Dictionaries | References

भडभडां

   
Script: Devanagari
See also:  भडभड

भडभडां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhaḍabhaḍa or ḍāṃ ad Imit. of the sound of violent vomiting; of the gushing forth of blood from a gash; of the pouring forth copiously of water; of the rattling out of nonsense, abuse, menaces; of the rapid rushing in or by of people; of rapid kindling or noisy blazing; of lavish expenditure &c. &c. Quickly, smartly, rapidly.

भडभडां     

क्रि.वि.  
मोठ्यानें ओकणें , जखमेंतून रक्त घळघळा वाहणें , भळभळ पाणी ओतणें , निरर्थक निंदा , धमकावणी , बडबड करणें , वाटेल त्या बाजूनें लोकांनीं जलदीनें घुसणें , जलद पेटणें , मोठ्यानें धडकणें , अमर्याद खर्च करणें इ० क्रियांचें अनुकरण होऊन ). झटकन ; पटकन ; फटकन . भडभड भलतेंच बोले । तुकारामाचीं पदें . ( नवनीत पृ . ४४८ ).
तोफ इ० कांच्या आवाजाचें अनुकरण होऊन . ( क्रि० वाजणें ; उडणें ). [ ध्व . ] भडभडा , ड्या - वि . मनास येईल तें , विचार न करतां बोलून टाकणारा . भडभडणें - अक्रि .
भडाडणें ( विस्तव ).
मोठ्यानें पेट घेणें ( गृह , जळण इ० ).
पुष्कळ जोरानें व आवाज करुन वाहणें , फळफळणें ; उफाळणें .
दुःखानें ऊर , अंत : करण भरुन येणें . भडभडून येणें - क्रि . शोकानें कंठ दाटून येणें . भडभडविणें , भडभडाविणें , भडभडवणें - सवि . जोरानें पेट घ्याववयास लावणें . भडभडाट - पु .
आगीचा अतिशय भडका , डोंबाळा .
दणका ; धडाका ; तडाखा ; कडाखा ; गर्जना ( तोफा , वादळ , शिविगाळ , निंदा यांचा ); सामान्यतः मोठा , गंभीर व एकवटलेला , गोंधळाचा आवाज , गोंधळ .
दंगलीची , मजलसीची मौज ; आनंद करणें . भडभडीत - वि . फटफटीत ; चकचकीत , स्वच्छ . ( क्रि० उजाडणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP