|
वि. दहा संख्या . ( समासांत ) दश - रात्र , दशावतार , दश - दिशा . [ सं . ग्री . डेकॅ ; लॅ . देसेम ; गॉ . तैहुन ; आर्मो . डेक ; हिब्रू . देअघ ; लिथु . देझिथिस ; स्ला . देस्यति ; फ्रे . जिप्सी देश ; आर्मेनियन लसे ] दशक - पु . १ दहांचा समुदाय . २ ( गणित . ) घेतलेले - धरलेले दहा . ३ दर शेकडां दहा . दशक चढविणे - वर्चस्व स्थापणे , बसविणे . दश - कंठ - कंधर - ग्रीव - मुख - पु . रावण . [ सं . ] ०कामजव्यसन न. काम ( इच्छा ) यापासून उत्पन्न होणारे दहा दुर्गुणः - शिकार करणे , जुवा खेळणे , दिवसां निजणे , शिव्या देणे ; रांडबाजी , दारु पिणे , नाचणेम गाणे , खेळणे . ढोंगीपणा इ० . ०ग्रंथी वि. वरील दशग्रंथ पढलेला . ०दाने नअव . दहा दाने ; गो , भूमि , तिल , सुवर्ण , घृत , वस्त्र , धान्य , गूळ , लवण ( मीठ ), रुपे . ०दिशा स्त्रीअव . या पुढीलप्रमाणे आहेतः - पूर्व ; पश्चिम ; दक्षिण ; उत्तर या मुख्य दिशा , व आग्नेयी , नैऋत्य , वायव्य , ईशान्य या चार उपदिशा , आणि ऊर्ध्व व अधोदिशा . - क्रिवि . सर्व दिशांना - बाजूंना ; सर्वत्र ; चहूंकडे ( क्रि० पळणे ; फाकणे ). ०देह पुअव . ( वेदांत ) दहादेह . चारी पिंडी चारी ब्रह्मांडी । ऐसी अष्ट देहाची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे । - दा ८ . ७ . ४१ . ०नाडी स्त्रीअव . ( योग . ) दहा नाड्या ; इडा , पिंगला , सुषुम्ना , गांधारी , जीवनी , दशतुंडी , दीक्षा , बाणदशा , शंखिनी , आणि सौक्षिणी या दहा . - कथा ७ . ३ . ८६ । ८७ . ०नाद पुअव . चिणी , चिंचिणी , घंटा , शंख , तंत्री , ताल , वेणु , मृदंग , भेरी व मेघ ( याचा नाद , रव ). तया कमळाअचया सुगंधे । " जीवभ्रमर झुंकारे दशनादे । - स्वादि ९ . ५ . ३६ . ०नाम - पुअव . गिरी , पुरी , भारती , आनंद , चैतन्य , पर्वत , सागर इ० संन्याशाचे दहा पंथ . संन्यासी - पुअव . गिरी , पुरी , भारती , आनंद , चैतन्य , पर्वत , सागर इ० संन्याशाचे दहा पंथ . ०पाद पु. कुरली , झिंग्या खेकडा इ० . दहा पायांचे कीटक , प्राणी . ( इं . ) डेकॅपोडा . ०पिंड पु. अब मृत मनुष्यास पहिल्या दिवसापासून दहा दिवसापर्यंत दररोज एक किंवा दहाव्या दिवशी एकदम द्यावयाचे भाताचे दहा पिंड . ०भुजी स्त्री. दहा हातांची दुर्गादेवी . ०मुख पु. रावण . ०मूळ न. दहा वनस्पतीच्या मुळांपासून केलेले औषध ही मुळेः - बेल ; टाकळा ; टेटू , शिवण , पाडळ , साळवण , गोखरु , पिठवण , डोरली व रिंगणी अशी आहेत . ०रथ - रथ थळी - स्त्री . आश्विन कृष्ण चतुर्थीच्या रात्री करावयाचे एक व्रत , तत्संबंधी गणपतीपूजन . ललिता - रथ थळी - स्त्री . आश्विन कृष्ण चतुर्थीच्या रात्री करावयाचे एक व्रत , तत्संबंधी गणपतीपूजन . ०रात्र न. दहा दिवस , रात्री ; दशाह . ०वंत पु. ( शीखधर्म ) स्वतःच्या उत्पन्नाचा धर्मासाठी एकदशांश भाग द्यावयाचा . ०विध वि. दहा प्रकारचे . ०हरा हार पु . दशाहरा पहा . दशम वि . दहावा . दशमग्रह पु . ( विनोदाने ) जांवई . दशमद्वार पु . ( योग . ) १ पोत ; एखादी जखम वाहण्याकरिता उघडी रहावी म्हणून तीत जी वात घालतात ती . २ ब्रह्मरंध्र ( शरीरास नऊ द्वारे आहेत ती सोडून टाळूवरील ). ३ ( सांकेतिक ) गुद . दशभ्रांती स्त्री . मोजतांना एखादा मनुष्य आपणा स्वतःच विसरतो त्यावेळी म्हणतात . गोष्टींत दहाजणांची मोजणी करताना मोजणारा स्वतःस विसरला त्यावरुन ). दशमानपद्धति स्त्री . मेट्रिक सिस्टिम या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द . या पद्धतीत मीटर हे परिमाण धरले जाते व इतर परिमाणे दसपटीने अगर दहाव्या हिश्शाने चढत उतरत जातात . १ मीटर = १ . १ यार्ड - वार . ०मांश पु. १ दहावा भाग ; दशांश . २ ( ल . ) टाइथ या बायबलातील इंग्रजी शब्दांस प्रतिशब्द . त्याने अब्राहामापासून दशमांश घेतला . - इब्री ७ . ६ . दशमी स्त्री . १ चैत्रादि महिन्यांच्या दोन्ही पक्षांतील दहावी तिथि . २ दशमी दशा ; मानवी जीवयात्रेचा शेवटचा अथवा दहावा भाग . दशांक पु . दहाचा आंकडा . दशांक चिन्ह न . नागाच्या फणीवरील दहाच्या आंकड्या सारखे चिन्ह . दशांग न . चंदनादि दहा सुगंधीद्रव्यांच धूप . दशांगुळे नअव . १ दहा बोटे . तो परमात्मा दशांगुळे उरला । २ आठव्या महिन्यांत गर्भास दहा बोटे उत्पन्न होतात म्हणून गर्भवती स्त्रीचा त्यावेळी करावयाचा एक संस्कार . ३ दोन हातांच्या दहा बोटांत घालावयाचा एक दागिना . पोल्हारे विरुद्या दशांगुळिं वळी गर्जोनियां पोंचटे । - अकक २ अनंत - सीतास्वयंवर ३९ . दशांतला वि . ज्याचे सुतक दहा दिवस धरावे लागते अशा नात्यांतला . दशावतार पुअव . मत्स्य , कच्छ , वराह , नारसिंह , वामन , परशुराम , राम , कृष्ण , बौद्ध व कलंकी हे दहा अवतार . दशावतारी र पु . १ वरील दशावतारांचे सोंग घेणारा , नाटक करणारा . खेळता नेटके दशावतारी । - दा ६ . ८ . ११ . २ वरील दशावतारांची ज्याच्यावर चित्रे आहेत अशा खेळण्याच्या गंजिफा . याचाच चंगकांचनी हा एक प्रकार . दशावधानी वि . एकाच वेळी अनेक गोष्टींचे व्यवधान ठेवणारा . दशांश पु . दहावा हिस्सा . दशांश अपूर्णांक पु . ( गणित ) दहा किंवा त्याचा कोणता तरी घात , ज्या अपूर्णांकाचा छेद असतो तो . दशांश गुणाकार भागाकार मिळवणी वजाबाकी भांजणी त्रैराशिक पंचराशिक पु . दशांश अपूर्णांकांचा गुणाकार , भागाकार इ० . दशांश चिन्ह न . अमुक संख्या दशांश अपूर्णांक आहे हे दाखविण्यासाठी त्या अपूर्णांकाच्या मागे केलील ( . ) असे चिन्ह . दशाह पु . १ सुतकाचे दहा दिवस . २ दहा दिवसांचा काळ . दशाहरा हार पु . १ ज्येष्ठ शुद्ध दशमी . या दिवशी गंगा अवतरली . या दिवशी बहुधा पुढील दहा योग येतात . ज्येष्ठमास , शुक्लपक्ष , दशमी , बुधवार , हस्तनक्षत्र , व्यतीपात , गर करण , आनंद योग , कन्येचा चंद्र व वृषभेचा रवि . २ ज्येष्ठशुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंतच्या दहा दिवसांचा काळ व त्यांतील गंगोत्सव . दशेंद्रिये नअव . पांच ज्ञानेंद्रिये ( डोळे , कान , नाक , जीभ व त्वचा ) आणि पांच कर्मेंद्रिये ( हात , पाय , वाणी , गुद व उपस्थ ) मिळून दहा इंद्रिये . दशोपनिषद नअव .- ईश , केन , कठ , मुंडक , मांडूक्य , तैत्तिरीय , ऐतरेय , छांदोग्य , बृहदारण्यक व प्रश्न .
|