|
पु. तलवारीच्या मुठींत गढलेला भाग . - प्रश ५३ . पु. १ मागची बाजू ; पिच्छाडी . २ ( ल . ) दुजोरा ; मदत ; पाठबळ . ( क्रि० देणे ; एखाद्याचा दुमाला राखणे ; ठेवणे ; उचलणे ; संभाळणे ; पुरविणे ). ३ पाठलाग ; पिच्छा . पाखाड्यांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो । - तुगा ८९२ . एक ससा पैदा झाला त्याने कुतरियाचा दुमाला घेऊन कुतरा मारिला . - भाअ १८३४ . ४ रुंदी ; विस्तार ; भिंतीत झांकला जावयाचा भाग ; खोली ( चिरा , इमारतीचा दगड , तोड , फाड इ० कांसंबंधी ). दुमालदार पहा . डबर मिळतील तितके समचतुष्कोन चांगल्या दुमाल्याचे , उचलण्याजोगे असावे . - मॅरट २ . [ फा . दुम्बाला ] ( वाप्र . ) वि. १ दोन मालक असणारा गांव , वतन . २ जमीनमहसुलासंबंधी सरकारच्या हक्कापुरता कोणा मनुष्यास सर्वांशी अगर अंशतः दिलेला हक्क . पुणे तालुक्यांत दुमालेगांव पंचवीस आणि खालसा पौंणशे . ३ सरकारखालसातीकडे नसून लोकांकडे परभारे माफीने चालणारा गांव , जमीन इ० याचे इनाम , सरंजाम , इसाफत , अग्रहार , पासोडी , हाडवळा , खैरात , बालपरवर्षी , नानपरवर्षी , सरदेशमुख , चौथाई , जाहगिर , मोकासा , साहोत्रा , वेचणी , गिराणी , पसाइत , चाकराइत , वजिफा , गिरास , सौदिया , वांटा इ० बावीस प्रकार आहेत . - इनाम २५ . ४ स्वाधीन ; हस्तगत . मौजे मजकूर हा गांव यांचे दुमाला करुन ... ... - वाडसमा २ . ९५ . ५ पूर्वीच्या मालकाचा निर्वंश झाल्यावर सरकारजमा होणारे ( इनाम ) [ दु = दोन + माल = मत्ता ; फा . दुबाल ] दुमाला , दुबाला , दुमाळा - ळे - क्रिवि . ताब्यांत . पैकी नीम चावर आपले दुमाला केले आहे . - शिवचरित्र साहित्य २ . १६३ . कुलबाब , कुलकानू दुबाला असे - शिवचरित्र साहित्य २ . १६३ . दुमाल अम्मल - पु . दोन सरकारांचा अम्मल ; सरकारी व जहागिरी असे दोन अम्मल ; दोन मालकांचा ताबा . [ दुमाला + अम्मल ] दुमाल झाडा - पु . १ दुमाले गांवांची यादी . २ दुमाल जमिनीच्या मालकीसंबंधी सरकारी चौकशी . दुमालदार - पु . दुमाले गांवाच्या ( दोन ) मालकांपैकी प्रत्येक ; इनामदार . माजगांव तर्फ सातारा हा गांव दुमालदारखेरीज करुन बाकीसुभाकडील अम्मल बेगमीकडील पेस्तर सालापासून लावून दिला . - वाडसमा १ . ३६ . दुमाल पत्र - न . नवीन अम्मलदार आला असतां इनामदारास जुन्या अंमलदारापासून आपल्या इनामांचे इनाम पत्र लिहून दाखल्यादाखल आणावे लागत असे ते . - भाअ १८३२ . दुमालेगांव , दुमालगांव - पुन . १ दोन मालकांच्या अमलाखालचा गांव . २ पुढे सरकारजमा होणारा गांव ; ( सामा . ) खालसा गांव . [ दुमाला + गांव ] दुमालेपत्र , दुमालपत्र - न . हुंडी बरोबर खुशालाबाबत दिलेले पत्र ; जोडलेले पत्र . [ दुमाला + पत्र ] ०धरणे धरुन असणे - ( एखाद्याजवळ ) आश्रयार्थ , रक्षणार्थ येऊन राहाणे ; ( एखाद्याला ) चिटकून असणे . - ०पुरविणे मदत देणे ; साहाय्य करणे . ०सोडणे ( एखाद्यास दिलेला ) आश्रय काढून घेणे . दुमाल्यावर सोडणे ( एखाद्याच्या ) पाठीशी ( उत्तेजन , हुकूम , मदत देण्याकरितां ) असणे . - पाब १२ . दुमाल्यावर पाठविणे ( एखाद्याच्या ) पाठलागाकरितां पाठविणे . दुमाल्यास लावणे १ खाली लिहिणे ; जोडणे .
|