Dictionaries | References

मुलूक

   
Script: Devanagari
See also:  मुलूख

मुलूक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A country, region, territory. मुलकांत दिवा लावणें To people a desolate country.

मुलूक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A country, region.

मुलूक

  पु. 
   प्रांत ; देश ; राज्य .
   स्वदेश ; स्वतःचा प्रांत . [ अर . मुल्क ]
०उठणें   मुलूख ओसाड पडणें . मुलखांत दिवा लावणें ओसाड प्रदेशांत वस्ती करणें ; निर्जन प्रदेश वसविणें . मुलखास जाणें , मुलखांत जाणें स्वदेशास किंवा आपल्या प्रांतामध्यें जाणें . सामाशब्द -
०गिरी  स्त्री. 
   देशपादाक्रमण ; परदेश जिंकणें .
   सैन्याचें कूच ; मोहीम ; स्वारी .
   सारा वसुलीसाठीं सरकारनें पाठविलेल्या तुकडीचा प्रवास .
   व्यापारी , यात्रेकरु इ० चा प्रवास ; देशाक्रमण ; देशाटन ; ( सामा . ) प्रवास . [ फा . मुल + गीरीं ]
०दार  पु. दौलतवंत ; सरदार ; जहागिरदार .
०दारी  स्त्री. राज्यव्यवस्था .
०परखा वि.  हद्दपार केलेला .
०मैदान   मलिक मैदान - विना . स्त्री .
   ह्या नांवाची विजापूर येथील सुप्रसिद्ध तोफ हिच्या तोंडाचा व्यास ४ फूट ८ इंच आहे . व पोकळीचा किंवा गर्भाचा व्यास २ फूट ४ इंच आहे .
   ( ल . ) मोठमोठ्यानें बोलणारी , भांडखोर स्त्री ; जहांबाज स्त्री ; तोंडाळ बायको . [ अर . मलिक - इ - मैदान = देशाचा राजा , रणराज ]
०मैदान  न. 
   प्रदीर्घ सपाट भूप्रदेश ; सपाट प्रांत ; पटांगण .
   झाडी नसलेला भूभाग ; ओसाड प्रदेश . रान तोडून मुलुख मैदान केलें . [ अर . मुल्क + मैदान ] मुलखाचा - वि . अतिशय ; फार ; पुष्कळ . किति सांगूं हो गुण वाळाचे हट्टी मुलखाचा । - मृ ६३ . मुलखानिराळा - वि . सर्वांहून भिन्न ; चमत्कारिक ; कोठेंहि न आढळणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP