Dictionaries | References

माळ

   
Script: Devanagari

माळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एकमेकाक संबंदीं आसतात अश्यो वळेरेन येवपी वा जावपी जायत्यो गजाली, वस्तू, घडणुको, बी   Ex. खेळांचे माळेक आयज सावन सुरवात जाली
HYPONYMY:
दृश्यमाळ
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शृखंला
Wordnet:
asmশৃংখলা
benশৃঙ্খলা
hinशृंखला
kanಸರಣಿ
kasسِلسٕلہٕ
malശൃംഖല
marमालिका
mniꯊꯧꯔꯃ꯭ꯄꯔꯦꯡ
nepशृंखला
panਲੜੀਵਾਰ
telసంకెల
urdسلسلہ
noun  गळ्यांत घालतात अशी एके तरेची माळ   Ex. आवयन आपले चलये खातीर मोतयांची माळ विकती घेतली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমালা
gujલડી
hinलड़ी
kanಹಾರ
kasمال , لٔڑی
malലടി
marसर
oriଛୋଟମାଳା
sanमाला
tamசரம்
telదండ
urdلڑی , لڑ , ہار ,
noun  जप करपाची सत्तावीस मणयांची ल्हान माळ   Ex. आजयेच्या हातांत सद्दां माळ आसता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસુમરણી
hinसुमरनी
kasسُمٔرنی
malസുമരിന്
oriସୁମରଣୀ
urdسُمَرنِی , سُمِیرنِیا
noun  गळ्यांत घालपाचो एके तरेचो हार   Ex. माळेचो मदलो भाग पानाच्या आकाराचो आसता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসিকড়ীপান
hinसिकड़ीपनवाँ
malആലിലത്താലി
oriପାନକଡ଼ି
panਸਿਕੜੀਪਨਵਾਂ
sanमाला
tamசிக்டிபன்வாங்
urdسکڑی پنواں
noun  जो एकाच्या अधिकारा सकयल येता अशी एकाच भशेचे खूबश्यो संस्था(दुकानां, होटॅलां, बी)   Ex. ताज समुदाय लेगीत एक होटॅलांची माळ
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujશૃંખલા
kasسِلسِلہٕ , چین
oriପରିଧି
urdسلسہ , مجموعہ , قطار
See : हार, पंगत, क्रम, कवळी, झेलो

माळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also the rope of a waterwheel to which the pots are fastened. v लाव, लाग. 5 A day of the नवरात्र;--because a fresh string of flowers is used every day of this period. Ex. आजची कितवी माळ आहे. 6 The roll of सूत around the wheel passing on to the चात or whirler. In spinning or drawing threads.
māḷa m An elevated and extended tract of ground, esp. as somewhat stony or sterile; a plain, a down, a heath. 2 A loft. It is floored with bamboos, thus differing from माडी & माळा.

माळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  See
माला.  m  A plain. A loft.

माळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दोर्‍यात काही वस्तू गुंफून बनवलेला सर   Ex. त्याला नोटांची माळ घातली
HYPONYMY:
रुद्राक्षमाळ रत्नमाळ पुष्पमाळ मुंडमाळ सर दुलडी जपमाळ कंठी मोहनमाळ अस्थिमाळ वैजयंतीमाला चंद्रहार कंठहार सातपदरी माळ सुकरीहार चिलिमिलिका कंठा नवग्रही माळ माणवक नंदनमाळ पद्मसूत्र
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हार
Wordnet:
asmমালা
bdमाला
benমালা
gujમાળા
hinमाला
kasمال , ہار
kokहार
malമാല്യം
mniꯂꯤꯛ
nepमाला
oriମାଳା
panਹਾਰ
sanमाला
tamமாலை
telమాల
urdہار , گجرا , مالا

माळ     

 पु. 
 स्त्री. गळ्यांत घालावयाचा हार ; माल इचे अनेक प्रकार असतात . उदा . पुतळ्याची , जवांची , गव्हांची , कुयर्‍याची . पोवळ्यांची , रुद्राक्षांची , नवरत्‍नांची , स्कटिकांची , तुळशीच्या मण्यांची , मोहनमाळ इ .'
 पु. ( बागलाणी ) बोगदा .
 स्त्री. 
फुलांचा हार ; माला .
खडकाळ किंवा नापीक असा भूमीचा उंच व विस्तृत प्रदेश ; मैदान ; डोंगरमाथा ; सपाटी ; पठार . गोंवर्‍या आणाया जावें माळावरी । - रामदासी २ . १३८ .
घराचे वरचा लहान मजला . याची जमीन ( तक्तपोशी ) कड्यांच्या ऐवजी बांबूचे तुकडे आडवे बसवून त्यांची केलेली असते म्हणून हा माडीहून भिन्न आहे ; माळा . - वि . ओसाड प्रदेश . [ सं . मालम = पठार ] ( वाप्र . ) माळावरचा धोंडा , माळधोंडा - पु .
फुलांतील पाकळ्यांचा घेर , दलपंक्ति . संख्यावाचकासह समासांत योजतात . उहा० एक माळ , दुमाळ , तिमाळ इ० .
एकदां झालेला व्यवहार परत फिरणार नाहीं अशा अर्थाचा भाषणसंप्रदाय . खरेदी करणाराच्या स्वाधीन पशु , जिन्नस इ० करतांना विकणारा इसम हा शब्द योजतो . खारीमाती पहा .
रत्नें , मणी यांची माला ; हार ; स्मरणी .
टोणपा ; मठ्ठ मनुष्य . माळावरची माती - ( ल . ) वाटेल त्यानें वाटेल तसा उपयोग करावा अशी वस्तु . म्ह० माळावरची माती कोणींहि उचलावी . सामाशब्द -
( ल . ) सर ; हार ; माला .
( सामा . ) वस्तूंची परंपरा , साखळी ( रहाटगाडग्यांतील लोट्यांची , वस्तु हातोहात देण्याकरितां मजुरांची , मनुष्यांची , हरिदासांची , आळीपाळीनें काम चालविण्याकरितां याज्ञिकांची इ० ). ( क्रि० लावणें ; लागणें ). परंपरा . म्हणोनि वैष्णव कुळमाळ । वंदिली सकळ ग्रंथार्थी । - एभा १ . १३८ .
०जमीन   रान - स्त्रीन . खडकाळ , नापीक असा उंचवट्यावरील जमिनीचा विस्तृत भाग . मैदान ; सपाटी ; रान .
( जमाबंदीसंबंधीं ) डोंगराच्या चढणीवरील भुकिस्त पण लागवडीची जमीन . [ माळ + जमीन ]
विहीर इ० कांतील पाणी वर आणण्याकरितां खापेकडांचे दोन बाजूस वळलेली , लोटे बांधलेली रहाटगाडग्याची दोरी .
०ढोंक  पु. एका जातीचा पक्षी .
( ल ) नवरात्रांतील . प्रत्येक दिवस ( कारण नवरात्रांत प्रत्येक दिवशीं नवीन फुलांची माळ बांधावी लागते . ) आजची कितवी माळ आहे ?
( विणकाम ) गती देण्याकरितां रहाटाला व कांडी भरण्याच्या चातीला जोडणारा सुताचा पट्टा , सुतळी .
०धोंडी  स्त्री. माळावरील दगड .
०पटणी  स्त्री. भाताची एक जात .
दोराची शिडी . दिल्लीचा किल्ला अपेशी , पांच सात रोजांत हल्ला करुन माळा लावून हस्तगत केला . - भाब ९१ . [ सं . माला ] ( वाप्र . )
०आंखडणें   ( कों . ) रहाटगाडग्यास एक दांडकें लावून त्यावर माळ अडकवून ठेवणें ( रहाट चालविण्याची आवश्यकता नसतांना माळ पाण्यांत राहून कुजूं नये म्हणून ).
०भूमि   भोई - स्त्री . डोंगराळ भाग .
०मुरुड   मुरड मुरडाण - पुन . माळ व त्यांतील ओढ्याच्या वळणाखालील वाकडीतिकडी जमीन . काळीनें झोका दिल्हा पण माळ मुरड बरें पिकलें . [ माळ + मुरडणें ]
०गौळ्याची   ( ढोबर म्हैस खेळ ) मेलेल्या ( बाद झालेल्या ) दोन दोन गड्यांनीं एकमेकांचा हात धरुन बाकीच्यांस शिवावयास जाणें .
०घालणें   
०रान  न. माळजमीन . [ माळ + रान ]
०वट   वद - वि .
लग्नांत वरल्याची खूण म्हणून वराच्या गळ्यांत वधूनें व वधूच्या गळ्यांत वरानें माळ टाकणें . लग्नार्थीं हिंडतां भूमंडळ । त्यासीं राजकन्या घाली माळ ।
माळजमीन फार असलेला ( देश , प्रांत ).
पंढरीचा वारकरी होणें ; दर शुद्ध एकादशीस पंढरीची वारी करणें ( पंढरीचे वारकरी संप्रदायास अनुसरुन वारी स्वीकारल्यावर गळ्यांत तुळशीच्या मण्यांची माळ घालतात . यावरुन ). संसाराची - कामाची माळ घालणें , माळ घालणें , पडणें - संसाराची , कामाची व्यवस्था एखाद्याच्या गळ्यांत टाकणें , पडणें . एखादें काम एखाद्याकडें सर्वथैव सोंपविलें जाणें . मराठी काव्याचें काम करणारा दुसरा कोणी पुरुष तयार असता , तर त्यांनीं त्याची माळ आनंदानें त्याच्या गळ्यांत घातली असती .
०घेवनबसप   ( गो . ) एकसारखी वाट पहाणें ; धोसरा काढणें . एका माळेचे मणी पुअव . ( एका माळेंतले सगळे मणी सारखे असतात . यावरुन ल . ) एकासारखे एक ( वाईट ) लोक . सामाशब्द -
माळ किंवा माळजमीन यांच्या सारखा - संबंधीं ( भूमि - जमीन ). [ माळ + वट ]
०काठी  स्त्री. रहाटगाडग्याची माळ इकडे तिकडे सरुं नये विवक्षित जागेंतून जावी म्हणून विहिरींत आडवा बसविलेला लाकडाचा दांडा .
०शिकारी   र्‍या - वि . ( हरिण , ससे , कोल्हे इ० . कांची ) माळावर शिकार करणारा .
०शिकारी   - न . माळावर ज्याची शिकार करतात असें हरिण ; हरणाची एक जात . [ माळ + शिकारी + हरिण ]
०खंड  न. ( कों . )
रहाटगाडग्याच्या भोंवतालची कांहींशी मोठी माळ .
हरिण   - न . माळावर ज्याची शिकार करतात असें हरिण ; हरणाची एक जात . [ माळ + शिकारी + हरिण ]
०शेण  न. माळावरचें शेण ; रानगोवरी ; रानशेणी .
जुन्या झालेल्या माळेंतून खापेकडे काढून टाकल्यावर तिच्या राहिलेल्या दोर्‍या ; तुकडे . यांचा दोर्‍यांप्रमाणें उपयोग करितात . [ माळ + खंड ] माळका - स्त्री .
माळ ; ओळ ; रांग ; परंपरा ( वस्तु , सजीव प्राणी यांची ). ( क्रि० लावणें ; लागणें ).
( कुणबाऊ ) गप्पागोष्टी . [ सं . मालिका ] माळणें - सक्रि .
डोक्यांत फुलें , फुलांची माळ घालणें . गौरकांति तारुण्यभार । माळिले सुगंधपुष्पाचे हार । - सिसं ४७ . १५८ .
माळेंत ओंवणें ( फुलें ); माळ गुंफणें . माळप - सक्रि . ( गो . ) डोक्यांत घालणें ( फुलें ). माळाकार - पु . माळी ; माळा करणारा . माळाकार तरुंचें घेतो फळ पुष्प जेवि तेंवि नृपा । - मोसभा ४ . २४ . [ सं . मालाकार ] माळादंड - पु . फुलांचा हार . कंठी रुळताति अलौकिक । माळादंड । - ज्ञा ११ . २२० . माळिका , घटी - स्त्री . रहाटगाडगें ; घटीयंत्र . संसारकुपाचां पोटीं । कर्म माळिका घटीं । - ऋ ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP