Dictionaries | References

२१

   { एकवीस }
Script: Devanagari

२१     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इक्कीस, इक्कीस

२१     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : एकवीस, एकवीस, एकवीस

२१     

Sanket Kosh | Marathi  Marathi
एकवीस कल्प   
१ कापिल, २ प्राजापत्य, ३ ब्राह्म, ४ सौम्य, ५ सावित्र, ६ बार्हस्पत्य, ७ प्राभासक, ८ माहींद्र, ९ आग्नि, १० जयंत, ११ मारुत, १२ वैष्णव, १३ बहुरूप, १४ ज्योतिष, १५ मायूर, १६ कौर्म, १७ बक, १८ मात्स्य, १९ पाद्य, २० वटकल्प आणि २१ वाराह कल्प. (चालू असलेला)
एकवीस नांवें तापी (नदी) चीं   
१ सत्या, २ सत्योद्भवा, ३ श्यामा, ४ कपिला, ५ कापिलांबिका, ६ तापिनी, ७ तपनहरा, ८ नासत्या, ९ नासिकोद्भवा, १० सावित्री, ११ सहस्त्रकरा, १२ सनका, १३ अमृतवाहिनी, १४ सुषुम्ना, १५ सूक्ष्मरमणा, १६ सर्पासर्पविषापहा, १७ तिग्मा, १८ तिग्मरसा, १९ तारा, २० ताम्रा व २१ तापी. (तापी. म. अ. २)
एकवीस नांवें बिल्ववृक्षाचीं   
१ बिल्व, २ मालूर, ३ श्रीफल, ४ शाण्डिल्य, ५ शैलक, ६ शिव, ७ पुण्य, ८ शिवप्रद, ९ देवावास, १० तीर्थवेद, ११ पापघ्न, १२ कोमलच्छद, १३ जय, १४ विजय, १५ विष्णु, १६ त्रिनयन, १७ वैर, १८ धूम्राक्ष, १९ शुक्लवर्ण, २० संयमी आणि २१ श्राद्धदेवक. ([कल्याण मासिक])
एकवीस नांवें सूर्यदेवतेचीं   
१ विकर्तन, २ विवस्वान ३ मार्तेड, ४ भास्कर, ५ रवि, ६ लोकप्रकाशक, ७ श्रीमान्, ८ लोकचक्षु, ९ महेश्वर, १० लोकसाक्षी, ११ त्रिलोकेश, १२ कर्ता, १३ हर्ता, १४ तमिस्त्रहा, १५ तपन, १६ तापन, १७ शुचि, १८ सप्ताश्चवाहन, १९ गमस्तिहस्त, २० ब्रह्मा आणि २१ सर्वदेवनमस्कृत.
"एकविंशतिरित्येष स्तव इष्टः सदा रवेः"([मार्कंडेय पु. ३१-३१३३])
एकवीस पत्री गणेशपूजेचीं   
१ मालती, ६ माका, ३ बेल, ४ दूर्वा, ५ बोर, ६ धोतरा, ७ तुळस, ८ आघाडा, ९ शमी, १० केवडाअ, ११ कण्हेर, १२ आपटा, १३ मांदार, १४ अर्जुन (जास्वंद ०), १५ विष्णुक्रांत, १६ डाळिंबी, १७ देवदार, १८ मरवा, १९ निर्गुडी, २० जाई आणि २१ अगास्ति (हादगा). (पूजेचे मंत्र)
एकवीस प्रकारचीं दुःखें   
१ शरीर, ६ इंद्रियें, ६ बुद्धि, ६ विषय, १ सुख व १ दुःख, अशीं एक वीस प्रकारची दुःखी. या दुःखांचा नाश हाच पुरुषार्थ असें वैशेषिक शास्त्र मानतें. (दर्शन मंद्राकिनी)
एकवीस प्रधान गणपतिक्षेत्रें   
१ मोरगांव (जिल्हा - पुणें),
२ काशी,
३ प्रयाग,
४ कदंबपूर (वर्‍हाड),
५ श्रीक्षेत्र अदोष (नागपूर जवळ),
६ पल्लीपूर (सिंधप्रांत),
७ पारिनेर (उज्जैयिनी जवळ)
८ गंगा मसलें (सेलू स्टेशनपासून १५ मैलांवर),
९ राक्षसभुवन,
१० थेऊर (जि. पुणें),
११ सिद्धटेक (दौंड जवळ),
१२ रांजणगांव (जिल्हा पुणें),
१३ विजयपूर, (आंध्राप्रांत),
१४ कश्यपाश्रम क्षेत्र (काशीजवळ),
१५ गणेशपूर क्षेत्र (बंगाल),
१६ लेण्याद्रि (जुन्नर जवळ),
१७ वेरूळ,
१८ पद्मालय (खानदेश म्हसावद स्टेशनपासून ५ मैलांवर),
१९ अमलाश्रम क्षेत्र (बीडजवळ),
२० गणपतीचे राजूर (जालन्याजवळ) आणि
२१ श्चेत विघ्नेश क्षेत्र (कुंभकोणाम् जवळ कावेरीतीरीं). (एकविंशति - गणेश - क्षेत्र - महिमा)
एकवीस प्रथम श्रेणीच्या तारका   
१ शालिनी (व्याध), २ अगास्ति, ३ मित्र, ४ अभिजित, ५ ब्रह्म, ६ स्वाति, ७ राजन्य, ८ सरमा, ९ अग्रिम, १० मित्रक, ११ श्रवण, १२ काक्षि, १३ त्रिशंकू, १४ रोहिणी, १५ पुनर्वसु (प्लक्ष), १६ चित्रा, १७ ज्येष्ठ, १८ मीनास्य, १९ सोहं ([हंस]),
२० मघा आणि २१ क्रतु.
"अवश्यं लक्षणीया हि एकविंशतितारकाः।"(तारका नगरी)
एकवीस मृत्युलोकींचीं रत्नें   
१ माणिक अथवा पद्मराग, २ मोतीं, ३ प्रवाल, ४ मरकतमणि, ५ पुष्पराग, ६ वज्रमणि, ७ इंद्रनील मणि, ८ मेदकमणि (गोमेदक), ९ सूत्रमणि (लसणी), १० वैडूर्यमणि, ११ चंद्रकांतमणि, १२ घृतमणि, १३ तैलमणि, १४ भौष्मकमणि, १५ अमृतमणि १६ उपलकमणि (ओपल), १७ पारसमणि, १८ जलूकामणि, १९ लाजावर्तमणि, २० मासरमणि आणि २१ भीष्मकपाषाण अथवा मणि
हीं सर्व एकवीस रत्नें देवदानव युद्धांत पडलेल्या राजा बलीच्या निरनिराळ्या अंगापासून उत्पन्न झालीं अशी कथा आहे. (रत्नदीपिका)
एकवीस भूर्च्छना (संगीतशास्त्र)   
(अ) १ उत्तरमन्द्रा, २ रजनी, ३ उत्तरायता, ४ शुद्ध षड्‌‍जा, ५ मत्सरीकृता, ६ अश्वक्रान्ता, ७ अभिरुद्रता, ८ सौवीरी, ९ हरिणाश्वा, १० कलोपनता, ११ शुद्धमध्या, ११२ मागीं, १३ पौरवी, १४ ह्रश्यका, १५ नन्दा, १६ विशाला. १७ सुमुखी, १८ चित्र (विचित्रा), १९ चित्रावती (मोहिनी), २ - सुरवा आणि २१ आलापा (आलापन). (सुरतरंगिणी).
सप्त स्वरांचा आरोह अवरोह करणें त्यास अथवाअ त्या स्वरसमुदायांस मूर्च्छना म्हणतात. (रागविलास).
"सप्त स्वरास्त्रयो ग्रामा मूर्च्छना एकविंशतिः।"([नारदीय पूर्वखंड])
(आ) १ नंदा, २ विशाला, ३ सुमुखी, ४ चित्रा, ५ चित्रवती, ६ सुरवाअ आणि ७ बला या सात (देवतांच्या) मूर्च्छना, ८ अप्यावती, ९ विश्वभृता, १० चंद्रा, ११ हेमा, १२ कपर्दिनी, १३ मैत्री व १४ बार्हती या सात (पितरांच्या) मूर्च्छना आणि १५ उत्तरचंद्र, १६ अभिरुढता, १७ अश्चक्रांता, १८ सौवीरा, १९ हृषिका, २० उत्तरायता आणि २१ रजनी, या सात ऋषींच्या होत.
गंधर्वगण देवतांच्या मूर्च्छनांचा स्वीकार करतात व मानव ऋषींच्या मूर्च्छना घेतात.

२१     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : एक्काइस, एक्काइस, एक्काइसौँ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP