Dictionaries | References

हडसर्णे

   
Script: Devanagari

हडसर्णे     

स.क्रि.  १ हिसकर्णे ; झटकन ओढर्णे ; झटका मारणें ; एकदम जोरानें ओढणेम . २ आवळून , खेंचून बांधण्यासाठी जोरानें ओढणें . ( क्रि०बांधणे ). हडसून बांधणें असाहि प्रयोग रुढ अ हे ३ खेंचणें ; ठासणें ; आपटणें ; जमीनीवर आदळणें ; ठोकून दाट बसविणें ( मागावरील कापड , चटई , साखरेनें वगैरे भरलेलें पोतें इ० ). ४ ( र्को .) गिर्‍हाइकाला देण्यापूर्वी लाभ बरकत येवो अशा बुद्धीने कापड इ० माल जमीनीवर , फळीवर , पेटीवर आपटणें ( कापडवाल्यांत हा प्रघात विशेष आहे ). ५ निक्षून , बजावून सांगणें , बोंलणें . [ सं . हट ] हडसणी --- स्त्री . १ हडसण्याची क्रिया ; झटका ; हिंसडा . २ ढकलणी ; घोळणी . हडसणी --- स्त्री . मागावरील कापड ठासण्यासाठीं असणारी एक फळी ; फणी . हडसूनखडसून --- क्रिवि . १ हडसण्याची क्रिया करुन : झडकून ; हिसडून ; जोरानें ओढून . २ ठोकूनठाकून ; हालवून . ३ निक्षृन ; बजावून . हडसुन खडसून हें सनंग दिलें ४ उघडपणें ; राजरोस ; बिनदिक्कत . हडसूनखडसून दरवडा घातला . ५ रोकठोक ; स्पष्टपणे ; धडधडीत ; तोंडावर ; निर्भिडपणानें . हडसून खडसून जबाब दिला . ६ सरळपणानें ; उघडपणें ; हमखास ; मनावर बिंबेल अशा रीतीनें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP