-
चौसष्ट कला
(अ) चौदा विद्या आणि चौसष्ट कला अशी प्राचीन परंपरी आहे. या चौसष्ट कला कोणत्या यासंबंधीं मतैक्य नाहीं. श्रीमद्भागवत शुक्रनीति व वात्सायन कामसूत्रें वगैरे निरनिराळ्या ग्रंथांत निरनिराळ्या याद्या आढळतात. शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथांत या चौसष्ट कलांचा नामनिर्देश असा आहेः - १ इतिहास, २ आगम, ३ काव्य, ४ अलंकार, ५ नाटक, ६ गायकत्व, ७ कवित्व, ८ कामशास्त्र, ९ दूरोदर (द्यूत), १० देशभाषालिपिज्ञान, ११ लिपिकर्म, १२ वाचन, १३ गणक, १४ व्यवहार, १५ स्वरशास्त्र, १६ शाकुन, १७ सामुद्रिक, १८ रत्नशास्त्र, १९ गज - अश्वरथ - कौशल, २० मल्लशास्त्र, २१ सूपशास्त्र, २२ भूरुहदोहद (बागाइत), २३ गंधवाद, २४ धातुवाद, २५ रससंबंधीं खनिवाद, २६ बिलबाद, २७ अग्निसंस्तम्भ, २८ जलसंस्तम्भ, २९ वाचस्तम्भन, ३० वायुस्तम्भन, ३१ वशीकरण, ३२ आकर्षण, ३३ मोहन, ३४ विद्वेषण, ३५ उच्चाटन, ३६ मारण, ३७ कलावंचन, ३८ परकायप्रवेश, ३९ पादुकासिद्धि, ४० वाक्सिद्धि, ४१ गुटिकासिद्धि, ४२ ऐन्द्रजालिक, ४३ अंजन, ४४ परद्दष्टिवंचन, ४५ स्वरवंचन, ४६ मणिभूमिकर्म - जमिनीवर रत्नांची मण्यांची रचना करणें, ४७ मंत्र औषधींची सिद्धि, ४८ चोरकर्म, ४९ चित्रक्रिया, ५० लोहक्रिया, ५१ अश्मक्रिया, ५२ मृक्तिया, ५३ दारुक्रिया, ५४ वेणुक्रिया, ५५ चर्मक्रिया, ५६ अम्बरक्रिया, ५७ अद्दश्यकरण, ५८ दन्तिकरण, ५९ मृगयाविधि, ६० वाणिज्य, ६१ पाशुपाल्य, ६२ कृषि, ६३ आसवकर्म आणि ६४ लाव - कुक्कुट - मेषादि युद्धकारक कौशल. ([शिवतत्त्वरत्नाकर द्वितीय तरंग]). नखचित्रें ही पासष्टावी कला होय.
(आ) वात्सायन कामसूत्राच्या आधरें या चौसष्ट कलांचें वर्गीकरण असें आहेः -
वाङ्मयात्मक कला दहा - १ वाचन व पठन, २ शब्दकोशविद्या व पद्यरचना, ३ गूढकाव्यज्ञान, ४ समस्यापूर्ति, ५ न पाहिलेल्या वस्तु व अक्षरें ओंळखणें, ६ सांकेतिक भाषाज्ञान, ७ अनेक भाषाज्ञान, ८ कूट प्रश्न सोडविणें, ९ तोंडी कूट प्रश्न सोडविणें, १० नकला करणें ; गृह्यकला (घरगुती धंदे) तीन - ११ शिवणकला, १२ धनुष्य - बाण वगैरे करणें, १३ शय्या तयार करणें ;
पाकशास्त्रकला तीन - १४ विविध भोजनप्रकार, १५ विविध पाकरचना व १६ विविध पेयें ;
स्नान वेषभूषा वगैरे नऊ - १७ चंदनाची उटी, १८ अलंकार घालणें, १९ सुगंधी द्रव्यें तयार करणें, २० फुलांचे दागिने, २२१ पुष्पमाला बनविणें, २२ दांत वस्त्रें रंगविणें, २३ केशरचना, २४ शिरोवेष्टनप्रकार व २५ वस्त्रांतर करणें ;
हस्तव्यवसाय - कला नऊ - २६ नकाशा काढणें, २७ चित्रकला, २८ विविध द्दश्यें दाखविणें, २९ मूर्तिकला, ३० लाकडावरील खोदकाम, ३१ रांगोळ्या, ३२ पुष्पशय्या तयार करणें, ३३ दोर्याचीं कृत्रिम फुलें तयार करणें ; ३४ फुलांच्या गाडया तयार करणे ;
करमणुकीच्या कला अकरा - ३५ कारंजें तयार लावणें, ३९ पोपटांना शिकविणें, ४० विविध रीतींनीं एकच गोष्ट करणें, ४१ हातचलाखी, ४२ विविध खेळ, ४३ वशीकरण विद्या, ४४ विविध वेष धारण करणें, ४५ कूचुमारानें शिकविलेलीं जादू करणें ;
शास्त्रीय कला नऊ - ४६ सोनें वगैरेंत हिरे बसविणें, ४७ गृहशिल्प, ४८ सोनें वगैरे परीक्षा, ४९ विविध धातूंचें ज्ञान, ५० रत्नें रंगविणें, ५१ खाणी कोठें आहेत तें ओळखणें, ५२ बागबगीचा, ५३ धातूवरील कोरीव काम, ५४ मणि रत्नें वगैरेंना भोकें पाडणें ;
संगीत कला चार - ५५ गायन, ५६ वादन, ५७ जलतरंग, ५८ शरीर गोंदणें ;
शारीरिक व्यायाम कला चार - ५९ मुलांचे खेळ, ६० विविधव्यायामाचें ज्ञान, ६१ नृत्य आणि ६२ युद्धकलांचें ज्ञान ;
नाटयकला एक - ६३ अभिनय ;
शिष्टाचारकला एक - ६४ विविध शिष्टाचारांचें ज्ञान, (पुरुषार्थ वर्ष १० अंक ६)
जैन धर्मग्रंथांत ७२ कला मानिल्या आहेत. त्या ७२ अंकाखालीं पहा.
-
See : चौसष्ट, चौसष्ट
-
See : चौसठ, चौसठ
-
चौसष्ट तंत्रग्रंथ
१ महामायाशंबर, २ योगिनीजालशंबर, ३ तत्तशंबरक, ४-११ भैरवाष्टक, ११२-१९ बहुरूपाष्टक, २० ज्ञान २१-२८ यमलाष्टक, २९ चंद्रज्ञान, ३० वासुकि, ३१ महासम्मोहन, ३२ महाच्छूश्म, ३३ महादेव, ३४ वाथु (ल ?) ल. ३५ नयोत्तर, ३६ ह्रद्मेद, ३७ मातृमेद, ३८ गुह्यतंत्र, ३९ कामिक, ४० कालपाद, ४१ कालसार, ४२ कुब्जिकामत, ४३ नयोत्तर, ४४ वीणू (णा) द्य, ४५ तोत्तल, ४६ तोत्तलोत्तर ४७ पंचामृत, ४८ रूपमेद, ४९ भूतोड्डामर, ५० कुलसार, ५१ कुलोद्दीश, ५२ कुलचूडामणि, ५३ सर्वज्ञानोत्तर, ५४ महापिशामत, ५५ महालक्ष्मीमत, ५६ सिद्धयोगीश्वरमत, ५७ कुरूपिकामत, ५८ रूपिकामत, ५९ सर्ववीरमत, ६० विमलामत, ६१ उत्तम, ६२ आरुणेश, ६३ मोहनेश आणि ६४ विशुद्धेश्वर. ([म. ज्ञा. को. वि. १४])
Site Search
Input language: