Dictionaries | References

भाणवशी

   
Script: Devanagari

भाणवशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhāṇavaśī f A bench or form for milk or buttermilk-pans &c.

भाणवशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bench or form for milk or butter milk pans.

भाणवशी

  स्त्री. दुभत्याचीं भांडीं ठेवावयाची घडवंची ; उतरंड . भाणवस , भानवस , भाणवसा , भानवसा , भाणोसा - स्त्रीपु .
   चुलीच्या मागें दगड , माती , चुना इ०चा करतात तो ओटा . जेवीं ससा भाणवसा आला । तो मुके प्राणा । - कथा ४ . ७ . १२० . नजीब खान रोहिला ससें भाणवसियास सांपडतें तैसा आला आहे . - भाब ४१ .
   उतरंडीचें भांडें नीट बसावें म्हणून जमीनीवर केलेलें मातीचें कोंडाळें .
   उतरंड लावण्याची जागा ; उतरंडघर . शोभा आली भाणवसासी । कृत्रिम लक्ष्मी शोभली कैसी । - एरुस्व १८ . ३५ .
   स्वयंपाकघर . जें जें भागेल भाणवसीं । सर्व आणूनि त्वां द्यावें । - गुच ७ . १८ . - ऋ ३८ . [ सं . महानस ] भाणवसी - पु . आचारी ; स्वयंपाकी . शुद्ध विश्वासी भाणवसी । त्यासी सांगूनि शर्करारसीं । - मुआदि २९ . ६१ . भाणशिरें - न .
   स्वयंपाकिणीनें उपयोगांत आणलेला मळकट कपडा .
   भाताची पेज काढण्याच्या वेळीं तोंडास बांधतात तें फडकें .
   व्यभिचारीण .
   एक शिवी . [ भाण ; भांडें + चीर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP