|
पु. १ नर्तन ; नाचणे . २ वेश्यांदिकांचा हावभाव गानासहित तालावर पादविक्षेपरुप व्यापार तो . [ सं . नृत्य ; प्रा . णच्च ; बे . नाचिवा ; पं . नच्च - नचणा ; सिं . नचणु ; हिं . गु . नाचना ] ०नाचावा , नाचणे - अनेक प्रकारची खटपट करणे . ( लग्नादि कार्यात ), लागणे , नाचणे - अनेक प्रकारची खटपट करणे . ( लग्नादि कार्यात ), ०मांडणे धांगडधिंगा घालणे . नाचवा नाचव स्त्री . १ इकडे तिकडे हालविणे ; थारेपालट करणे . २ चंचलपणा ; अस्थिरता . नाचकरी पु . नर्तक ; नाचणारा ; नाच्या . नाचण , नाचणघुगरी टिपरी स्त्री . १ नर्तिका . २ नखरेबाज , नटवी स्त्री ; रंगेल ; छिनाल , छबेली स्त्री . नाचणी स्त्री . नर्तकी . जेथ रंभे ऐशिया नाचणी । - ज्ञा ९ . ३२३ . ब्रह्मचर्यापुढे नाचणी । - दा ७ . ९ . २१ . नाचणे अक्रि . १ नाच , नृत्य करणे . २ उड्या मारणे ; धांगडधिंगा घालणे ; बागडणे ( घोडा , मूल ) ३ताठ्याने , हातवारे करुन बोलणे . ४ हुरळून जाऊन , मोठ्या आशेने , हर्षाने बोलणे . अमके करीन तमके करीन असे तो नाचत होता . ५ अतिशय अनंद होणे . म्ह ० १ लग्नामध्ये खरचण्यापेक्षा नाचणे फार . २ नाचतां येईना म्हणून अंगण वांकडे . आपणांस एखादे काम चांगले करतां आले नाही म्हणजे आपला उणेपणा झांकण्यासाठी कांही तरी वस्तूंत खोड काढणे . ३ मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते . नाचणे , उडणे , नाचूं उडूं लागणे खिदळणे ; धांगडधिंगा घालणे . नाचत उडत क्रिवि . खिदळत ; आनंदाने उड्या मारीत . ( कोणेकाचे ) पुढे पुढे नाचणे त्याला जो जो पदार्थ ज्या ज्या वेळी पाहिजे त्या त्या वेळेस त्वरेने देणे ; खुशामत करणे ; हांजी हांजी करणे . नाचरा वि . १ नाचणारा ; चाळे करणारा . २ उगाच न सांगता खटपट करणारा ; लुडबुड्या ; पुढे पुढे करणारा ( माणूस ). ३ उतावीळ ; अविचारी . म्ह ० अर्धी बाई नाचरी तिचे पायांत बांधली घागरी . नाचरी स्त्री . १ नखरेबाज ; छिचोर स्त्री . नाचण पहा . २ पाय झाडणे ; थैमान घालणे ; धिंगाणा करणे ; पाय आपटणे ; खुराने जमीन उकरणे . माशा डसतात ह्यामुळे गाईला नाचरी लागली . नाचरेपणा पु . १ ( निंदार्थी ) नाचण्याची खोड . चाळे करणे . या नाचरेपणाच्या मुळाशी स्त्रीशिक्षणाची कळकळ ही खरी नसून कांही तरी करुन लब्ध प्रतिष्ठित बनण्याची हांव हीच आहे . - केले १ . १४० . नाचविणे सक्रि . १ नाचावयास लावणे . ( मनुष्ये , बाहुल्या इ० ). २ उड्या मारावयास लावणे ( घोडा , इ० स ). ३ इकडे तिकडे करणे ; वेडे वांकडे हलविणे ; फिरविणे . पुच्छ नाचवि कडोविकडी । ४ दपटणे ; नेट लावणे ; घाई करणे ; सक्ति करणे ; त्रासदायक रितीने अमलांत आणणे . ५ वारंवार स्थलांतर करणे . [ नाचणे . हिं . नचवाना , नचाना ] नाच्या , नाच्या पोर्या पु . नाचकरी पहा . नाचाविणे क्रि . नाचाविणे पहा .
|