Dictionaries | References व वठणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वठणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. नरम होणे ; मऊ येणे ( मर्दनादि व्यापाराने ). बाईल वठेना बोला । बाळे दाविती वाकुल्या । - भाराबाल ९ . ७४ . [ सं . वृत ] वठणीस - वर - येणे - ( रुढ प्रयोग ). अर्कि . उमटणे ; ठळक होणे ; उठावदार दिसणे ( शिक्का , रंग ). वठणे ; मऊ येणे ( दमन , मर्दन इ० व्यापाराने ); ताळ्यावर येणे . घोडा फार दांडगाई करीत होता , जराचा फेरफटका देतांच चांगला वठणीवर आला . फलद्रूप होणे ; खरा ठरणे ( शाप इ० ). वश होणे ; ताब्यांत येणे . तद्दुर्दशा न करितां निस्तेज मज वठेल काय मही । - मोसभा ३ . ३५ . ( व्यापक . ) भरभराटीस येणे ; फोफावणे ; तरारणे ( वनस्पति ). उग्र , खमंग असणे ( स्वाद ). दरवळणे ( वास ). शुष्क होणे ; वाळणे ( रोगादिकाने मनुष्य , वृक्ष इ० ). ( ल . ) उतरणे ; बनणे . ते विवेचन चांगले वठले आहे . या ठिकाणी सर्व व्यवस्था पूर्वीप्रमाणे वठली असली तरी ... - हिंदु ११ . २ . १९ . . [ उठणे ] वठणे , वठविणे - ( उघड ) करुन दाखविणे ; उठविणे पहा . नाटक अमुक अमुक कंपनी बरोबर वठवून दाखविते किंवा नाही या गोष्टीकडे शेंकडा ९० लोकांचे दुर्लक्ष असते . - नारुकु ३ . ५१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP