|
उ.क्रि. १ व्यर्थ येरझार करावयास लावणें ; निष्कारण खेप करविणें ; क्षुल्लक निरोपासाठीं हेलपाटा घालावयास लाग ( व ) णें . २ बिघडविणें ; फिसकटविणें ; निरुपयोगी करणें ( उपाय , मसलत , श्रम इ० ). - अक्रि . १ ( कों . ) वार्यानें उमळून पडणें ; नाश पावणें ( झाड , झोपडें ). २ नासधूस होणें ; चुराडा होणें . [ सं . हेला = फेरा ] हेलपटणी , हेलपाटणी - स्त्री . निरोपाचा व्यर्थ हेलपाटा ; फेरा . हेलपट , हेलपाट , हेलपटनिशी , हेलपाटनिशी - स्त्री . निष्कारण हेलपाटे खाण्याचा प्रकार ; वरचेवर व्यर्थ खेपा करणें . [ हेलपटा + फा . नविशी ] हेलपटा , हेलपाटा - पु १ फुकट खेप ; येरझार ; त्रासदायक फेरा , चाल . ( क्रि० पडणें ; बसणें ; देणें ; करणें ). २ रस्त्याचें लांबचें वळण ; गैरे माहितीनें या वळणानें जाणें ; त्यामुळें झालेले श्रम ; फिरकांडा ( क्रि० बसणें ; खाणें ; होणें ).
|