|
स्त्री. स्त्री. बैलाच्या मानेवर घट्टा पडुन बनलेले राठ कातडे . ' बैल तरी किती गुणी , त्याचें मानेवर भाकर होती .' - पाणकळा ३९ . जोंधळा , बाजरी इ० च्या पिठाचा चपटा आणि वाटोळा ( जाड - पोळीसारखा ) भाजून केलेला खाद्य पदार्थ . वीरांची उत्पत्ति , वीरांचें संगोपन व वीरांचें तेजोवर्धन स्वकष्टाच्या भाकरी करीत असतात . - सत्वपरीक्षा ७७ . देशावर भाकर ( अनेक वचन भाकरी ) व कोंकणांत भाकरी ( अनेक वचन भाकर्या ) अशीं रुपें रुढ आहेत . भाकर शब्द थोडा अशिष्ट मानतात . पाण्यावर उडविण्याचा चपटा दगड आणि हा खेळ . [ सं . भक्ष्याहार ] म्ह० भाकरीस तोंड नाहीं भांडणास मूळ नाहीं . ०पायानें , मोडणें - मूर्ख , वेडगळ असणें . भाकरीला भूक लागली - जेवण वाट पाहात आहे . सामाशब्द - खाणें , मोडणें - मूर्ख , वेडगळ असणें . भाकरीला भूक लागली - जेवण वाट पाहात आहे . सामाशब्द - ०काला पु. भाकरी व इतर खाद्य पदार्थ याचा कुसकरा ; दूधभाकरी . मुख प्रक्षालन करी । अंगिकारी भाकरकाला । - घन श्यामाची भूपाळी . ०खाऊ वि. ( निंदार्थी ) भाकरी हें ज्याचें खाणें आहे असा ( शेतकरी , कुणबी इ० ). याच्या उलट भात खाऊ म्हणजे पांढरपेशा . [ भाकर + खाणें ] ०तुकडा पु ( क्षुद्रतादर्शक संज्ञा ) भाकरी . अन्न ; जेवण . ०बडव्या वि. ( तिरस्कारार्थी ) दुसर्याच्या घरीं आचारीपणा करुन उपजीविका करणारा ; स्वयंपाकी . [ भाकर + बडविणें ] ०मोड्या वि. भाकरखाऊ पहा . तुकडमोड्या . भाकरीचा खेळ - पु . पाण्याच्या पृष्ठभागाला तीन चार वेळां स्पर्श करुन पुढें जाईल अशाप्रकारें खापर्या किंवा चपटे दगड पाण्यावर फेकण्याचा मुलांचा खेळ . भाकरीचा पिंड - पु . मुख्यत्वें भाकरीवर पोसला गेलेला , भाकरी मानवणारा मनुष्य ; भाकरखाऊ . भाकरीची चाकरी - स्त्री . पोट भरण्याकरितां करावी लागणारी नोकरी . कल्पनांचा सुखसंचार संपला आणि एकलकोंडा भविष्यकाळ व भाकरीची चाकरी डोळे फाडून दटावूं लागली . - तीन आणेमाला १० . भाकरीचें झाड - न . एक प्रकारचें झाड . हें दक्षिण पॅसिफिक महासागराच्या बेटांतून होतें ; यापासून भाकरी करतात . भाकर्या - वि . दुसर्याच्या घरीं तुकडे मोडणारा ; उपटसुंभ . भाकर्या भाजणें - मुलींचा खेळ . - मखेपु ३४६ . लष्करच्या भाकर्या भाजणें - नसत्या उठाठेवी करणें . ( पूर्वी ज्या ठिकाणीं लष्करी तळ पडे त्या ठिकाणच्या लोकांना भाकर्या भाजण्यास लावीत ). भाकर्या निवडुंग - पुन . फड्यानिवडुंग पहा .
|