|
पु. १ सामान्य नियमांचा भंग ; अनियम ; अपवाद . जितके बुध्दिमान तितके आळशी असे म्हणतां येत नाही . कांकी क्वचित व्यभिचार दिसतो . कितीएक बुध्दिमान असून उद्योगीहि आढळतात . २ मार्गच्युति ; व्यवहारातिक्रम ; दुराचार . ३ परस्त्रीगमन ; परपुरुषगमन . जै यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणऊनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी । - ज्ञा १ . २४९ . ४ एकनिष्ठेचा अभाव ; कृतघ्नपणा . जेथिचिया कृपा लाभिजे वरु । तेथेचि मनें व्यभिचारु । - ज्ञा २ . ३८ . ५ वेगळेपणा ; फरक . जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । - ज्ञा ४ . ७८ . [ सं . ] व्यभिचरणें - अक्रि . १ एकनिष्ठ , अनुकूल नसणें . तरी उचित काय आम्हां । जे व्यभिचरेना धर्मा । - ज्ञा २ . ६३ . २ सोडून जाणे ; बदलणें . - ज्ञा १७ . ६० . ३ भलतीकडे जाणे ; योग्य मार्गापासून च्युत होणें . व्यभिचरित - वि . अपवाद करून मोडलेला ; ज्यापासून च्युति झाली आहे असा ( नियम ). व्यभिचारी - वि . १ अपवाद , भंग झालेला ( नियम , शिरस्ता ). २ व्यभिचार , परस्त्री ( पुरुष ) गमन करणारा - री , केलेला - ली - एभा १ . १९१ . ३ दुराचारी ; व्यसनी ; स्वैरवर्तनी . व्यभिचारी भाव - पु . ( साहित्य ) रसाच्या उत्पत्तीस साहाय्यकारी असे ३२ भाव ; संचारीभाव . निर्वैद , ग्लानि , शंका , असूया , मद . श्रम , आलस्य , दैन्य , चिंता , मोह , स्मृति , धृति , क्रिडा , चपलता , हर्ष , आवेग , जडता , गर्व , विषाद , औत्सुक्य , निद्रा , अपस्मार , सुप्ति , विबोध , अमर्ष , अवहिथ्था , उग्रता , मति , अपलंभ , व्याधि , उन्माद , मरण , त्रास आणि वितर्क मिळून ३४ होतात .
|