|
पु. १ ( संगीत . ) षडज स्वरापासून निषादापर्यंत ( खर्जात ) स्वर गाऊन पुन्हा उंच षडजापर्यंत घेतात तो आलाप , सूर . २ ( सामा . ) उंचस्वर . - वि . १ उंच ; खणखणीत ( स्वर , आवाज , कंठ ). २ लखलखीत ; चकचकीत ; स्वच्छ ; ट्प्पोर . कैसे उन्मेखचांदिणे तार । आणि भावार्थु पडे गार । - ज्ञा ६ . १३४ . [ सं . ] स्त्री. १ धातु , रेशीम इ० पदार्थांचा तंतु ; तात ; धागा ; दोरा . २ ( भिजलेली कणीक , काकवी , मध इ० सारख्या ) अर्धवट द्रव किंवा चिकट पदार्थाचा तंतूसारखा अवयव . ३ ( मादक पदार्थाच्या सेवनाने येणारा ) अंमल ; कैफ ; निशा ; उन्माद . म्हण तार माही आली तार ! - तोबं ९३ . ४ ( संपत्ति इ० काने येणारा ) ताठा ; धुंदी ; मद . ५ ( पित्ताधिक्य , जाग्रण इ० कांमुळे ) डोळ्यांस येणारा जडपणा ; मंदपणा ; अंधेरी . ( क्रि० चढणे ; येणे ; लागणे ). ७ मनाचा कल , प्रवृत्ति . - पु . केंस . ज्याचे तार ( केंस ) पांढरे तो ( घोडा ) युद्धांत उत्तम . - अश्वप १ . २६ . ९ ( अशिष्ट ) ( अनेकवचनी प्रयोग ) गुह्यभागावरील रोम . ( क्रि० उपटणे ). तारा उपटणारा असा ग्राम्य प्रयोग . १० ( ल . ) ( संभाषण , वाद इ० कांचे ) अनुसंधान ; संबंध ; संगति ; ओघ ; धोरण . ( क्रि० लावणे ; लागणे ; धरणे ; सोडणे ; सुटणे ). ११ एखाद्या क्रियेचा संतत क्रम ; ओघ ; परंपरा ; अनुबंध जसेः - कामाची - गाण्याची - पावसाची - नांगरण्याची - लिहिण्याची - वार्याच्या वाहण्याची - तार . ( सामा .) प्रवाह ; ओघ . ( क्रि० लावणे ; लागणे ). १२ ( कधी पु . उपयोग ) तारायंत्राने आलेली , पाठविलेली बातमी , संदेश . ( इं . ) टेलिग्राम शब्दाला प्रतिशब्द . डॉक्टर . मुंजे यांनी तार केली . - केसरी १७ . ५ . ३० . १३ - पु . ताव ; आवेश . गोविंदरावांनी ऑफिसच्या रागाचा तार आपल्या पत्नीवर काढला . [ तार ] ( वाप्र . ) ( एखाद्याची ) तार ओळखणे - जाणणे - ( एखाद्याच्या मनाचा कल , इच्छा , अभिप्राय , धोरण , तर्काने जाणणे . ( एखाद्याची तार ) राखणे - सांभाळणे - एखाद्याची मर्जी , तबियत राखणे , संभाळणे ; मर्जी राखून वागणे . तारा तोडणे - १ ( रागाने , उर्मटपणाने ) गर्जना करणे ; शिरा ताणून बोलणे गर्जणे . २ भलतेसलते बोलणे ; उद्धटपणाने दुसर्याचा अपमान होईल असे बोलणे . ( एखाद्याच्या ) तारेस उभा राहणे - तारेने वागणे , चालणे - ( एखाद्याच्या ) मर्जीप्रमाणे वागणे , चालणे . तारेस उभा करणे - मर्जीस उतरणे ; मनास येणे . तारेस लागणे , असणे - एखद्या गोष्टीच्या इच्छेत , विचारांत गुंगून जाणे ; त्या तारेत असणे . सामाशब्द - पु. १ पाण्यावर तरण्यासाठी घेतलेला आधार ; तर . ऐसा परस्परे आहे जी विचार । भोपळ्याचा तार दगडासी । - तुगा ११०४ . २ ( गो . ) ( नदी , खाडी इ० कांचा ) उतार . [ सं . तृ = तरणे ] स्त्री. ( महानु .) नाणें . ' कोन्हीं तास घालितो .' कांहीं तर कवडा होता तयाची पूजा द्रव्यें आणिलीं . । ' - उच २०३ . वि. विकीर्ण ; उध्वस्त ; पांगापांग . दाणादाण झालेला . फौजेवर हंगामा करुन फौज तार - बतार करावी . - रा ७ . २१४ . [ फा . तार द्वि . ] पु. ( तंजा . ) केळीचा लोंगर , घड . [ का . तरु = सुपारीचा लोंगर ; ता . ] ०कशी स्त्री. १ तार काढणे ; तारकसाचा धंदा . २ ( ल . ) तारेप्रमाणे ओढून काढणे ; छळ ; जुलूम ; गांजणूक ; जाच . ( क्रि० लावणे ; मांडणे ; करणे ). [ फा . तारकशी ] ०नाद पु. दातांच्या मागील उंचवट्यांतून उत्पन्न होणार नाद ; ह्याचा उपयोग दूरच्यास हांक मारण्याकडे होतो . मध्य नादाच्या दुप्पटीच्या प्रमाणांत तारनाद असतो . ०कशी - ( एखाद्यास ) दुःखप्रद अशा जाचांत , काचांत करड्या रीतीने वागविणे ; तरवारीच्या धारेवर धरणे ; सुळावर वागविणे . [ तारकस ] ०षडज पु. ( संगीत ) मध्यसप्तकांतील षडज स्वराच्या ध्वनीच्या दुप्पटीच्या प्रमाणाचा स्वर . धरणे - ( एखाद्यास ) दुःखप्रद अशा जाचांत , काचांत करड्या रीतीने वागविणे ; तरवारीच्या धारेवर धरणे ; सुळावर वागविणे . [ तारकस ] ०सप्तक न. ( संगीत ) तारनादयुक्त सात स्वरांचा समुदाय ; तृतीयसप्तक . [ तार + सं . तप्तक = सात स्वरांचा समुदाय ] ०कस - पु . ( जरतार धंदा ) बिन चापडलेली , नुसती रेशमावर गुंडाळलेली तार . कशी - सी - स - वि . १ सोने , रुपे इ० धातूच्या तारांनी कलाबतूने विणलेले . ( दिल्ली ) शहरांत तारकशी कामे व अनेक प्रकारचे नकशी केलेले पदार्थ फार चांगले मिळतात . - तीप्र ६८ . २ ज्याच्या भोवती तारेचे , सुतळीचे जाळे घट्ट विणलेले आहे असे ( भांडे इ० ). ३ तारांचा केलेला - पु . सोने , रुपे इ० धातूची तार काढणारा . [ फा . तारकश ( तार + कशीदन = ओढणे , काढून घेणे ]. ०स्वर पु. ( संगीत ) रागालाप तारसप्तकांतील कोणत्या स्वरापर्यंत जावा याची मर्यादा दाखविणारा तारसप्तकांतील स्वर . झीक - पु . ( जरतार धंदा ) बिन चापडलेली , नुसती रेशमावर गुंडाळलेली तार . कशी - सी - स - वि . १ सोने , रुपे इ० धातूच्या तारांनी कलाबतूने विणलेले . ( दिल्ली ) शहरांत तारकशी कामे व अनेक प्रकारचे नकशी केलेले पदार्थ फार चांगले मिळतात . - तीप्र ६८ . २ ज्याच्या भोवती तारेचे , सुतळीचे जाळे घट्ट विणलेले आहे असे ( भांडे इ० ). ३ तारांचा केलेला - पु . सोने , रुपे इ० धातूची तार काढणारा . [ फा . तारकश ( तार + कशीदन = ओढणे , काढून घेणे ]. ०खिळा पु. पोलादाच्या , लोखंडाच्या तारेचा खिळा ; तारचूक . ०घर न. तारेने संदेश पाठविण्याचे सरकारी कार्यालय ; तारहापिस ;( इं . ) टेलेग्रॅफ ऑफिस . - सन १८५७ . पृ . ४२७ . ०दान नी नस्त्री . ( वाद्य ) तंबोरा ; सतार इ० तंतुवाद्यास लावलेल्या तारा जिच्यावरुन ओवलेल्या असतात ती हस्तिदंताची सछिद्र पट्टी ; वांकडा खिळा ; घोडी . [ फा . ] ०फेणी स्त्री. रवा - सपीटाची तार काढून तिचे चौंगे ( वेटोळी ) तुपांत तळून केलेले एक पक्वान्न . - गृशि १ . ४०६ . [ तार + फेणी ] ०बंदी वि. पोतांत सोन्याच्या तारांच्या कलाबतूच्या चौकटी असलेले ( पैठणी इ० वस्त्र ). मुगी पैठणी रेशमी म्यानबंदी । जरी साजिरी पल्लवी तारबंदी । - अकक २ , किंकरकृत द्रौपदीवस्त्रहरण ८१ . [ तार + बंद ] ०ब्रश पु. तारांचा ब्रश ; घासून झिलाई ( पॉलिश ) करण्याची तारांची कुंचली . [ तार + इं . ब्रश = कुंचली ] तारंतार क्रिवि . बरोबर ; तंतोतंत ; पूर्णपणे ; सर्वांशी ; एकूणएक . तारोतार पहा . ( क्रि० मोजणे ; मापणे ; पडताळा भरणे , देणे ; ( ल . ) बोलणे ; जेवणे ). तारायंत्र न . विजेच्या साहाय्याने धातूच्या तारेतून संदेश पोंचविणारे यंत्र ; विद्युत्संदेशहारक यंत्र ; ( इं . ) टेलिग्राफ . तारेची बांगडी स्त्री . जिच्यावर कथलाची तार किंवा वर्ख चढविलेला असतो अशी बांगडी . दाट बांगड्या पाहती ( पाहाहाती ? ) ताराच्या भरतां कळ सोसली । - पला ४ . ३५ . तारेवरचा नाच पु . ( कर . ) १ तारेवर चालणे , नाचणे इ० २ ( ल . ) अवघड व जोखमीचे काम . तारोतार क्रिवि . १ कांठोकांठ ; तंतोतंत ; बरोबर . वांई देशांतील गांव निम्मे निम्मे तारोतार व इसाफती व इनाम तारोतार निम्मे वांटून दिले असे . - रा ३ . ६५ . २ लागोपाठ ; एकसारखे . तारोतार त्याने दोन महिने खेपा घातल्या . [ फा . तार ]
|