Dictionaries | References

दिल दिल

   
Script: Devanagari

दिल दिल     

पुन . हृदय ; अंतःकरण ; मन . [ फा . दिल ] ( वाप्र . )
०फांकणे   फांटकणे अस्वस्थ होणे ; बेचैन होणे ; गोंधळून जाणे . म्ह ० दिलमे चंगा तो काथवटमे गंगा = अंतःकरण शुद्ध , पवित्र असल्यास पवित्र गंगा आपणाजवळ असल्याप्रमाणेच होय . सामाशब्द -
०आरामी  स्त्री. आनंद ; खुशाली ; मनाचा संतोष ; शांतवन . तुम्ही आपली खुशालखबर लिहून दिल आरामी करीत जाणे . - रा २२ . ६५ .
०कुल वि.  हिरमुसलेला ; कष्टी ; श्रमी ; लज्जित . दिलकुल बसले जिकडील तिकडे सन्मुख एकहि येईना । - पला ८५ . दिलखा क्रिवि . मनाप्रमाणे ; यथास्थित . तुम्ही व राव पंतप्रधान खातर्जमेने दिलखा तदारुक अमलांत आणावा . - दिमरा १ . ७ . [ फा . दिलखाह ]
०खुलास   सा पु . शुद्धभाव ; मनाचा मोकळेपणा ; समाधान . दिलखुलाशाने जाब दिला नाही . - सभासद ३९ . [ अर . खिलास = शुद्धता ]
०खुशी  स्त्री. १ आनंद ; संतोष ; तृप्ति ; चित्ताची प्रसन्नता . २ रुकार ; संमति ; इच्छा ; आपखुशी ; पसंती . [ फा . खुशी ]
०गर्मी  स्त्री. प्रेम ; प्रीति ; लोभ . दिल्गर्मी करुन ... कुशल वर्तमान पुसिले . - पदमव ७८ . [ फा . गर्मी ]
०गिरी वि.  दुःख , खेद , खिन्नता ; बेदिली .
०गीर वि.  दुःखी ; कष्टी ; खिन्न ; असंतुष्ट ; गांजलेला .
०जमई   जमाई - स्त्री . खातरजमा ; चित्तशुद्धता ; मनाची मिळणी ; मैत्री . भाऊची मार्फत महदजी शिन्देची दिल्जमाई केली . - पदमव ७७ .
०जमीयत  स्त्री. समाधान ; खातरजमा ; निःसंदेहता ; निःसंशयता . तर मोहिबी दिल्जमीयतीने आपले कदीम ठिकाणास यावयाचे .... केले पाहिजे . - रा ३ . ९१ . [ अर . जमीयत ]
०जोई  स्त्री. सांत्वन ; समाधान . तुम्ही आमचे तर्फेने यांची तशफ्फी व दिल्जोई करावी . - रा २२ . २५ . [ फा . दिल्जोई ]
०ताजगी  स्त्री. चित्तसंतोष ; अंतःकरण आनंदविणे ; मन प्रसन्न करणे . आपली खैरखुशी कलमी करुन दिलताजगी करीत असले पाहिजे . - रा १० . १६५ .
०ताजा वि.  नवीन , ताजे प्रेम असणारा ; नूतन प्रेमसंपादन केलेला ; प्रेमाची नव्हाळी व भर असलेला .
०दप्तर   दफ्तर - न . स्मृतिपट ; आठवणींचे हृदयरुपी संचयस्थान
०दर्या वि.  उदारधी ; गंभीर ( मन ). दिलपाक दिलदर्या इलाही मेहेर्बान खान . - ब्रप ३०७ . [ फा . ]
०दार वि.  उदार ; मनमिळाऊ : सहृदय ; मोठ्या मनाचा . [ फा . ]
०दारी  स्त्री. १ उदारता ; धीटपणा ; खंबीरपणा ; सहृदयता ; धीर . २ उत्तेजन ; खातरजमा . संचणीचा वख्त आहे तक्वा - दिलदारी पाठविणे . - वाडशाछ १ . ११६ .
०दिलासा  पु. धैर्य ; उत्तेजन ; भरंवसा ; उत्साह ; अश्वासन . ( क्रि० देणे ). दिलदिलासा देते मी सखया फारच सुख मानी . - पला ४ . १२ .
०देही  स्त्री. उत्कटता . कित्येक सरदार कामकाजाविषयी दिलदेही करीत नाहीत . - रा ५ . १५७ . [ फा . दिल दिही ]
०नशीन   निशीन - वि . १ पसंत . २ अवगत ; श्रुत . अजराह यगानगत दिलनिशीन जाले ते कलमी केले असे . - पया ४६३ . [ फा . दिलनिशीन ]
०पाक वि.  पवित्र ; शुद्ध अंतःकरणाचा ; कपटरहित ; सरळ ; निष्पाप . - ब्रप ३०७ .
०पाकी   खी - स्त्री . अंतःकरणाची शुद्धता ; सरळता ; निखालसता ; निष्कपटता . आम्ही दिलपाखीने मशाकत करुन .... - इमं ११ .
०भबर   भवर - पु . प्रियकर ; दयित ; वल्लभ . सुंदरा म्हणे दिलभरा राजआंबीरा हासून मसी बोला जी । - होला १६९ . आगे सखे लोभ करावा , दिलभर पलंगी असावा . - सला १ . ४९ . - क्रिवि . मनाची तृप्ति होईपर्यंत .
०भरवसा   भरंवसा - भरोसा - पु . धीर ; खातरी ; उत्तेजन .
०भरी  स्त्री. समाधान ; खात्री ; उत्तेजन . तमाम रयतेची दिलभरी करुन लावणी होय ते करणे . - रा १ . ३४६ .
०सफाई   साफी स्त्री . मनाची निखालसता , निःशंकता . पुन्हां दिलसाफीचा फर्मान उभयतांनी बादशहापासून संपादन केला . - प्रामस ३२ .
०हवाल वि.  अस्वस्थ ; त्रस्त मनाचा ; मनामध्ये विवंचना असलेला .
०हवाली  स्त्री. मनाची अस्वस्थता ; विवंचना ; काळजी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP