न. राख ; रक्षा ; विभूति .०क पु. वैद्यकक्रियेनें धातूची केलेली रक्षा . [ सं . ]रोग पु. - यांत कफ क्षीण झाला असतां स्वस्थानीं वाढलेलें पित्त वाताला अनुसरुन जठराग्नीला अत्यंत वाढवितें . तहान , दाह , मूर्च्छा , भोंवळ , खोकला , सूज ; मळ , शुष्क होणें , मोह व श्रम हीं लक्षणें होतात . - योर १ . ४८२ . [ सं . ]
०कोथळा पु. - ( ल . ) जंगी प्रमाणांत , अरबट चरबट अन्न गडप करणारें पोट .
- खादाड , अधाशी मनुष्य .
०रंग, रंगी वि. भस्माच्या रंगाचा ; भस्मी .
०रोग पु. कितीहि खाल्लें तरी क्षुधा शान्त होत नाहीं असा रोग ; जेवढें खावें तेवढें भस्म व्हावें पण अंगीं लागूं नये असा रोग .
०रोगी वि. -
भस्मरोगानें पीडिलेला .
- ( निंदेनें ) पुष्कळ खाऊनहि किडकिडीत आणि रोगीच राहणारा
- सदा रोगी असलेला . [ सं . ]
०वर्ण वि. भस्माच्या रंगाचा . [ सं . ]
०सात क्रि.वि. भस्माप्रमाणें ; भस्माच्या स्थितींत , स्थितीस . ( क्रि० करणें ; करुन टाकणें ; होणें ). [ सं . ]
०सात करणें स.क्रि. जाळून राख करणें .
०स्नान न. पाण्याच्या अभावीं शरीराला भस्म चोळणें . जेथें वैद्यकशास्त्ररीतीनें जलस्नान निषिद्ध केलें आहे तेथें स्नानाचा गौणकल्प . [ सं . ]
भस्मासुर पु .
भस्मासुर पु. - सर्वांस जाळून टाकण्याची शक्ति असलेल्या एका दैत्याचें नांव . तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे । - ज्ञा २ . ३८ . - वि . विध्वंस करणारा .
- ( ल . ) अतिशय खादाड . [ सं . ]
भस्मी वि. - भस्माच्या रंगाचा .
- सोनेरी कलाबतूच्या नक्षीनें अलंकृत ( शेला , पागोटें इ० पोशाख ).
भस्मीकरण न. ( रसा . ) एखाद्या द्रव्याचें भस्मांत रुपान्तर करणें . [ सं . ]
भस्मणें अ.क्रि. ( काव्य ) भस्म होणें . भस्मासुर भस्मला हे मात । सामाशब्द -
भस्म्या वि. ( निंदेनें ) कितीहि खावयास घातलें तरी
लठ्ठ होत नाहीं , अंगीं लागत नाहीं असा ; ज्याचें पोट भरत नाहीं असा (
मनुष्य ); भस्मरोगी ;
भस्म्या रोग होणें अ.क्रि. अति खादाडपणा करणें .