Dictionaries | References

तारांगण

   
Script: Devanagari

तारांगण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

तारांगण

 ना.  आकाश मंडप , आकाश मंडळ , नभोमंडळ .

तारांगण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  विद्यार्थ्यांना तसेच लोकांना आकाशाची माहिती देण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी, ग्रह आणि तार्‍यांच्या भ्रमणासहित रात्रकालीन आकाश दाखवण्यासाठीचे गोल छत असलेले गृह   Ex. शाळेतील मुले आज तारांगण बघायला गेली आहेत..
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तारागृह खगोलालय
Wordnet:
benতারামণ্ডল
gujતારગૃહ
hinतारागृह
kasپِلینَٹیرِیَم
oriପ୍ଲାନେଟୋରିୟମ
sanतारागृहम्
urdافلاک نما , سیارہ گاہ
 noun  तारकांचा समूह   Ex. अंधार्‍या रात्री तारांगणाचे निरिक्षण करायला खूप आवडते.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinतारागण

तारांगण

  न. १ नभोमंडळ ; नक्षत्रमंडळ . २ वेधशाला . ३ खेळ , मजा इ० पाहण्यासाठी केलेले उच्चासन , माळा , माचोळा . ४ घरच्या वरच्या मजल्याच्या खिडकीपुढे ( हवा खाण्यासाठी , मजा पाहण्यासाठी ) केलेला लहान सज्जा . ५ ( ल . ) ( सैन्य इ० कांची ) दाणादाण ; पांगापांग ; विकळितपणा ; वाताहत ; फांकाफांक . फौज मोडून तारांगण केले . - शारो २८ . ६ . ( कामे , धंदा इ० कांतील ) गोंधळ ; अव्यवस्था . ७ . ( सावकाराच्या तगाद्यामुळे कुळाची , अनाथ मुलाची ) तारंबळ ; त्रेधा ; घाबरगुंडी ; मनःक्षोभ . ८ ( गो . ) कौले घालण्यापूर्वी घरावर तयार केलेले लांकडी काम . [ तारा + अंगण ] ताराधीश - पु . चंद्र . तारापात - पु . उल्कापात . [ तारा + सं . पात = पडणे ] ताराबल , - न . विवक्षित असलेल्या नक्षत्र ग्रहांदिकाची अनुकूलता ; ज्योतिष शास्त्रदृष्ट्या मंगल अशी वेळ . तारामंडल , - न . १ नक्षत्रांनी युक्त असे गगनमंडल ; तारांगण अर्थ १ पहा ; नक्षत्रमंडळ . २ ( सोनारीचा धंदा ) स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक दागिना . दोन्ही फाशांत दोनदोन असे चार मणी लावलेली ठुशांची पेटी घेऊन तिच्याखाली एक मणी ओवून त्या तर्‍हेने एकाबाजूस सव्वीस व दुसर्‍या बाजूस सव्वीस अशा पेट्या घालतात व मध्यंतरी घागर्‍यांचे थर लाविलेले मंगळसूत्र घालून हे सर्व एकत्र पटवून हा दागिना तयार करितात . [ तारा + मंडल = वर्तुळ , समुदाय ] तारामैत्री - स्त्री . १ कुंडलीतील ग्रहांतील मित्रभाव . तिजशी माझे तारामैत्री मिळाल्याप्रमाणे सख्य जमले आहे . - कमं २ . ६५ . २ नुसत्या नजरानजरीने जमलेले सख्य , प्रेम . तारासमूह - पु . आकाशांत ढगाच्या किंवा धुक्याच्या ठिपक्यांप्रमाणे दिसणार्‍या अंधक तेजस्वी पदार्थांचा समुदाय ; तेजोमेघ . - ब्रूसकृत ज्योतिषशास्त्राची मूलतत्त्वे १७९ . [ तारा + समूह ]
  न. ( ल .) अकांडतांडव ; आदळाआपठ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP