Dictionaries | References

मोहिम

   
Script: Devanagari
See also:  मोहीम

मोहिम     

 स्त्री. 
महत्त्वाचें कार्य ; अंगीकृतकार्य . मोहिमेचे ( कामाचे ) दिवस होते , याजकरितां नबाबांकडून जाबास चार दिवस लागले . - रा ७ . - खलप १ . १०५ .
कांहीं देश जिंकण्यासाठीं राजेलोक वगैरे जी स्वारी करतात ती ; सैन्याची चाल ; मुलुखगिरी ; ( सैन्याची ) सफर . मुख्य शहर दक्षिणेवरती मोहीम झाली . - ऐपो २३० . मराठींत फक्त लढाईच्या कामीं मोहीम शब्द वापरतात .
( ल . ) गोसावी लोकांची सफर ; पर्यटन , फेरफटका .
०शीर वि.  
वारंवार स्वार्‍या करणारा .
मोहीमेंत गर्क ; मोहीमेवर , स्वारीवर असलेला . हरीपंततात्या व होळकर वगैरे सरदार मोहीमशीर आहेत . - ख ८ . ४११९ . मोहिमी - मोहिमेसंबंधीं ; मोहिमेचा . धोंडोपंत गोखले यांस मोहिमी वस्त्रें देऊन ... - मदरु २ . ४ . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP