Dictionaries | References भ भगवत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भगवत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. संस्कृत भगवान याचें नपुंसकलिंगी रुप . भगवान ( ईश्वर ) या शब्दाचें समासांत होणारें रुप . उदा० भगवत्कृपा = ईश्वरी कृपा , भगवदिच्छा ; भगवत - सेवा ; भगवद्रूप ; भगवन्माया , भगवद्भक्ति , भगवद्भजन , भगवत्प्राप्ति इ० [ सं . भग = ऐश्वर्य + मत ( वत ) ] भगवंत - पु . परमेश्वर ; देव ; षडगुणैश्वर्यसंपन्न ईश्वर . यश श्री वैराग्य ज्ञान । ऐश्वर्य औदार्य हे षड गुण । नित्य वसती परिपूर्ण । तो मी नारायण भगवंत । - एभा १५ . ९७ . ( काव्य ) अलौकिक सामर्थ्यवान ऋषि , साधु इ०भगवंतपण न. ईश्वरत्व ( पालन करण्याचा स्वभाव ). अंगींचें भगवंतपण । आठवीं बापा । - ज्ञा ११ . ४४३ . भगवती स्त्री . पार्वती ; देवी . ( ल . ) भगवती आई ( तांबड्या मिरच्यांची पूड ). मृदंगावर वाजविण्याचा एक ठेका . याचे बोल :- त्ता धिगधी , त्ता धिग धिंत्ता . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP