|
अ.क्रि. अ.क्रि. दोघांचा वगैरे अंश असणें ; कांही व्यंग , कमीपणा असणें सामान्यत ; पाणी सुरणें असा प्रयोग . ( पाणी , दूध , तेल , तूप , रंग इ० ) पातळ पदार्थ , वस्त्र , भाकरी , लांकूड , जमीन इ० मध्यें शिरुन त्यांत निविष्ट होऊन राहणें ; त्यांत जिरणें . शोषून घेतला जाणें ; पाकांत घातलेल्या आंब्यांत , लोणच्याच्या फोडींत पाक किंवा क्षार भरला जाणें ; किंवा जिरुन सर्व भागांत पसरुन असणें ; पाकणें . दुधाला चांगल्या तर्हेनें विरजण लागणें . पिकणें ; पूर्णत्वास येणें ; पक्व होणें ; ( बी ) पूर्ण तयार होऊन वाळणें . बीज दोन रोज ठेविलें म्हणजे मुरेल , मग पेरायास चांगलें . परिपक्वदशेस येणें ; मूळचा खडबडीतपणा , कच्चेपणा इ० जाऊन गुळगुळीतपणा येऊन ( वस्तु ) वापरण्यासारखी किंवा उपयोगी होणें ; वस्तु नवीन असतां तिचा कोरेपणा वापरल्यानें जाऊन ती सरावाची होणें . गंभीर , स्थिरमनस्क , शांत होणें ; नियतवृत्ति होणें ; विचारी होणें ; निवळणें . अभ्यासानें , संवयीनें तरबेज होणें ; वाकबगार होणें ; मुरब्बी होणें ; पूर्ण परिचित असणें . हा मनुष्य ह्या कामांत मुरला आहे , ह्यासच हें काम सांगावें . ( राग , इच्छा , वासना इ० ) दबणें ; कमी होणें ; नाहींसा होणें ; दडणें . घाम आल्याशिवाय ताप कमी होणें ; बारीक ताप अंगांत राहणें . ( गळू , फोड , उठाणू इ० ) फुटल्याशिवाय बसणें ; आंतल्याआंत दबून जाणें ; जिरणें . ( चिंतनांत ) मग्न होणें ; गढून जाणें . एखाद्या कामीं अजमासापेक्षां जास्त ( मनुष्यें पैसा , पदार्थ ) लागणें ; अधिक खप होणें . ( ल . ) तृप्त होणें . [ सं . मूर्व ] मुरुन बसणें - हातपाय आंखडून आणि गुडघ्यांत डोकें घालून बसणें ; मुरमुशी मारुन बसणें मुरी मारणें - कांहीं कालपर्यंत स्वतः लपून राहणें ; दडणें ; दडी मारुन बसणें .
|