-
न. १ शरीरशुद्धीकरिता , देवता प्रसन्न करण्याकरिता केलेले देहदंडनयुक्त उपोषण इ० सारखे आचरण ; ध्यान ; मनन ; कष्टसाध्य आचरण . २ सदाचरण ; पुण्याचरण ; पुण्य . ३ विहित , विशिष्ट कर्म ; कर्तव्य ( ब्राह्मण , क्षत्रिय इ० वर्णाचे ). ४ बारा वर्षांची मुदत कालमान . एकांगुष्ठीही तपिजे । तपसाहस्त्री । - ज्ञा १७ . ४१५ . बसवेल कथं कथमपि आम्हां तप एक साजणा रानी । - मोवन २ . ६८ . ५ ग्रीष्मऋतु . - शर . - वि . हे पद समासाच्य उत्तरपदी असल्यास तापद , ताप देणारा असा अर्थ होतो . जसे - नेत्रंतप = डोळ्याला ताप देणारा ; भालंतप = कपाळाला ताप देणारा ; शिरस्तप ; अंगतप ; मनस्तप ; चित्रंतप ; अंतस्तप ; बहिस्तप ; पादंतप ; इंद्रियंतप . [ सं . ] ( वाप्र . ) तपी बसणे - १ ( अक्षरशः ) धर्माचरणार्थ , पुण्यसंचयार्थ देहदंडयुक्त आचरण करणे . २ ( ल .) अधिकारच्युत , बेकार होऊन घरी बसणे . ( करुन , करुन ) तपी बसणे - एकसारखी पापे करीत राहून त्यानंतर साधुवृत्तीचा आव आणणे . तपे तपणे - तपश्चर्या करणे . जे तीर्थ करिता भागले । अनंत जन्मी तपे तपले । सामाशब्द -
-
०निष्ठा स्त्री. ( तपोनिष्ठ ) तपानुष्ठान . मग करुनिया तपनिष्ठा । प्रसन्न केले नीलकंठा । - कथा १ . १२ . १५६ . [ तप + निष्ठा ] तपश्चर्या स्त्री . तप ; तपस्या ; तपानुष्ठान ; तपाचे आचरण ; तप करणे ; खडतर व्रताचरण ; तपश्चिर्या असे अशुद्ध रुपहि प्रचारांत आहे . [ सं . तपस + चर = आचरणे ] तपश्शाली वि . तपश्चर्येच्या प्रभावाने चमकणारा , शोभणारा ; उग्र तपाच्या उत्कर्षाने व गुणाने युक्त . [ सं . तपस + शालिन = शोभणारा ] तपःसामर्थ्य , तपस्सामर्थ्य न . तपोबल ; तपश्चर्येने प्राप्त होणारे अलौकिक बळ . [ तपस + सामर्थ्य ] तपोधन पु . १ तप हेच धन ज्याचे तो . २ ( ल . ) गोसावी ; बैरागी ; संन्यासी ; तपस्वी . ३ गुरव ; शंकराच्या देवळांतील गुरव . - बदलापूर ४७४ . [ सं . तपस + धन ] तपोनिधि पु . १ तपश्चर्येचा सांठा . २ गोसावी , बैरागी इ० ना संबोधण्याचा शब्द ; तपोधन . [ सं . तपस + निधि = साठा ] तपोबल न . तपाचरणाने आलेले अलौकिक बल ; तपःसामर्थ्य . [ सं . तपस + बल ] तपोलोक पु . सत्प स्वर्गलोकांपैकी सहावा लोक . सप्तलोक पहा . [ तपस + लोक = जग ] तपोवन न . तपश्चर्या करावयाचे वन ; तपस्वी लोकांचे राहण्याचे स्थान . सिलोनचे जुने नांव . [ सं . तपस + वन ]
-
तपी बसणें
-
(अक्षरशः) धर्माचरणार्थ, पुण्यसंचयार्थ देहदंडयुक्त तप आचरणें
Site Search
Input language: