-
पुस्त्री .
- दुक्कल ; जोडी ; जोडा ; युग्म ( एका जातीच्या दोन , दोन , एकाचवेळीं चालणार्या , असणार्या वस्तू ). पाटल्या जोड , कांकणें जोड , इ०
- जोडी ; संघ ; संच ; ताफा ( सोंगटया खेळणारांचा , पूजापात्रांचा , खेळणारांचा , वाद्यांचा , वाजविणारांची ); डाव ( गंजिफाचा ); संच ( कपडे , धोतर व अंगवस्त्र यांचा ). सामान्यत : सेट .
- ठिगळ ; गावडी ; सांचा लावलेला तुकडा ; संयोग ( वस्त्र , लांकूड , धातू वगैरेस )
- सूर लावण्यासाठीं सा , रि , ग , म , प , ध , नी हे सूर खालीं - वर करणें ; आलाप घेणें .
- ( - स्त्री . ) ( अक्षरश : व ल० ) सांठा ; संचय ; संग्रह मिळविलेलें द्रव्य . आपल्या सार्या हयातीची जोड आपण भोळसरपणानें घालवून बसलों .
- मिळकत ; लाभ ; किफायत . जोड जोडिली मनुष्यदेहा ऐसी । - तुगा ७१२ . व्यर्थ भांडतां ह्यांत जोड काय !
- जोडलेला या अर्थी हा शब्द फळांच्या नांवांच्या मागें जोडतात . जसें - जोड - आंबा - पेरू - केळ इ० .
- दुहेरी या अर्थानें जोड शब्दाचे समास होतात . जसें - जोड - कडी - कांठ - खांब - तुळई - पदर - भिंत इ०
- गुंतवण ; सांधा ; संबंध ; सांगड ; गुंतवणूक ( पशूंची , माणसांची ); जोडपणा ; सांखळी . ( क्रि० घालणें ).
- विण्याच्या मधल्या दोन तारा ; सतारीच्या मधल्या दोन ( ज्या षडज स्वरांत मिळविलेल्या असतात त्या ) तारा .
- मैत्री ; सलगी ; जिव्हाळा .
- बरोबरी ; साम्य ; साथ . धर्मासि म्हणे बागा साधो जोडा नसेचि या दिवसा । - मोविराट ७ . १६ . गुंगा व गामा यांची जोड अगदीं अप्रतिम होती .
- ( बांधकाम ) पुस्ती ; नवीन गोष्टींची किंवा कांहीं कामांची वाढ .
- ( ओतकाम ) दोन पिशव्यांचा दोन हातांनीं फुंकला जाणारा भाता .
- ( कुस्ती ) एक डाव . जोडीदाराचा एक हात त्याच्या दोन्ही पायांतून धरून आपला दुसरा हात जोडीदाराच्या मानेवर ठेवून जोडीदाराची मान खालीं दाबून पायांतून जोडीदाराचा धरलेला हात वर उचलून त्याला चीत करणें [ सं . युज - योजय ; प्रा . जोड ; सं . जुड = बांधणें ] ( वाप्र . )
-
०करणें सांधणें ; मिळविणें . पुण्याची करावया जोड ; जीव हा सज्जला - विक ६९ . ( पायाची ).
-
०करणें कृपा संपादणें . मी आपले पायाची जोड केली आहे .
-
०देणें लाभ , फायदा देणें . संतपदाची जोड । दे रे हरी । - अमृत १०८ . ३४ .
Site Search
Input language: