Dictionaries | References

३३

   { तेहतीस }
Script: Devanagari

३३     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तैंतीस, तैंतीस

३३     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तेहेतीस, तेहेतीस

३३     

Sanket Kosh | Marathi  Marathi
तेहतीस गुण मंत्र्यास आवश्यक   
१ नियंत्रणप्रियता, २ तद्देशीय जन्म, ३ कुलीन, ४ सुशील, ५ सैनिकवृत्तीचा, ६ वाक्‌‍कुशल, ७ निर्मय, ८ शास्त्रज्ञ, ९ उत्साही, १० प्रत्युत्प्न्नमति (हजर जबाबी), ११ निरभिमानी, १२ चंचल नसणारा, १३ मैत्रीवर्धक, १४ कष्टसहिष्णु, १५ शुचिअलोभी, १६ सत्यनिष्ठ, १७ नीतिमार्गानुसारी, १८ धीर १९ सुस्थिर, २० प्रतापी, २१ नीरोगी, २२ शिज्पज्ञ, २३ निरलस, २४ बुद्धिमान्, २५ धारणावान्, २६ निष्ठावंत, २७ विरोध नष्ट करणारा, २८ स्मरणशक्ति तीव्र, २९ राज्यव्यवहारांत तत्पर, ३० त्वरित निर्णय क्षमता, ३१ विचारशील, ३२ अचुक परीक्षा आणि ३३ कार्याचा उरक व रहस्य गुप्ततेविषयीं दक्ष, (कामन्दकीय नीतिसार)
तेहतीस देव अथवा तेहतीस देवता   
८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापति मिळून तेहतीस देवता होत ([शतपथ]).
याच एक एका देवतेची एक एक कोटिरूप समुदाय अशी गणना करून पौराणिकांनीं तेहतीस कोटि देवता मानल्या आहेत. (तत्त्व - निज - विवेक). वस्तुतः तेहतीसच देव आहेत. या तेहतीसपैकीं स्वर्गांत ११, पृथ्वीवर ११, व अन्तरिक्षांत ११ मिळून ३३ असें वर्णन ऋग्वेदांत आढळतें. ([ऋग्वेद १-१३-११]) (प्राचीन भारतीय संस्कृति)
तेहतीस वीर्ये   
१ ओज, २ तेज, ३ वल, ४ वाणी, ५ सत्ता, ६ श्री, ७ धर्म, ८ ब्रह्मतेज, ९ क्षात्रतेज, १० राष्ट्र, ११ वणिक वृत्ति, १२ कांति, १३ यश, १४ तपोबल, १५ संपत्ति, १६ आयु, १७ रूप, १८ व्यक्तिमत्त्व, १९ कीर्ति, ५० प्राण २१ अपान, २२ चक्षु, २५ श्रोत्र, २४ दूध, २५ रस, २६ अन्न, २७ अन्नद्यं (जठराग्नि प्रदीप्त), २८ ऋतु (प्रामाणिकपणा), २९ सत्यु, ३० व्यक्तिगत नित्यकर्में, ३१ सामाजिक कर्तव्यें - विहीर धर्मशाळा वगैरे बांधणें, ३२ प्रजा आणि ३३ पशु.
हीं तेहतीस वीर्यें अथवा गुण राष्ट्रीय संपन्नतेस आवश्यक. ([अथर्व वेद १२-६७]) ([भारतीय मानसशास्त्र]).
तेहतीस व्यभिचारी भाव   
शारीरिक अवस्थांशीं समांतर चौदा - १ मरण, २ व्याधि, ३ ग्ल्नि, ४ श्रम, ५ आलस्य, ६ निद्रा, ७ स्वप्न, ८ सुप्त, ९ अपस्मार, १० उन्माद, ११ मद, १२ मोह, १३ जडता, १४ चपलता ;
ज्ञानात्मक मनोवस्थांशीं समांतर तीन - १५ स्मृति, १६ मति, १७ विमर्श ;
भावनात्मक मनोवस्थांशीं समांतर सोळा - १८ हर्ष, १९ अमर्ष, २० धृति, २१ उग्रता, २२ आवेग, २२ विषाद, २४ निर्वेद, २५ औत्सुक्य, २६ चिंता, २७ शंका, २८ असूया, २९ त्रास, ३० गर्व, ३१ दैन्य, ३२ अवहित्थ व ३३ क्रीडा.
असे एकूण तेहतीस व्यभिचारी अथवा संचारी भाव साहित्यशास्त्रांत मानले आहेत. ([भरतनाटय ६, १८ ते २१])

३३     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : तेत्तीस

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP