|
पु. मल्ल . माल मर्दूनि मालखडा । - एभा ३१ . ३४१ . [ सं . मल्ल ] पु. परिणाम ; शेवट . [ अर . मआल ] मालअन्देशी स्त्री . परिणामाचा अगोदर विचार करणें . मालअन्देसी . - पेअ ६० . [ अर . मआल = परिणाम ] ०खडा पु. अजिंक्य मल्ल . चाणूर मुष्टिका दीधला विडा । युद्ध करावया मालखडा । - कथा ४ . ६ . ३८ . मालखंड पु . ( महानु . ) युद्धभूमि ; कुस्तीची जागा . गिरी गजरगडा मालखडा प्रवेशे । - गस्तो . मालखंडां जें केलें क्षात्र । - एभा ३१ . ३८१ . मालगंठी स्त्री . ( महानु . ) मल्ल बांधतात त्याप्रमाणें कास बांधण्याचा प्रकार ; विशिष्ट प्रकारें गांठ देऊन वस्त्र नेसण्याची पद्धत . तो पीतांबरु असे वेढिला । मालगंठी । - दाव २२४ . [ सं . मल्ल + ग्रंथि ] मत्ता ; वित्त ; द्रव्य ; संपत्ति . जिन्नस ; सौदा ; विक्रीचा पदार्थ ; जिन्नसपान्नस .
०जेठी पु. मल्ल . मालातिणें , मालाथणें , मालाथिणें सक्रि . ( महानु . ) मल्लविद्येनें वेढणें ; मोहित करणें . येणें अहंकारें मालाथिल । - ज्ञाप्र ६ . ३२ . किंमतीची वस्तु . हा आठा रुपयांचा माल आहे . निस्तेज होणें , करणें . ( कायदा ) प्रत्येक जातीची जंगम जिंदगी . जमाबंदी . मालाचें ( रेव्हेन्यूचें ) काम . - निजामविजय १४ . १२ . ३१ . [ अर . माल ] ( वाप्र . ) निःशेष होणें . भीतरीं मालाथिलें । साभिळासे । - कालिका २६ . ४० . आश्रय , आंगीकार करणें . तैसा प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जवं एकाधें शरीर । माल्हातीना । - ज्ञा १६ . २७७ . [ प्रा . ] ०खाणें ( व . ) मेवा , मिठाई इ० गोड पदार्थ खाणें . माल केमाल , मालचा माल वाढ , सुधारणा होणार्या किंवा घट , अपकार होणार्या कामीं लावल्यावरहि ज्याच्यामध्यें बरावाईट असा काहींच बदल होत नाहीं असा पदार्थ ( पैसा , माल इ० ). ०वथरणें ( व . ) पीक चांगलें येणें ; मालावरचा नाग वि . पैशाचा उपयोग न करतां त्याचें केवळ रक्षण करणारा ( कृपण मनुष्य ). श्रमाशिवाय आयती संपत्ति ज्यास मिळालेली आहे असा ( इसम ). सामाशब्द -
०अस्बाब पु. चीजवस्त वगैरे संपत्ति . ०कटनी, काटणी काटी स्त्री . शेताच्या कापणीसाठीं सरकारची परवानगी मिळण्याबद्दल दिलेली रक्कम ; फी . पिकाची कापणी .
०काळी स्त्री. ( व . ना . ) शेतजमीनीचा सरकारसारा . वर्हाडची मालकाळी किती ? ०खरा वि. पूर्ण किमतीचा ( चेंचलेलें किंवा विरुप झालेंलें असलें तरी जें चांगल्या धातूचें असतें असें नाणें इ० ). [ माल + खरा ] ०खाना पु. कोठी . ०चाटी चाट्या - पु . शाळेंतील उपगुरु . [ माल + चाट्या ] ०जामिनकी स्त्री. मालजामिनाचा अधिकार , काम . ०जामीन पु. मालाचा , पैशाचा जामीन ; अमूक रक्कम अमुकवेळीं देईन अशी हमी घेणारा . - रा १६ . ५० . याच्या उलट हाजीर जामीन . ०टाल पु. चोज वस्त ; माल आणि इतर सामान . [ माल द्वि ] ०दार वि. ( व . ) श्रीमंत . गावांत मालदार लोक आहेत . ०धनी पु मालाचा जिन्नसाचा धनी . ०पिसा वि. मालाचा नाश झाल्यानें किंवा तो नष्ट होण्याच्या भीतीनें वेड लागलेला . ०पिसें न. मालाच्या नाशामुळें किंवा नाशाच्या भयामुळें लागलेलें वेड . ०बंदी वि. ऐवजदार ; किंमतवान ; मोलवान . घणसर द्रव्याचा . भक्कम ( बांधणी , मांडणूक ).
०बिसात स्त्री. मालमत्ता . ०मत्ता स्त्री. ( व्यापक . ) सर्व धनदौलत , जिंदगी , इष्टेट ; रोकड , माल , चीजवस्त इ० सामान . [ अर . माल + मताअ ] ०मवेश, शी स्त्री . चीजवस्त ; गुरेंढोरें ; मालमत्ता . [ अर . मवेशी ] ०मसाला पु. ( व्यापक , )
- मिश्रणाचीं द्रव्यें .
- इमारती इ० कामासाठीं लागणारें दगड , विटा , चुना , लाकूडफाटा इ० सामान . उपयुक्त वस्तु , सामग्री . [ माल + मसाला ]
०मस्त वि. संपत्तीनें चढलेला ; धनगर्वित ; धनोन्मत्त . [ अर . माल + फा . मस्त = मत्त ] ०मालिक पु. धनी . तरी मालमालिक व्हा त्याचे । - दावि ८ . ०मालीयत स्त्री. मालमत्ता . संस्थानामध्यें मालमालीयत व स्वभाव ... - वाडबाबा १ . १३४ . ०मिळकत मिळकत - स्त्री . माल व चीजवस्त ; जंगम व स्थावर मालमत्ता . [ अर . ] ०मुद्दल न. झालेल्या खर्चाच्या किंवा आगाऊ दिलेल्या पैशाच्या बरोबरीचा जिन्नस . उदा० माझें मालमुद्दल उभें राहिलें - आलें - हातास लागलें . - क्रिवि . बरोबर किंमतीला ( क्रि० विकणें ; विकत घेणें ; करणें इ० ). मूळ किंमतीला . ०मोल वि. योग्य किंमत दिलेला ; त्याच्या किंमतीला घेतलेला , विकलेला , मांडलेला . - क्रिवि . योग्य किमत देऊन . ( क्रि० विकत घेणें ; विकणें ; मांडणें ; गहाण ठेवणें इ० ). ०मोल - स्त्री . योग्य किंमत . किंमत - स्त्री . योग्य किंमत . ०वाडी पु. ( कों . ) कुलवाडी ; कूळ ; शेतकरी . गावांतल्या समद्या कुलवाडी मालवाड्याशीं काय हाय ? जो तो कसा तरी उपाश्यानें दीस लोटतोय . - चैत्रावळ - महाराष्ट्र शारदा , जून १९३५ . ०शिकार्या वि. ( व . ) उत्तम पदार्थावर हात मारावयास संवकलेला . ०साईर न. मालावरील जकात . कसवो कसवो कराहरा मालसाईर सुधी तुमपर राखो . - वाडबाबा १ . २१ . ०हराऊ वि. तोटा , नुकसान , खराबी करणारा . ( प्राणी , वस्तु , काम याची ). मालक , मालीक वि . मालक , मालीक वि . धनी ; स्वामी . अधिपति ; शास्ता ; अधिकारी .
हक्कदार ; जो एखादें काम पाहतो किंवा ज्याचें तें काम आहे असा मनुष्य .
माझा बाप जामीन राहिला आहे तो त्या गोष्टीचा मालक . त्यास काय तें विचारा .
( बायकी ) पति ; नवरा .
( कायदा ) एखाद्या कंपनीचा , मंडळाचा गुमास्ता ; मॅनेजिंग एजंट .
( पुश्तु ) टोळीचा नायक .
शेतकरी .
जमीनदार . [ अर . मालिक ; मालक ] मालकी स्त्री . धनीपणा ; स्वामित्व . सत्ता . [ मालक ] मालकीयत - स्त्री . स्वामित्व . मालकीयत व खाविन्दी . - दिमरा १ . २०७ . [ हिं . ] माल गुजार , माल गुझार - पु . जमीन खंडानें देणारा , जमीनदार . सरकारचा वसूल जमा करुन देणारा . ( व . ) पाटील . [ फा . माल्गुझार ] ०गुजारी गुझारी - स्त्री . सरकारसारा देणं . मालगुजार्याचा हक्क . मालम , मालिम - पु . गलबताचा हिशेब व व्यवस्था पाहणारा अधिकारी ; नाखवा . मालत , मालयत , मालियत , मालीयत मालिस्त - स्त्री . जिंदगी ; उत्पन्न ; वसूल ; मालमत्ता . त्यांची मालयत फारच गेली . - ख ११ . ५९५५ . माणसास न मारावें , मालत घेऊन सोडून द्यावें . - भाकै २६ . [ अर . मालीयत ] माली - वि . वसुलासंबंधीं . माली व मुल्की . - वाडसमा ३ . २४ . [ फा . माली ] माली मामला - पु . ( जकात ) किंमतवान माल ; जो विकला असतां पैसा उत्पन्न होईल . असा माल ; सर्व खर्च सोसण्याजोगा माल . जकातीचें काम . मालीव - वि . ( कों . ) कांहीं किंमतीचा ; विकला असतां कांहीं किंमत येणारा ( मौल्यवान जिन्नस ). [ माल ] मालोमाल - वि . किंमतीच्या योग्यतेचा ; दिलेल्या पैशाइतक्या किंमतीचा . ( विकत घेतलेला जिन्नस ). ( क्रि० विकणें इ० ). [ माल द्वि . ]
|