Dictionaries | References

३६

   { छत्तीस }
Script: Devanagari

३६     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : छत्तीस, छत्तीस

३६     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : छत्तीस, छत्तीस

३६     

Sanket Kosh | Marathi  Marathi
छ्त्तीसाचा आकडा   
यांतील तीन व सहा अंकाच्या आकृति एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या माणसाप्रमाणें दिसतात. दांपत्यांत एकाचें तोंड पूर्वेकडे व दुसर्‍याचें पश्चिमेकडे अशा अर्थी प्रेमाचा अभाव असा अर्थ. (मराठी शब्दाचें उद्धाटन)
छत्तीस आयुधें   
१ चक्र, २ धनुष्य, ३ वज्र, ४ खड्‌ग, ५ क्षुरिका, ६ तोमर, ७ कुंत, ८ शूल, ९ त्रिशूल, १० शक्ति, ११ पाश, १२ अंकुश, १३ मुद्रर, १४ मक्षिका, १५ भल्ल, १६ भिंडमाल. १७ मुसुंडी, १८ लुंठि, १९ गदा, २० शंख, २१ परशु, २१ पट्टिस, २३ रिष्टि, २४ कणय, २५ संपन्न, २६ हल, २७ मुसल, २८ पुलिका, २९ कर्तरि, ३० करपत्र ३१ तरवारी, ३२ कोद्दाल, ३३ दुस्फोट, ३४ गोफण, ३५ डाह आणि ३६ डबूस.
असे आयुधाचे छत्तीस प्रकार प्राचीन कालीं होते. ([वस्तुरत्नकोश])
छत्तीस गुणमेलन   
विवाहद्दष्टया मेलन आठ प्रकारानें पाहातात व प्रत्येक प्रकारास गुण ठरलेले आहेत ते असेः - १ वर्ण गुण - १, २ वश्य गुण - २, ३ नक्षत्र गुण - ३, ४ योनी - गुण४, ५ ग्रह गुन - ५, ६ गण गुण - ६, ७ राशी गुण - ७, ८ नाडी गुण - ८ हीं सर्व मिळून छत्तीस होतात. बधूवरांचे छत्तीस गुण जमल्यास विवाहास उत्तम मानतात. ([ज्योतिष])
एकनाड षडाष्टक चुकवून। दोहींचा पाहोन एकगण।
गृहमैत्री छत्तीस लक्षण। कुशल शोधुनि पहाणें ॥ ([सिद्धान्तबोध २४-८५])
छत्तीस गुण राज्यशासकास आवश्यक   
१ रागद्वेषाचा त्याग,
२ नास्तिक असूं नये,
३ क्रूरता न करतां द्रव्यसंपादन,
४ औद्धत्याचा अस्वीकार,
५ प्रिय भाषण,
६ शौर्य,
७ आत्मश्लाघा नसावी,
८ दानशूरत्व,
९ अपात्रीं द्रव्याचा अपव्यय न करणें,
१० प्रगल्मता,
११ निष्ठुर असूं नये.
१२ नीच लोकांशीं संगनमत न करणें,
१३ बांधवांशीं वैर न करणें,
१४ एकनिष्ठ नसेल असा हेर ठेवूं नये,
१५ दुसर्‍याला क्लेश न होतील अशा रीतीनें कार्य क्रावें,
१६ असज्जनांना आपला उद्देश कळवूं नये,
१७ आपल्या गुणांचा उच्चार करूं नये,
१८ सत्पुरुषांकडून कांहीं घेऊं नये,
१९ असज्जनांना आश्रय देऊं नये,
२० सर्व बाजूंनीं विचार केल्यावांचून दंड करूं नयेम
२१ कारस्थान गुप्त असावें,
२२ लुब्ध मनुष्यांचा दान करूं नये,
२३ अपकार करणारांवर विश्वास ठेवूं नये,
२४ स्त्रियांचे संरक्षण,
२५ काम नियमित,
२६ परिमित भोजन,
२७ सन्मानीयांचा मान ठेवणें,
२८ गुरुजनांची सेवा,
२९ देवांचे पूजन,
३० संपत्तिप्राप्तीची इच्छा करावी,
३१ संपत्तीचा उपभोग घ्याव पणा मोह नसावा,
३२ दक्ष अवावें पण कालज्ञानशून्य असूं नये,
३३ शत्रूंना मुक्त करण्याविषयीं आश्चासन देऊं नये,
३४ शत्रु व त्याचा अपराध हीं जाणल्यावांचून शस्त्रप्रहार करूं नये,
३५ वध केल्यानंतर शोक करूं नये व
३६ अपकार करणारांवर दया दाखवूं नये. ([म. भा. शांति. अ. ७०])
छत्तीस गुण स्त्रीचे (अरबांचे मतें)   
चार ठिकाणीं काळेपणा - १ डोक्याचें केंस, २ भुंबई, ३ पाणण्या व ४ डोळ्याचें बुबुळ.
पांढरेपणा - ५ त्वचा (गौरवर्ण) ६ डोळ्यामधील भाग, ७ दांत व ८ पाय.
लालसर - ९ जिव्हा, १० ओष्ठ, ११ कपोल, व १२ हिरडया.
वर्तुलाकार - १३ कपाळ, १४ मान, १५ बाहू व १६ कोंपरे.
लांब - १७ पाठ, १८ बोटें, १९ हात व २० पाय.
विशाल - २१ भाल, २२ डोळे, २३ छाती व २४ पुठ्ठे - (कटिपश्चाद भाग).
सुंदर - १५ मुंबई, २६ नाक, २७ ओंठ व २८ बोटें.
जाड (मांसल) - २९ कंबर, ३० मांडया, ३१ दंड, ३२ पोटर्‍या,
संकृचित - ३३ कान, ३४ उरस्थल, ३५ हात व ३६ पाय ([अंकशास्त्र])
छत्तीस तत्त्वें (शैवसिद्धान्त)   
१ शिव, २ शक्ति, ३ सदाशिव, ४ ईश्वर, ५ शुद्धविद्या, ६ माया, ७ विद्या (अविद्या), ८ कला, ९ राग, १० काल, ११ नियति, १२ जीव, १३ प्रकृति, १४ मन, १५ बुद्धि, १६ अहंकार, १७ श्रोत्र, १८ त्वक ‌, १९ चक्षु, २० जिह्ला, २१ घ्राण, २२ वाक् ‌, २३ पाणि (हात), २४ पाद (चरण), २५ पायु, २६ उपस्थ, २७ शब्द, २८ स्पर्श, २९ रूप, ३० रस, ३१ गंध, ३२ आकाश, ३३ बायु, ३४ तेज, ३५ जल आणि ३६ पृथ्वी. या बाहेरील"परमशिव"हें सदतिसावें तत्त्व होय. (शैवसिद्धान्त)
छत्तीस प्रकार राजविनोदाचे   
१ दर्शन विनोद, २ श्रवण विनोद, ३ कृत्रिम विनोद, ४ गीत विनोद, ५ वाद्य विनोद, ६ नृत्य विनोद, ७ शुद्ध लिखित विनोद, ८ सख्य विनोद, ९ ववकृत्व विनोद, १० कवित्व विनोद, ११ शास्र विनोद, १२ कर विनोद, १३ विबुध्य विनोद, १४ अक्षर विनोद, १५ गणित वनोद, १६ शस्त्र विनोद, १७ राज विनोद, १८ तुरग विनोद, १९ पक्षि विनोद, २० आखेटक विनोद, २१ जल विनोद, २२ यंत्र विनोद, २३ मंत्र विनोद, २४ महोत्सव विनोद, २५ फल विनोद, २६ गणिका विनोद, २७ पठित विनोद, २८ पत्र विनोद, २९ पुष्प विनोद, ३० कला विनोद, ३१ कथा विनोद, ३२ केशविनोद, ३३ प्रहेलिका विनोद, ३४ चित्र विनोद, ३५ चलच्चित्र विनोद आणि ३६ स्तव विनोद.
असे विनोदाचे छत्तीस प्रकार पूर्वकाळीं असत. ([वस्तुरत्नकोश])
छत्तीस यक्षिणी   
१ विचित्रा, २ विभ्रमा, ३ हंसी, ४ भीषणा, ५ जनरंजिका, ६ विशाला ७ मदना, ८ कालकरणी, ९ महाभया, १० माहेंद्री, ११ शंखिनी, १२ शंडिका, १३ स्मशाना, १४ वटकांक्षिणी, १५ मेखला, १६ विकला, १७ लक्ष्मी, १८ मानिनी, १९ शतपत्रिका, २० सुलोचना, २१ सौमाग्या, २२ कपिला, २३ विलासिनी, २४ नटिका यक्षिणी, २५ कानेश्वरी, २६ सुवर्णसुरसुंदरी, २७ मनोहरा, २८ प्रमोदा, २९ रागिणी, ३० नखकेशिका, ३१ पद्मिनी, ३२ भोगिनी, ३३ स्वर्णावती, ३४ देवरातप्रिया, ३५ कर्णपिशाच व ३६ करकंकणी, ([मंत्रशास्त्र])
छत्तीस रागिण्या   
(संगीत)- जनमनरंजनास योग्य होतो असा स्वरसमुदाय याला राग म्हणतात. असें सुमारें दीडशेवर राग हल्लीं प्रचारांत आहेत. पण मुख्य पुरुष राग सहा व त्यांच्या प्रत्येकीं सहा भार्या म्हणजे छत्तीस रागिण्या होत. कोणी पांचच मानतात. राग, रागिण्या व पुत्रराग याबावतींत ऐकमत नाहीं. निरनिराळे ग्रंथकार नांवें व संख्या निरनिराळीं देतात. राग हे भगवान् शंकराच्या शरीरापासून व रागिण्या मस्तकापासून उत्पन्न झाल्या अशी कथा आहे.
राग रागिण्या
१ श्रीराग - १ गौरी, २ कोलाहली, ३ धीरा, ४ द्राविडी, ५ मालकौशिकी व ६ गांधारी.
२ वसंत - १ आंदोला, २ कौशिकी, ३ चरमंजिरी, ४ गंडगिरि, ५ देवशास्त्र व ६ रामगिरी.
३ पंचम - १ त्रिगुणा, २ स्तंभतीर्था, ३ आदिरी, ४ कुंकुमा, ५ वैराटी व ६ सामवेरी,
४ भैरव - १ मैरव, २ गुर्जरी, ३ भाषा, ४ वेलागुली, ५ कर्णाटकी व ६ रक्तहंसा.
५ मेघ किंवा मेघमल्हार - १ बंगाली, २ मधुरा, ३ कामोदा, ४ अक्षिनारिका, ५ देवगिरी व ६ देवाली.
६ नरनारायण - १ त्रोटकी, २ मोडकी, ३ नरा, ४ दुंबी, ५ मल्हारी. व ६ सिंधु मल्हारी.
तेणें साही राग छत्तीस भार्या। चौसष्टी मूर्च्छना दावूनियां।
अनेक उपरागांचिया क्रिया। दाविल्या तेव्हां रिसानें ॥ ([ह. वि. २५-११९]) ([स्कंद - नागरखंड अ. २५४])
छत्ती ल क्षणे (काव्याचीं)   
१ विभूषण, २ अक्षरसंघात, ३ शोभा, ४ अभिमान, ५ गुणकीर्तन, ६ प्रोत्साहन, ७ उदाहरण, ८ निरुक्त, ९ गुणानुवाद, १० अतिशय, ११ हेतु, १२ सारूप्य, १३ मिथ्याध्यवसाय, १४ सिद्धि, १५ पदोच्चय, १६ आक्रंद, १७ मनोरथ, १८ आख्यान, १९ याञ्चा, २० प्रतिषेध, २१ पृच्छा, २२ द्दष्टांत, २३ निर्मासन, २४ संशय, २५ आशी, २६ प्रियोक्ति, २७ कपट, २८ क्षमा २९ प्राप्ति, ३० पश्चात्ताप, ३१ अनुवृत्ति, ३२ उपपत्ति, ३३ युक्ति, ३४ कार्य, ३५ अनुनीति आणि ३६ परिदेवना."काव्यबन्धाः षट् त्रिंशल्लक्षणान्विताः"
(म. ना १६-४२)
छत्तीस व्यंजनें   
क् ‌, ख्, ग् ‌, घ् ‌, ङ् ‌, च् ‌, छ् ‌, ज् ‌, झ् ‌, ञ् ‌, ट् ‌, ठ् ‌, ड् ‌, ढ् ‌, ण्, त्, थ् ‌, द् ‌, ध्‌‍, न् ‌, प् ‌, फ् ‌, ब् ‌, भ् ‌, म्, य् ‌, र्, ल् ‌, व्, श् ‌, ष् ‌, स् ‌, ह्, ळ्, क्ष्, ज्ञ्, हीं छत्तीस व्यंजनें होत.
छत्तीस पाखंडें   
१ वासुदेव, २ दिंडीगाण, ३ गोंधळीं, ४ डफ गाणे, ५ बहिरा, ६ जोगी, ७ बाळसंतोष, ८ बैरागी, ९ डाकुलता जोशी, १० आंधळा, १२ पांगुळ, १२ मुका, १३ कैकाडी, १४ शौरी म्हणजे हिजडा, १५ मुंडा, १६ कापडी, १७ वैद्य, १८ चाटे, १९ भाट, २० भांड, २१ भराडी, २२ नानक, २३ ठाकूर, २४ वाघ्या, २५ गारोडी, २६ बहुरूपी, २७ भुत्या, २८ चित्रकथी, २९ दरवेशी, ३० तुंबडीबाला ३१ वारांगना, ३२ पुराणीक, ३३ गवई, ३४ ज्योतिषी, ३५ मानभाव आणि ३६ ब्राह्मण ([दर्शन प्रकाश])

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP