांत पूर्वपदी येणारे रुप . [ तांब + ढ प्रत्यय ] सामाशब्द -०तोंड्या वि. ( उप . ) इंग्रज ( मनुष्य ); साहेब ; गोरा . ह्या तांबडतोंड्यास आता चावू का खाऊं , असे त्याला झाले . - हि . १३९ .०माती स्त्री. तांबडी माती .०सर वि. तांबूस ; लालसर ; कांहीसा तांबडा .०सांज स्त्री. सूर्यास्तानंतर तांबडे आभाळ होते ती वेळ ; तांबसांज . [ तांबडी + सांज ] तांबडा पु . स्त्रियांना होणारा एक रोग . - वि . लाल ; रंगाचा ; रक्त वर्णीय . [ सं . ताम्र ; प्रा . तांब ; तांबड पहा . ]०अबलक ख वि . पांढर्या अंगावर तांबडे ठिपके असलेला ( घोडा ). - मसाप २ . १ . ५५ .०आंबा पु. रातंबा .०ऊस पु. तांबड्या रंगाचा ऊस .०एरंड पु. लाल एरंड .०कंदील पु. ( फोटोग्राफी ) अंधार्या खोलीत ज्याच्या साहाय्याने फोटोग्राफरला कांचा धुतां येतात तो कंदील .०कुडा वि. कुड्याच्या झाडाची एक जात ; दुसर्या प्रकारास काळाकुडा म्हणतात .०कुमाइत वि. तांबड्या रंगांत तेल्या रंगाची झांक असणारा ( घोडा . ) - मसाप २ . १५५ .०कोळी पु. १ अंजिरावर पडणारा एक रोग .०चिकणा पु. ज्वारीची एक जात .०चित्रक पु. लाल रंगाचा चित्रक .०ढेकूण पु. कापशीच्या बोंडातील बी खाणारा एक किडा .०बोर वि. १ घोड्याचा एक विशिष्ट रंग ; तेल्या कुमाइत ; ( इं . ) चेस्टनट . २ तेल्या कुमाइत रंगाचा .०बोळ पु. बोळाची एक जात ; ( विरु . ) रत्त्क्या बोळ .०भोपळा पु. एक फळभाजी ; डांगरीचे पिकलेले फळ ; दुसर्या जातीच्या भोपळ्यास पांढरा किंवा दुध्या भोपळा म्हणतात .०माठ स्त्री. माठ या पालेभाजीची लाल रंगाची जात .०मुरुम पु. लाल जातीचा मुरुम ; दुसरे काळा , उडद्या , लोखंडी , दगडी इ० मुरुमाचे प्रकार आहेत .०मुळा पु. मुळ्याची एक जात .०लाल वि. लालभडक ; गडद तांबडा ; अतिशय लाल . [ तांबडा + फा . लाल = तांबडा ] तांबडी स्त्री . १ जोंधळ्याची एक जात . २ एक प्रकारचे गवत . कुंदा गोगडी हराळी । तिकांडी घोडेकुसळी । कर्हवेळु मारवेळु गोंडाळु । तांबडी अपार । - गीता २ . ५२८६ . ३ जमीनीची एक जात . ४ विड्याच्या पानांची एक जात . इचे पान उशीरा तयार होते . नाशिक जिल्ह्यात ही जात होते . - कृषि ५२० . ५ केळीची एक जात ; या जातीचे केळे तांबडे असून त्याला गोडी फार असते व ते ऊन भाकरीवर वितळते .०कोरंटी कोरांटी - स्त्री . लाल रंगाची फुले येणारी कोरांटी .०चंद्रकळा स्त्री. ( विणकाम ) किनार कसल्याहि रंगाची असून पोत मात्र तांबड्या रंगाचा असतो असे लुगडे .०दुपारी स्त्री. दुपारी या फुलझाडाची तांबडी फुले येणारी जात ; त्या झाडाचे फूल .०फाजगी गुंजे स्त्री . ( विणकाम ) एक प्रकारचे लुगडे ; यात एक काडी काळी व एक काडी तांबडी उभार व आडवण एक काळी काडी व एक तांबडी काडी असून किनार कोणतीहि असते .०भाजी स्त्री. १ ( सांकेतिक उप . ) मांस . २ ( गो . ) तांबडी माठ ही पालेभाजी .०मिरानी स्त्री. ( विणकाम . ) लुगड्याची एक जात ; या जातीच्या लुगड्याच्या पोतांत दोन घरे ( काड्या ) काळी व दोन घरे तांबडी असे उभार असून आडवण काळे असते व किनार कसल्याहि तर्हेची असते .०साल ळ स्त्री . भाताची तांबड्या तुसाची एक जात .०सुरळी ( विणकाम . ) लुगड्याची एक जात ; या प्रकारांत , पोतांतील एक घर काळे व एक तांबडे असे उभार असून आडवण सर्व काळे असते . तांबडे कमळ न . कमळाची तांबड्या रंगाची जात . तांबडे फुटणे पहाट होणे ; उजाडणे ; ( सूर्योदयापूर्वी पूर्वेकडे ) आकाश तांबडे होणे ; अरुणोदय होणे . तांबड्या माडाचे सोडण न . ( गो . ) ( ल . ) थापबाजी करणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP