|
पु. १ उत्सव ; सोहळा ; ( एखाद्या कार्याची , सार्वजनिक , प्रसंग , मेजवानी , मिरवणूक , वगैरेची ) व्यवस्था , उद्योग , खटपट , जुळणी , योजना , रचना , मांडणी . उदा० लग्नसमारंभ ; मुंजीचा समारंभ ; ब्राह्मणभोजन , यज्ञ , युद्ध यांचा समारंभ . २ ( ल . ) अशा प्रसंगास लागणारी सामुग्री , तयारी , साधनसमुच्चय . आमच्या येथील विवाहाकरितां आपणाकडील सर्व समारंभ आम्हास द्या . ३ आदर ; सत्कार ; मान ( क्रि० राखणें , ठेवणें ). ४ खटाटोप ; आटाआट ; आवेश . तैसा समारंभु सुणा । गेलाचि तो । - ज्ञा १७ . ४१८ . मग क्षोभला समारंभें । घाली तेथ । - ज्ञा १५ . ४८७ . [ सं . सम् + आ + रभ ]
|