Dictionaries | References

शिव शिव ! हे प्राणनाथ!

   
Script: Devanagari

शिव शिव ! हे प्राणनाथ!

   ( नाटय.) शोकाची नांदी. मराठी भाषेंत पदांच्या पहिल्या चरणाला जसें ध्रुवपद लागत असतें तसें पौराणिक नाटकांत पूर्वी नायिकेच्या शोकाच्या आरंभीं स्त्री पात्रानें ‘ शिव शिव हे प्राणनाथ,’ किंवा ‘ हरहर ! रे परमेश्र्वरा ! ’ असें म्हणून शोकास आरंभ करावयाचा असे. जसें हरिश्र्चंद्राची तारामती, उत्तररामायणांत सीता, द्रौपदीवस्त्रहरणांत द्रौपदी अशा पात्रांना. वरील शब्दांनीं शोक करावा लागे. -शं. बा. मुजुमदार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP