Dictionaries | References ब बरव Script: Devanagari Meaning Related Words बरव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बरवेपणा ; शोभा . जैशी नाकेवीण बरव । कां शिरेंवीण अवयव । - एभा १४ . २५७ . [ सं . वरम ; म . बरवा ] बरवट , बरवंट , बरवटा , बरंवटा - वि . गोजिरवाणें ; सुंदर ; चांगलें ; देखणें ; छान ; सुरेख ; उत्कृष्ट ; उत्तम . ठाइं ठाइं बरवट । निवृत मंडीत घाट । - ऋ १८ . बरवणें - अक्रि . शोभणें . प्रतिबिंब किंवा अनुमापक । तैसें द्वैतमिसें येक । बरवतसे । - अमृ १ . २६ . बरवंटा - वि . ( ल . ) पतिव्रता ; शुद्धाचारी . आम्ही गौळणी बरवंटा । जातों मथुरेच्या हाटा । - होला ९ . बरवा , वी , वें - वि .( काव्य . ) चांगला ; छानदार . बरविया बरवंटा घनमेघसांवळा । वैजयंती माळा गळां शोभे । - तुगा ३सुंदर ; नामी ; निवडक इ० . [ बरा ] म्ह० बाहेर बरवा आंत हिरवा . काळ होणें - ( व . ) काळ अनुकूल होणें ; आर्थिक परिस्थिति अनुकूल येणें ; भरभराट होणें . बरवेपण - न . सौंदर्य . मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी । - ज्ञा १ . ४४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP